ETV Bharat / state

जळगाव अपघात : मृतांच्या कुटुंबीयांना दोन लाखांची मदत तर जखमींच्या उपचाराचाही खर्च करणार - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

author img

By

Published : Feb 15, 2021, 7:46 AM IST

Updated : Feb 15, 2021, 4:08 PM IST

accident news
केळी वाहून नेणारा ट्रक उलटला

16:05 February 15

किनगाव टेम्पो अपघातातील मृत मजुरांच्या नातेवाईकांना दोन लाखांची मदत, जखमींच्या उपचाराचाही खर्च करणार - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा.

सीएमओने केलेले ट्विट - मृत मजूर हे रावेर तालुक्यातील रहिवाशी असल्याची माहिती प्रथमदर्शनी मिळत आहे. मृतांमध्ये सहा महिला व नऊ पुरूष आहेत. हा अपघात दुर्दैवी असल्याचे सांगतांना मुख्यमंत्र्यांनी मृत मजुरांच्या कुटुंबियांप्रती आपली सहवेदना व्यक्त केली आहे.

15:24 February 15

जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील किनगावजवळ घडलेल्या ट्रकच्या भीषण अपघातात 15 जणांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक प्रताप दिघावकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. अपघात नेमका कसा घडला, याची माहिती जाणून घेतली.

15:24 February 15

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची आभोडा गावाला सांत्वनपर भेट, मृतांच्या नातेवाईकांचे केले सांत्वन, राज्य शासनाच्या वतीने मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 2 लाखांची मदत मिळणार, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केली घोषणा

15:23 February 15

जिल्ह्यातील यावल तालुक्यातील किनगावजवळ घडलेल्या अपघातात रावेर तालुक्यातील आभोडा गावातील एकाच कुटुंबातील 10 जणांचा मृत्यू झाला आहे. वाघ, भालेराव व इंगळे कुटुंबीयांचा मृतांमध्ये समावेश आहे. या घटनेमुळे मृतांच्या नातेवाईकांवर मोठा आघात झाला आहे. मृतांचे मृतदेह उत्तरीय तपासणीनंतर गावात अंत्यसंस्कारासाठी दाखल झाले आहेत. आभोडा गाव या घटनेमुळे सुन्न झाले आहे. थोड्याच वेळात अंत्ययात्रा सुरू होणार...

15:23 February 15

यावल अपघात : प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे गेले गरिबांचे बळी; भुसावळचे माजी नगराध्यक्ष अनिल चौधरी यांचा आरोप

11:00 February 15

जळगावमध्ये ट्रक उलटून 15 मजूर ठार;

10:27 February 15

हृदय हेलावून टाकणारा ट्रकचा अपघात- पंतप्रधान मोदी

महाराष्ट्रातील जळगाव येथे हृदय हेलावून टाकणारा ट्रकचा अपघात घडला आहे. शोकाकुल कुटुंबांच्या दुःखात मी सहभागी आहे. जखमींच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा होवो. - पंतप्रधान

09:40 February 15

पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल-

जळगावमध्ये ट्रक उलटून 15 मजूर ठार

या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर रात्री यावल पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर मृतांचे मृतदेह यावल ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले. जखमींना जळगाव जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या अपघातात मृतांची संख्या वाढण्याची भीती वर्तवली जात आहे.

07:42 February 15

किनगावजवळ घडला अपघात

केळीचा ट्रक उलटून 15 मजूर ठार

जळगाव -  जिल्ह्यातील यावल तालुक्यातील किनगावजवळ भीषण अपघात घडला आहे. पपईचा ट्रक उलटून 15 मजुरांचा जागीच मृत्यू झाला. तर 5 जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात रविवारी मध्यरात्रीनंतर अंकलेश्वर-बऱ्हाणपूर महार्गावर घडला. अपघातात ठार झालेल्या मजुरांमध्ये 7 पुरुष, 6 महिला व 2 बालकांचा समावेश आहे.

या अपघातासंदर्भात मिळालेली माहिती अशी की, रावेर तालुक्यातील अभोडा, केऱ्हाळा तसेच रावेर शहरातील काही मजूर धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील गावांमधून पपई ट्रकमध्ये भरण्याच्या कामासाठी गेलेले होते. ट्रकमध्ये पपई भरल्यानंतर ते रात्री पुन्हा रावेरला परत येत होते. किनगावजवळ ट्रक चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने ट्रक रस्त्याच्या कडेला जाऊन उलटला. यात काही मजूर ट्रक खाली तर काही मजूर पपईच्या खाली दबले गेले. म्हणून 15 मजुरांचा जागीच मृत्यू झाला. रात्रीची वेळ असल्याने लवकर मदतकार्य मिळू शकले नाही. त्यामुळे अनेक जखमींचा मृत्यू झाला.

मृतांमध्ये सर्वाधिक पुरुषांचा समावेश-

या अपघातात ठार झालेल्या मजुरांमध्ये सर्वाधिक पुरुष मजुरांचा समावेश आहे, सात पुरुष तर सहा महिलांचा आणि दोन बालकांचा मृत्यू झाला आहे. उर्वरित पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. ट्रकमध्ये एकूण 21 मजूर असल्याची माहिती समोर आली आहे.

रावेर तालुक्यावर शोककळा-

या धक्कादायक घटनेमुळे रावेर तालुक्यावर एकच शोककळा पसरली आहे. अपघातात मृत्यू झालेल्या मजुरांमध्ये सर्वाधिक मजूर हे अभोडा, केऱ्हाळा या गावांमधील आहेत. या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर रात्री यावल पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर मृतांचे मृतदेह यावल ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले. जखमींना जळगाव जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या अपघातात मृतांची संख्या वाढण्याची भीती वर्तवली जात आहे.
 
यावल अपघातातील मृतांची नावे-

1) शेख हुसेन शेख मुस्लिम मन्यार (वय 30, रा. फकीर वाडा, रावेर)

2) सर्फराज कासम तडवी (वय 32, रा. केऱ्हाळा, ता. रावेर)

3) नरेंद्र वामन वाघ (वय 25, रा. आभोडा, ता. रावेर)

4) डिगंबर माधव सपकाळे (वय 55, रा. रावेर)

5) दिलदार हुसेन तडवी (वय 20, आभोडा, ता. रावेर)

6) संदीप युवराज भालेराव (वय 25, रा. विवरा, ता. रावेर)

7) अशोक जगन वाघ (वय 40, रा. आभोडा, ता. रावेर)

8) दुर्गाबाई संदीप भालेराव (वय 20, रा. आभोडा, ता. रावेर)

9) गणेश रमेश मोरे (वय 05, रा. आभोडा, ता. रावेर)

10) शारदा रमेश मोरे (वय 15, रा. आभोडा, ता. रावेर)

11) सागर अशोक वाघ (वय 03, रा. आभोडा, ता. रावेर)

12) संगीता अशोक वाघ (वय 35, रा. आभोडा, ता. रावेर)

13) सुमनबाई शालीक इंगळे (वय 45, रा. आभोडा, ता. रावेर)

14) कमलाबाई रमेश मोरे (वय 45, रा. आभोडा, ता. रावेर)

15) सबनूर हुसेन तडवी (वय 53, रा. आभोडा, ता. रावेर)

Last Updated : Feb 15, 2021, 4:08 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.