ETV Bharat / state

विठूरायाच्या दर्शनाला जाणाऱ्या कुटुंबावर काळाची झडप; एसटी-कारच्या अपघातात २ ठार, १६ जखमी - विठुराया

बापू मराठे हे त्यांच्या कुटुंबासह नातेवाईकांना सोबत घेऊन एरंडोलहून पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव येथे आषाढी एकादशीनिमित्त विठुरायाच्या दर्शनासाठी कारने जात होते. पाचोरा तालुक्यातील काकणबर्डी ते ओझर रस्त्यावर त्यांच्या कारला समोरून भरधाव येणाऱ्या बसने जोरदार धडक दिली.

कार अपघात
author img

By

Published : Jul 12, 2019, 4:03 PM IST

Updated : Jul 12, 2019, 4:10 PM IST

जळगाव - आषाढी एकादशीला विठुरायाच्या दर्शनाला जाणाऱ्या कुटुंबावर काळाने झडप घातली. जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यात असलेल्या काकणबर्डी गावाजवळ ही दुर्दैवी घटना घडली. एसटी बस आणि कार यांच्यात झालेल्या अपघातात कारमधील दोन जण जागीच ठार झाले, बस आणि कारमधील १५ ते १६ जण जखमी झाले आहेत.

कार आणि बसचा अपघात

बापू रघुनाथ मराठे (वय 48) आणि परी मराठे (वय 8) असे अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत. बापू मराठे हे त्यांच्या कुटुंबासह नातेवाईकांना सोबत घेऊन एरंडोलहून पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव येथे आषाढी एकादशीनिमित्त विठुरायाच्या दर्शनासाठी कारने जात होते. पाचोरा तालुक्यातील काकणबर्डी ते ओझर रस्त्यावर त्यांच्या कारला समोरून भरधाव येणाऱ्या बसने जोरदार धडक दिली. या अपघातात कारचालक बापू मराठे आणि त्यांच्या साडूची मुलगी परी हे जागीच ठार झाले आहेत. तर कारमधील सरला बापू मराठे (वय 36), गौरव बापू मराठे (वय 18), मयुरी पाटील (वय 16), रेखा पाटील (वय 36), ओम पाटील (वय 5वर्ष ) हे जखमी झाले आहेत.
अपघातानंतर बस चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात गेली. त्यामुळे बसमधील 8 ते 10 प्रवाशी देखील जखमी झाले आहेत.

दरम्यान, या अपघातात कारचे मोठे नुकसान झाले आहे. अपघाताची माहिती मिळताच काकणबर्डी तसेच ओझर गावातील लोकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. अपघातातील जखमींना तत्काळ पाचोरा येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. पाचोरा पोलिसांनी घटनास्थळी येऊन प्राथमिक पंचनामा केला. पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Intro:जळगाव
आषाढी एकादशीला विठुरायाच्या दर्शनाला जाणाऱ्या कुटुंबावर काळाने झडप घातल्याची दुर्दैवी घटना जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यात असलेल्या काकणबर्डी गावाजवळ घडली. एसटी बस आणि कार यांच्यात झालेल्या अपघातात कारमधील दोन जण जागीच ठार झाले. या अपघातात बस आणि कारमधील 15 ते 16 जण जखमी झाले आहेत.Body:बापू रघुनाथ मराठे (48, रा. एरंडोल) आणि परी मराठे (८, रा. धरणगाव) अशी अपघातात ठार झालेल्या दोघांची नावे आहेत. बापू मराठे हे त्यांच्या कुटुंबासह नातेवाईकांना सोबत घेऊन एरंडोलहून पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव येथे आषाढी एकादशीनिमित्त विठुरायाच्या दर्शनासाठी कारने (क्र. एमएच 20 डी 7678) जात होते. पाचोरा तालुक्यातील काकणबर्डी ते ओझर रस्त्यावर त्यांच्या कारला समोरून भरधाव येणाऱ्या बसने (क्र. एमएच 20 डी 9538) धडक दिली. या अपघातात कारचालक बापू मराठे आणि त्यांच्या साडूची मुलगी परी हे जागीच ठार झाले. तर कारमधील सरला बापू मराठे (36), गौरव बापू मराठे (18), मयुरी पाटील (16), रेखा पाटील (36), ओम पाटील (5) हे जखमी झाले. या अपघातानंतर बस चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस रस्त्याच्या कडेला खड्ड्यात गेली. त्यामुळे बसमधील 8 ते 10 प्रवासी देखील जखमी झाले आहेत.Conclusion:दरम्यान, या अपघातात कारचे मोठे नुकसान झाले आहे. अपघाताची माहिती मिळताच काकणबर्डी तसेच ओझर गावातील लोकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. अपघातातील जखमींना तत्काळ पाचोरा येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. पाचोरा पोलिसांनी घटनास्थळी येऊन प्राथमिक पंचनामा केला.
Last Updated : Jul 12, 2019, 4:10 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.