ETV Bharat / state

जळगाव महापालिका हद्दीत 3 दिवसांचा जनता कर्फ्यू; 12 ते 14 मार्चदरम्यान अंमलबजावणी - Public curfew in Jalgaon municipal area

गेल्या काही आठवड्यांपासून जळगाव शहर हे कोरोनाचे प्रमुख हॉटस्पॉट आहे. कोरोनाची साखळी खंडित करण्याच्या उद्देशाने जिल्हा प्रशासनाने जळगाव महापालिका हद्दीत 3 दिवसांचा जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्णय घेतला आहे. 12 ते 14 मार्चदरम्यान हा जनता कर्फ्यू असणार आहे. या कर्फ्यूच्या काळात अत्यावश्यक सेवा वगळता इतर सेवांवर बंधने घालण्यात आली आहेत.

3-day public curfew in Jalgaon
जळगाव महापालिका हद्दीत जनता कर्फ्यू
author img

By

Published : Mar 9, 2021, 8:04 PM IST

जळगाव - जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत चालला आहे. विशेष करून, जळगाव शहरात कोरोना वेगाने हातपाय पसरत आहे. गेल्या काही आठवड्यांपासून जळगाव शहर हे कोरोनाचे प्रमुख हॉटस्पॉट आहे. कोरोनाची साखळी खंडित करण्याच्या उद्देशाने जिल्हा प्रशासनाने जळगाव महापालिका हद्दीत 3 दिवसांचा जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्णय घेतला आहे. 12 ते 14 मार्चदरम्यान हा जनता कर्फ्यू असणार आहे. या कर्फ्यूच्या काळात अत्यावश्यक सेवा वगळता इतर सेवांवर बंधने घालण्यात आली आहेत.

जळगाव महापालिका हद्दीत जनता कर्फ्यू

जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी आज (मंगळवारी) सायंकाळी पत्रकार परिषदेत जनता कर्फ्यूची घोषणा केली. याप्रसंगी पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे, महापालिका आयुक्त सतीश कुलकर्णी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील आदींची उपस्थिती होती.

11 मार्चला रात्री होणार कर्फ्यूला सुरुवात-

जनता कर्फ्यूला 11 मार्च रोजी रात्री 8 वाजेपासून सुरुवात होणार आहे. त्यानंतर पुढे 3 दिवस म्हणजेच 15 मार्च रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत हा कर्फ्यू असणार आहे. कर्फ्यू सुरू असताना बाजारपेठा बंद असतील. जनता कर्फ्यूचा निर्णय हा समाजसेवी संघटना, व्यापारी संस्था आणि लोकप्रतिनिधी यांच्याशी चर्चा करून घेण्यात आल्याचे जिल्हाधिकारी राऊत यांनी सांगितले.

नागरिकांनी जीवनावश्यक वस्तुंच्या खरेदीसाठी गर्दी करू नये-

जनता कर्फ्यूच्या कालावधीत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा किंवा इतर शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित परीक्षा पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार होतील. सोमवारी सर्व प्रकारची दुकाने उघडण्यात येणार असल्याने नागरिकांनी जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी गर्दी करू नये. लसीकरण कार्यक्रम देखील नियोजनानुसार सुरू राहणार आहे. सर्व निर्बंध हे जळगाव महानगरपालिका क्षेत्रासाठी असून आवश्यकतेनुसार तालुकास्तरावर त्याची अंमलबजावणी नंतर करण्यात येणार आहे. राज्यातील इतर भागातून होणारी प्रवासी वाहतूक देखील सुरू राहणार आहे. टॅक्सी, रिक्षा आणि इतर वाहनांची सेवा केवळ अत्यावश्यक वैद्यकीय सेवेसाठी तसेच शासकीय, औद्योगिक आस्थापना कर्मचारी यांची वाहने आणि परीक्षार्थी विद्यार्थ्यांसाठी राहिल. हॉस्पिटल ओपीडी व रुग्णवाहिका सेवा सुरू राहील. सर्व प्रकारचे रुग्णालये, औषधांची विक्री दुकाने, दूध खरेदी केंद्र, कृषी आणि औद्योगिक आस्थापना सुरू राहतील. शासकीय कार्यालयांमध्ये 50 टक्के उपस्थिती असणार आहे. पेट्रोल पंप केवळ अत्यावश्यक सेवेतील वाहनांसाठी सुरू राहतील. रेल्वे, विमानसेवा, मालवाहतूक सुरू राहील. तसेच कुरियर, गॅरेज, वर्कशॉप, वृत्तपत्र व मीडिया सेवा, बँक व वित्तीय संस्था पोस्टल सेवा, पशुखाद्य केंद्रे सुरू राहतील.

हे राहील बंद -

शैक्षणिक संस्था, शाळा, महाविद्यालये, विद्यापीठ, खाजगी क्लासेस, बाजारपेठेतील दुकाने बंद राहतील. सर्व प्रकारचे हॉटेल बंद राहतील. मात्र, पार्सल सेवा सुरू राहणार आहे. किरकोळ भाजीपाला आणि फळे विक्री, धार्मिक स्थळे, सभा, मेळावे, बैठका, शासकीय व खासगी बांधकामे, शॉपिंग मॉल, मार्केट, किराणा दुकाने, लिकर शॉप, सलून, खाजगी कार्यालये, गार्डन, पार्क, बगीचे, सिनेमागृह, नाट्यगृह, व्यायामशाळा, जलतरण तलाव, प्रेक्षक गृहे, क्रीडा स्पर्धा, हातगाड्या, उघड्यावर खाद्यपदार्थ विक्रीची ठिकाणे, प्रदर्शने, मेळावे, संमेलन, आठवडे बाजार, कार्यक्रम बंद राहतील.

अन्यथा कडक कारवाई -

जनता कर्फ्यू दरम्यान नियम मोडल्यास पोलीस प्रशासनाच्या वतीने कठोर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती यावेळी पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांनी दिली. कोरोनाची संपर्क साखळी थांबवण्यासाठी नागरिकांनी शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

हेही वाचा - विरोधकांनी लावलेल्या आरोपांबाबत वझे म्हणाले...

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.