ETV Bharat / state

मांडवेदिगर, भिलमळी ग्रामस्थांना मालमत्ता सरकार जमा करण्याची नोटीस; मानसिक धक्क्याने दोघांचा मृत्यू

प्रांताधिकाऱ्यांनी नोटीस बजावल्याने जळगावातील मांडवेदिगर, भिलमळी या दोन्ही गावांमधील अनेक शेतकरी तणावग्रस्त झाले आहेत. तसेच यामुळे दोघांचा मृत्यू झाला आहे.

author img

By

Published : Aug 5, 2019, 9:22 AM IST

मृत सदू पवार आणि सोद्रीबाई मोरसिंग पवार

जळगाव - भुसावळ तालुक्यातील मांडवेदिगर, भिलमळी या गावांमधील सुमारे १२०० हेक्टर शेतजमीन आणि त्यावरील घरे हस्तांतरीत करण्यापूर्वी सक्षम प्राधिकाऱ्यांची पूर्व परवानगी घेण्यात आलेली नाही. त्यामुळे ही शेतजमीन व घरे सरकार जमा करण्याचे आदेश प्रांताधिकाऱ्यांनी २६ जुलैला दिले आहेत. या विषयासंदर्भात प्रांतांची नोटीस पाहताच ४ जुलैला मांडवेदिगर येथील दोन जणांचा मृत्यू झाला आहे.

सदू पवार आणि सोद्रीबाई मोरसिंग पवार (वय ६५), असे मृतांची नावे आहेत. नोटीस वाचताच सदू पवार यांना भोवळ आली होती, तर सोद्रीबाई यांना मानसिक धक्का बसला होता.

शेतजमीन सरकार जमा करण्याबाबत प्रांताधिकारी डॉ. श्रीकुमार चिंचकर यांनी मांडवेदिगर व भिलमळी या दोन्ही गावांमधील तब्बल ६०० शेतकरी व ग्रामस्थांना नोटीस बजावली आहे. त्याविरोधात मांडवेदिगर व भिलमळी येथील ग्रामस्थ आणि शेतकरी ३ जुलैला अप्पर जिल्हाधिकाऱ्यांकडे अपील दाखल करण्यासाठी गेले होते. मात्र, ते रजेवर असल्यामुळे त्यांची भेट होऊ शकली नाही. यासंदर्भात सोद्रीबाई पवार यांनी मुलास विचारणा केली होती. याच विषयावर पवार कुटुंबीयांमध्ये शनिवारी रात्री चर्चादेखील झाली होती. त्यामुळे सोद्रीबाई चिंताग्रस्त होत्या. मेहनतीने घेतलेले घर आणि जमीन सरकार जमा होणार या विचाराने त्यांच्या मनात घर केले होते. त्याच धसक्याने त्यांना शनिवारी रात्री हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचे निधन झाले.

मांडवेदिगर येथील अजमल सदू पवार हे बाहेरगावी गेलेले होते. रविवारी ते आपल्या घरी मांडवेदिगरला परतले. घरी आल्यानंतर त्यांना प्रांतांच्या नोटीसबाबत माहिती मिळाली. नोटीस वाचत असतानाच दुपारी २ वाजता त्यांचा थरकाप उडाला. भोवळ आल्याने ते जागीच कोसळले. त्यामुळे कुटुंबीयांनी गावातील डॉक्टरांना बोलावले. डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषीत केले. त्यांच्या पश्चात पत्नी, आई, वडील, मुलगा, दोन मुली असा परिवार आहे. घरातील कर्ता पुरूष गेल्याने त्यांचे कुटुंब उघड्यावर आले आहे.

प्रांताधिकाऱ्यांनी नोटीस बजावल्याने दोन्ही गावांमधील अनेक शेतकरी तणावग्रस्त झाले आहेत. शासन निर्णयाविरोधात ग्रामस्थांची एकजूट झाली आहे. तसेच ग्रामस्थ तीव्र आंदोलन छेडण्याच्या तयारीत आहेत. शासन आणखी किती बळी घेणार? असा जाब सरकारला विचारला जाणार असल्याचे मांडवेदिगर येथील ग्रामपंचायत सद्स्य गोरलाल जाधव यांनी सांगितले.

Intro:जळगाव
जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील मांडवेदिगर, भिलमळी या गावांमधील सुमारे १२०० हेक्टर शेतजमीन आणि त्यावरील घरे हस्तांतरीत करण्यापूर्वी सक्षम प्राधिकाऱ्यांची पूर्व परवानगी घेण्यात आलेली नाही. त्यामुळे ही शेतजमीन व घरे सरकार जमा करण्याचे आदेश प्रांताधिकाऱ्यांनी २६ जुलैला दिले आहेत. या विषयासंदर्भात प्रांतांची नोटीस पाहताच रविवारी (दि. ४) मांडवेदिगर येथील अजमल सदू पवार या प्रौढाचा भोवळ आल्याने तर मानसिक धक्क्याने सोद्रीबाई मोरसिंग पवार (वय ६५) यांचे निधन झाले.Body:शेतजमीन सरकार जमा करण्याबाबत प्रांताधिकारी डॉ. श्रीकुमार चिंचकर यांनी मांडवेदिगर व भिलमळी या दोन्ही गावांमधील तब्बल ६०० शेतकरी व ग्रामस्थांना नोटीस बजावली आहे. त्याविरोधात मांडवेदिगर व भिलमळी येथील ग्रामस्थ व शेतकरी, शनिवारी (दि. ३) अप्पर जिल्हाधिकाऱ्यांकडे अपील दाखल करण्यासाठी गेले होते. परंतु, साहेब रजेवर असल्यामुळे त्यांची भेट होऊ शकली नाही. या संदर्भात मृत सोद्रीबाई पवार यांनी मुलास विचारणा केली होती. याच विषयावर पवार कुटुंबीयांमध्ये शनिवारी रात्री चर्चादेखील झाली होती. त्यामुळे सोद्रीबाई चिंताग्रस्त होत्या. मेहनतीने घेतलेले घर आणि जमीन सरकार जमा होणार या विचाराने त्यांच्या मनात घर केले होते. त्याच धसक्याने त्यांना शनिवारी रात्री हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचे निधन झाले. त्याचप्रमाणे अजमल सदू पवार हे बाहेरगावी गेलेले होते. रविवारी ते आपल्या घरी मांडवेदिगरला परतले. घरी आल्यानंतर त्यांना प्रांतांच्या नोटीसबाबत माहिती मिळाली. नोटीस वाचत असतानाच दुपारी २ वाजता त्यांचा थरकाप उडाला. भोवळ आल्याने ते जागीच कोसळले. त्यामुळे कुटुंबीयांनी गावातील डॉक्टरांना बोलावले. डॉक्टरांनी तपासणी करुन त्यांना मृत घोषीत केले. त्यांच्या पश्चात पत्नी, आई, वडील, मुलगा, दोन मुली असा परिवार आहे. घरातील कमावती व्यक्ती गेल्याने त्यांचे कुटुंब उघड्यावर आले आहे.Conclusion:प्रांताधिकाऱ्यांनी नोटीस बजावल्याने दोन्ही गावांमधील अनेक शेतकरी तणावग्रस्त झाले आहेत. शासन निर्णयाविरोधात ग्रामस्थांची एकजूट झाली आहे. तसेच ग्रामस्थ तीव्र आंदोलन छेडण्याच्या तयारीत आहेत. शासन आणखी किती बळी घेणार, असा जाब सरकारला विचारला जाणार असल्याचे मांडवेदिगर येथील ग्रामपंचायत सदस्य गोरलाल जाधव यांनी सांगितले.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.