ETV Bharat / state

'वडील अभ्यास करू देत नाहीत, त्यांच्यावर गुन्हा दाखल करा' १२ वर्षाच्या मुलाची पोलिसात तक्रार!

मुले अभ्यास करत नाहीत, अशी सर्वसामान्य पालकांची नेहमी ओरड असते. मात्र, जळगाव जिल्ह्यातील जामनेर शहरात नेमका याउलट प्रकार घडला आहे. एका १२ वर्षाच्या मुलाने वडील अभ्यास करू देत नाहीत आणि रात्रभर टीव्ही पाहतात. तसेच आईला देखील मारहाण करतात. अशी तक्रार घेऊन चक्क पोलीस ठाणे गाठले आहे. वडिलांवर गुन्हा दाखल करावा म्हणून त्याने पोलीस ठाण्यात ठाण मांडल्याने पोलिसही गोंधळात पडले आहेत.

पीडित मुलगा
author img

By

Published : Jul 31, 2019, 10:58 PM IST

Updated : Jul 31, 2019, 11:57 PM IST

जळगाव - मुले अभ्यास करत नाहीत, अशी सर्वसामान्य पालकांची नेहमी ओरड असते. मात्र, जळगाव जिल्ह्यातील जामनेर शहरात नेमका याउलट प्रकार घडला आहे. एका १२ वर्षाच्या मुलाने वडील अभ्यास करू देत नाहीत आणि रात्रभर टीव्ही पाहतात. तसेच आईला देखील मारहाण करतात, अशी तक्रार घेऊन चक्क पोलीस ठाणे गाठले आहे. वडिलांवर गुन्हा दाखल करावा म्हणून त्याने पोलीस ठाण्यात ठाण मांडल्याने पोलिसही गोंधळात पडले आहेत.

'वडील अभ्यास करू देत नाहीत, त्यांच्यावर गुन्हा दाखल करा' १२ वर्षाच्या मुलाची पोलिसात तक्रार!

पीडित मुलाने तक्रार केली असून तो जामनेर शहरातील भुसावळ रोड भागात आईवडील, भाऊ आणि बहिणीसोबत राहतो. त्याची आई शेतात मजुरी करते तर वडील गवंडी काम करतात. जामनेर तालुक्यातील शेंगोळे आश्रमशाळेत तो भावंडांसह शिकतो. वडील घरात सारखे त्रास देतात. अभ्यास करू देत नाहीत, आईलादेखील मारहाण करतात, अशी तक्रार घेऊन अजय बुधवारी दुपारी थेट पोलीस ठाण्यात आला.

बाहेर पाऊस सुरू असताना एक लहान मुलगा हाफ चड्डी व बनियानवर भिजलेल्या अवस्थेत पोलीस ठाण्यात येऊन बापावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करू लागल्याने पोलीसही चक्रावले आहेत. त्यांनी त्याला नाव, गाव विचारायला सुरुवात करताच तो मोठ्या साहेबांना भेटायचे आहे, अशी गळ घालू लागला. कसला गोंधळ चालला आहे हे पाहण्यासाठी पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे त्याठिकाणी आले आणि त्यांनी अजयला त्यांच्या दालनात नेले. येथे त्यांनी त्याची विचारपूस केलीन असता अजयने सारी हकीकत सांगितली. त्याच्या तक्रारीची दखल घेऊन इंगळे यांनी त्याच्या आईवडिलांना पोलीस ठाण्यात बोलावून घेतले. नंतर त्याच्या वडिलांना समज दिली.

अजय पोलीस ठाण्यात आला तेव्हा तो हाफ चड्डी व बनियानवर होता. त्याच्या पायात चप्पल नव्हती. हे पाहून पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांनी अजयला बाजारात नेले. त्याला नवे कपडे, चप्पल घेऊन दिली. या घटनेमुळे अजयची शिक्षणाबद्दल असलेली तळमळ तर दिसून आली, शिवाय खाकीतील माणुसकीचेही दर्शन घडले.

Intro:जळगाव
'मुलं अभ्यास करीत नाहीत', अशी सर्वसामान्य पालकांची नेहमी ओरड असते. मात्र, जळगाव जिल्ह्यातील जामनेर शहरात नेमका याउलट प्रकार घडला आहे. एका १२ वर्षाच्या मुलाने वडील अभ्यास करू देत नाहीत, रात्रभर टीव्ही पाहतात. आईला देखील मारहाण करतात, अशा स्वरुपाची तक्रार घेऊन चक्क पोलीस ठाणे गाठले. वडिलांवर गुन्हा दाखल करावा म्हणून त्याने पोलीस ठाण्यात ठाण मांडल्याने पोलिसही गोंधळात पडले.Body:अजय लक्ष्मण कुमावत (वय १२) असे तक्रारदार मुलाचे नाव आहे. तो जामनेर शहरातील भुसावळ रोड भागात आई-वडील, भाऊ आणि बहिणीसोबत राहतो. त्याची आई शेतात मजुरी करते तर वडील मिस्त्री काम करतात. जामनेर तालुक्यातील शेंगोळे आश्रमशाळेत तो भावंडांसह शिकतो. वडील घरात सारखे त्रास देतात. अभ्यास करू देत नाहीत, आईलादेखील मारहाण करतात, अशा स्वरुपाची तक्रार घेऊन अजय बुधवारी दुपारी थेट पोलीस ठाण्यात आला. बाहेर पाऊस सुरू असताना एक लहान मुलगा हाफ चड्डी व बनियानवर भिजलेल्या अवस्थेत पोलीस ठाण्यात येऊन बापावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करू लागल्याने पोलीसही चक्रावले. त्यांनी त्याला नाव, गाव विचारायला सुरुवात करताच तो मोठ्या साहेबांना भेटायचे आहे, अशी गळ घालू लागला. काय गोंधळ चाललाय म्हणून पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे त्याठिकाणी आले त्यांनी अजयला त्यांच्या दालनात नेले. येथे त्यांनी त्याची आस्थेवाईकपणे विचारपूस केली. तेव्हा अजयने सारी हकीकत सांगितली. त्याच्या तक्रारीची दखल घेऊन इंगळे यांनी त्याच्या आई-वडिलांना पोलीस ठाण्यात बोलावून घेतले. नंतर त्याच्या वडिलांना समज दिली.Conclusion:अजयला कपडे-चप्पलही घेऊन दिली-

अजय पोलीस ठाण्यात आला तेव्हा तो हाफ चड्डी व बनियानवर होता. त्याच्या पायात चप्पल नव्हती. हे पाहून पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांनी अजयला बाजारात नेले. त्याला नवे कपडे, चप्पल घेऊन दिली. या घटनेमुळे अजयची शिक्षणाबद्दल असलेली तळमळ तर दिसून आली, शिवाय खाकीतील माणुसकीचेही दर्शन घडले.
Last Updated : Jul 31, 2019, 11:57 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.