ETV Bharat / state

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी जळगाव जिल्ह्यातून १ हजार २१३ अर्ज दाखल; आता उरले अवघे दोन दिवस

author img

By

Published : Dec 28, 2020, 10:28 PM IST

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेत जिल्ह्यात सोमवारी एकूण १ हजार १४३ उमेदवारी अर्ज झाले. जिल्ह्यातील ७८३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी आतापर्यंत १ हजार २१३ अर्ज दाखल झाले असून, उमेदवारी अर्ज दाखल करण्यास आता केवळ दोनच दिवस शिल्लक राहिले आहेत.

1 thousand 213 candidates form fill up for gram panchayat election in jalgaon district
ग्रामपंचायत निवडणुकीसाठी जळगाव जिल्ह्यातून १ हजार २१३ अर्ज दाखल; आता उरले अवघे दोन दिवस

जळगाव - ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेत जिल्ह्यात सोमवारी एकूण १ हजार १४३ उमेदवारी अर्ज झाले. जिल्ह्यातील ७८३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी आतापर्यंत १ हजार २१३ अर्ज दाखल झाले असून, उमेदवारी अर्ज दाखल करण्यास आता केवळ दोनच दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे या दोन दिवसात अजून गर्दी होण्याची शक्यता आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी जळगाव जिल्ह्यातून १ हजार २१३ अर्ज दाखल

ग्रामीण भागात दिवसेंदिवस ग्रामपंचायत निवडणुकीचा रंग चढत आहे. अनेक गावांमध्ये दुरंगी, तिरंगी लढतीची चिन्हे आहेत. आमदारांनी त्या-त्या तालुक्यात ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्याचे आवाहन केले असले तरी अद्याप कोणताही प्रतिसाद नागरिकांनी दिलेला नाही. अनेक गावांमध्ये निवडणुकीच्या रिंगणात दोनऐवजी तीन पॅनलमध्ये निवडणुका लढवण्याच्या योजना आखल्या जात आहेत. अनेक पॅनलचे अद्याप उमेदवार ठरले नसल्याचे बहुतांश ग्रामपंचायतींसाठी अद्यापही अर्ज दाखल झालेले नाही.

जळगाव तालुक्यातून दाखल झाले सर्वाधिक अर्ज -
उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या तिसऱ्या दिवशी सोमवार, २८ डिसेंबर रोजी एक हजार १४३ अर्ज दाखल झाले. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी एकही अर्ज दाखल नव्हता. दुसऱ्या दिवशी २४ रोजी एकूण ७० अर्ज दाखल झाले होते. सोमवार, २८ रोजी दाखल एक हजार १४३ व पूर्वीचे ७० असे एकूण एक हजार २१३ अर्ज दाखल झाले आहे. सोमवारी सर्वाधिक १५८ अर्ज जळगाव तालुक्यात दाखल झाले. त्या खालोखाल जामनेर तालुक्यात १४९, रावेर व चाळीसगाव तालुक्यात प्रत्येकी १०४ अर्ज दाखल झाले. सर्वात कमी २३ अर्ज मुक्ताईनगर तालुक्यात दाखल झाले.

पुढचे दोन दिवस महत्त्वाचे -
उमेदवारी अर्ज दाखल करण्यास आता केवळ दोनच दिवस शिल्लक राहिले आहेत. सोमवारी झालेली गर्दी पाहता मंगळवारी व बुधवारी आणखी गर्दी वाढण्याची शक्यता आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यास शेवटचे दोन दिवस शिल्लक असल्याने इच्छुक उमेदवारांची तारांबळ उडण्याची शक्यता आहे. दरम्यान, उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर लढतीचे चित्र स्पष्ट होईल.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.