ETV Bharat / state

जळगावात १७ वर्षीय तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या, कारण अज्ञात - तरुणी आत्महत्या

संगीता ही तिच्या दोन्ही भाऊ आणि वडीलांसोबत राहत होती. तिच्या आईचे निधन झालेले असल्यामुळे वडील, भावांसाठी आईप्रमाणे संगीता घरात राबत होती. दरम्यान, ९ मे रोजी सायंकाळी सहा वाजता संगीताने राहत्या घरातच गळफास घेतला.

girl commits suicide Jalgaon news
तरुणीची आत्महत्या जळगाव
author img

By

Published : May 10, 2020, 8:37 PM IST

जळगाव - शहरातील रायसोनीनगर येथे राहणाऱ्या एका १७ वर्षीय तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. काल (शनिवार) 9 मे रोजी सायंकाळी सहा वाजता ही घटना उघडकीस आली. या तरुणीने आत्महत्या का केली, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. संगीता खेमचंद चव्हाण (१७, रा. रायसोनीनगर, जळगाव) असे मृत तरुणीचे नाव आहे.

हेही वाचा... लग्न कसं शक्य म्हणून सर्वांचा होता विरोध.. शेवटी 'त्यांनी' उचलले टोकाचे पाऊल

संगीता ही तिच्या दोन्ही भाऊ आणि वडीलांसोबत राहत होती. तिच्या आईचे निधन झालेले असल्यामुळे वडील, भावांसाठी आईप्रमाणे संगीता घरात राबत होती. दरम्यान, ९ मे रोजी सायंकाळी सहा वाजता संगीताने राहत्या घरातच गळफास घेतला. ही बाब कुटुंबियांच्या लक्षात आल्यानंतर तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना रात्री तिचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर रामानंदनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अनिल फेगडे, विश्वनाथ गायकवाड आणि अनिल फेगडे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.

संगीताने आत्महत्या का केली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. रविवारी दुपारी शवविच्छेदन करुन मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला. या प्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.