ETV Bharat / state

जळगाव जिल्ह्यातील १८ सराईत गुन्हेगार तडीपार; सण-उत्सवात शांततेसाठी पोलिसांची कारवाई

author img

By

Published : Sep 3, 2019, 4:52 PM IST

गणेशोत्सव आणि मोहरम सणांमध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी जळगाव पोलीस दलाने जिल्ह्यातील १८ सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करत त्यांना तडीपार केले आहे.

डॉ.पंजाबराव उगले, पोलीस अधीक्षक, जळगाव

जळगाव- गणेशोत्सव आणि मोहरम हे सण निर्विघ्नपणे पार पडावेत तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी जळगाव पोलीस दलाने जिल्ह्यातील १८ सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करत त्यांना तडीपार केले आहे. अजून काही गुन्हेगारांना तडीपार करण्याचे काम सुरू असल्याची माहिती, पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

डॉ.पंजाबराव उगले, पोलीस अधीक्षक, जळगाव

गणेशोत्सव आणि मोहरम सणाच्या अनुषंगाने पोलीस दलाने केलेल्या नियोजनाची माहिती देण्यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या पत्रकार परिषदेत उगले यांनी उपरोक्त माहिती दिली. यावेळी स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक बापू रोहोम उपस्थित होते. डॉ.उगले पुढे म्हणाले, जळगाव जिल्ह्यात १ हजार ७०२ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची स्थापना झाली आहे. तसेच ४७८ खासगी, १४१ एक गाव एक गणपती असे एकूण २ हजार ३२१ मंडळांची स्थापना करण्यात आली आहे.

त्याचप्रमाणे मोहरम सणादरम्यान ८५४ सवारी, ३६ ताबूत , ९ डोले अशा एकूण ९९४ मिरवणुका जिल्ह्यात निघणार आहेत. या दोन्ही सणांसाठी १ पोलीस अधीक्षक, २ अपर पोलीस अधीक्षक, १० उपविभागीय पोलीस अधिकारी, ३२ पोलीस निरीक्षक, २ वायरलेस पोलीस निरीक्षक, ९० सहायक पोलीस निरीक्षक व उपनिरीक्षक, प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक, ५ सीआयडी पोलीस निरीक्षक, २०० नवप्रविष्ठ पोलीस शिपाई, २६०० पोलीस कर्मचारी, १८०० गृह रक्षक दलाचे जवान, अमरावतीची राज्य राखीव दलाची १ कंपनी, रॅपिड ऍक्शन फोर्स ची १ कंपनी, आरसीपी चे ८ प्लाटून, स्ट्रायकिंग फोर्स १६, शीघ्र कृती दलाचे ४ पथक, असा तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.

चालू वर्षात जिल्ह्यातील ४९ गुन्हेगार तडीपार

पोलीस दलाच्यावतीने २०१९ या चालू वर्षात जिल्ह्यातील ४९ गुन्हेगार तडीपार झाले आहेत. त्यात गणेशोत्सव आणि मोहरम सणाच्या अनुषंगाने १८ गुन्हेगार तडीपार करण्यात आले आहेत. यापूर्वी २०१८ मध्ये १३ तर २०१७ मध्ये १२ गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले होते. यावर्षी तडीपार केलेल्या गुन्हेगारांची संख्या वाढली आहे. त्याचबरोबर, गुन्हेगारी कृत्य करणाऱ्या टोळ्यांवरही पोलिसांचे लक्ष असणार आहे. त्याचप्रमाणे गुन्हेगारी कृत्य करणाऱ्या टोळ्यांना पाठबळ देणारे देखील रडारवर असणार आहेत.

Intro:जळगाव
गणेशोत्सव आणि मोहरम हे सण निर्विघ्नपणे पार पडावेत तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, म्हणून जळगाव पोलीस दलाने जिल्ह्यातील 18 सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करत तडीपार केले आहेत. अजून काही गुन्हेगारांना तडीपार करण्याचे काम सुरू असल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.Body:गणेशोत्सव आणि मोहरम सणांच्या अनुषंगाने पोलीस दलाने केलेल्या नियोजनाची माहिती देण्यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक बापू रोहोम उपस्थित होते. डॉ. उगले पुढे म्हणाले, जळगाव जिल्ह्यात 1 हजार 702 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची स्थापना झाली आहे. तसेच 478 खासगी, 141 एक गाव एक गणपती असे एकूण 2 हजार 321 मंडळांची स्थापना करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे मोहरम सणादरम्यान 854 सवारी, ताबूत 36, डोले 9 अशा एकूण 994 मिरवणुका जिल्ह्यात निघणार आहेत. या दोन्ही सणांसाठी 1 पोलीस अधीक्षक, 2 अपर पोलीस अधीक्षक, 10 उपविभागीय पोलीस अधिकारी, 32 पोलीस निरीक्षक, 2 वायरलेस पोलीस निरीक्षक, 90 सहायक पोलीस निरीक्षक व उपनिरीक्षक, प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक, 5 सीआयडी पोलीस निरीक्षक, 200 नवप्रविष्ठ पोलीस शिपाई, 2600 पोलीस कर्मचारी, 1800 गृह रक्षक दलाचे जवान, अमरावतीची राज्य राखीव दलाची 1 कंपनी, रॅपिड ऍक्शन फोर्स 1 कंपनी, आरसीपी 8 प्लाटून, स्ट्रायकिंग फोर्स 16, शीघ्र कृती दलाचे 4 पथक असा तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे, असेही त्यांनी सांगितले.

चालू वर्षात जिल्ह्यातील 49 गुन्हेगार तडीपार-

पोलीस दलाच्यावतीने चालू 2019 वर्षात जिल्ह्यातील 49 गुन्हेगार तडीपार झाले आहेत. त्यात गणेशोत्सव आणि मोहरम सणाच्या अनुषंगाने 18 गुन्हेगार तडीपार करण्यात आले आहेत. यापूर्वी 2018 मध्ये 13 तर 2017 मध्ये 12 गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले होते. यावर्षी तडीपार केलेल्या गुन्हेगारांची संख्या वाढली आहे.Conclusion:टोळ्यांवरही असणार नजर-

गुन्हेगारी कृत्य करणाऱ्या टोळ्यांवरही पोलिसांचे लक्ष असणार आहे. त्याचप्रमाणे गुन्हेगारी कृत्य करणाऱ्या टोळ्यांना पाठबळ देणारे देखील रडारवर असणार आहेत.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.