ETV Bharat / state

जळगाव कारागृहात पिस्तुल पुरवणारे दोघे जण अटकेत - nagesh pigle arrest

सागर पाटीलसह अटक केलेल्या नागेश व अमित चौधरी यांना आज ऑनलाइन न्यायालयात हजर करण्यात आले असता तिघांना ८ सप्टेबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, या गुन्ह्यातील मुख्य आरोपी सुशील मगरे व गौरव पाटील यांच्याबाबत सागर पाटील याच्याकडे चौकशी केली असता तो पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे देत आहे.

अटक झालेले आरोपी
अटक झालेले आरोपी
author img

By

Published : Sep 2, 2020, 10:50 PM IST

जळगाव- जिल्हा कारागृहात आरोपींना पिस्तुल व काडतूस पुरविणाऱ्या दोघा जणांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. नागेश मुकुंदा पिंगळे ( वय २१ रा.अमळनेर) व अमित उर्फ नितेश सुदर्शन चौधरी उर्फ बिहारी (रा. रामेश्वर कॉलनी, जळगाव मूळ रा.बिहार) अशी अटक करण्यात आलेल्या गुन्हेगारांची नावे आहेत. आरोपींकडून एक गावठी पिस्तुल हस्तगत करण्यात आले आहे. मात्र, प्रकरणातील मुख्य संशयित अजूनही फरारच आहे.

सागर पाटीलसह अटक केलेल्या नागेश व अमित चौधरी यांना आज ऑनलाइन न्यायालयात हजर करण्यात आले असता तिघांना ८ सप्टेबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, या गुन्ह्यातील मुख्य आरोपी सुशील मगरे व गौरव पाटील यांच्याबाबत सागर पाटील याच्याकडे चौकशी केली असता तो पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे देत आहे. अमित व जगदीश या दोघांनी कारागृहातील भींतीवरून काडतूस व पिस्तुल फेकून गणेश मगरे याला पुरवले. शिंदखेडा येथील एका जणाने जगदीश पाटील याला गावठी पिस्तुल पुरविल्याचेही उघड झाले आहे.

पुण्यातील कोथरूडमध्ये सोने विक्रीच्या दुकानात शस्त्रधारी दोघांनी दरोडा टाकला होता. त्यात सुशील मगरे याच्यासोबत आता अटक केलेला अमित उर्फ बिहारी हा देखील होता. अमित हा मुळचा बिहारचा असून रामेश्वर कॉलनीत वडिलांसोबत इलेक्ट्रिक फिटींगचे काम करतो. मगरेच्या संपर्कात आल्याने धाडसी गुन्ह्यात त्याचा सहभाग निष्पन्न झाला.

हेही वाचा- 'गेल्या 10-12 वर्षात पुढं आलेले नेते आम्हाला अक्कल शिकवायला लागलेत'

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.