हिंगोली- दिवसेंदिवस महिला आणि युवतींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांमध्ये घट होताना दिसून येत नाही. अशीच एक धक्कादायक घटना कळमनुरी तालुक्यात घडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या घटनेत एका युवतीला लग्नाचे आमिष दाखवत मद्य पाजून तिच्यावर अतिप्रसंग केला आहे. या प्रकरणी एका सैनिक दलातील जवानावर आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
कळमनुरी तालुक्यातील कसबे धावंडा येथील गौतम प्रभाकर खिल्लारे असे आरोपी जवानाचे नाव आहे. सदरील आरोपी हा सैन्यदलात कार्यरत असून गेल्या 1 ऑगस्ट 2019 पासून ते 12 ऑगस्ट 2020 दरम्यान सदरील जवानाचे वीस वर्षीय युवतीशी ओळख झाली, अन या ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. तो जवान एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने संबंधित युवतीसोबत नाटक म्हणून लग्न देखील केले होते, यामध्ये तो जवान या युवतीला वारंवार लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अतिप्रसंग करत होता.
मद्य प्राशन करून करत असे अतिप्रसंग-
या दोघांचे प्रेमसंबंध एवढे वाढले की आरोपी जवान या युवतीला मद्य पाजून तिच्यावर वारंवार अतिप्रसंग करू लागला. लग्नाचे आश्वासन दिल्याने ती तरुणी त्याचा अत्याच सहन करत होती. मात्र, तो जवान लग्नाचा विषय टाळून तिची फसवणूक करत असल्याचे तिच्या लक्षात आले. त्यानंतर तिने आखाडा बाळापूर पोलीस ठाणे गाठून या प्रकरणी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.