ETV Bharat / state

Hingoli Farmer : ऐकावे ते नवलचं ! तरुण शेतकऱ्याने हेलिकॉप्टर खरेदीसाठी मागितले बँकेकडे कर्ज - हिंगोली शेतकरी हेलिकॉप्टर खरेदीसाठी मागितले बँकेकडे कर्ज

एका तरुण शेतकऱ्यांनी बँकेकडे ( young farmer applied loan for buy a helicopter ) थेट हेलिकॉप्टर खरेदीसाठी कर्ज मागितले आहे. त्यामुळे या मागणीची सर्वत्र एकच चर्चा रंगली आहे. कैलास पतंगे असे या तरूण शेतकऱ्याचे नाव आहे. हा शेतकरी सेनगाव तालुक्यातील ताकतोडा येथील ( Taktoda helicopter farmer ) रहिवासी आहे.

Hingoli Farmer
Hingoli Farmer
author img

By

Published : Jun 17, 2022, 7:35 PM IST

हिंगोली - आतापर्यंत आपण चार चाकी दोन चाकी तसेच घर खरेदीसाठी बँकेकडून कर्ज घेत असल्याचे पाहात आलो. मात्र चक्क एका तरुण शेतकऱ्यांनी बँकेकडे ( young farmer applied loan for buy a helicopter ) थेट हेलिकॉप्टर खरेदीसाठी कर्ज मागितले आहे. त्यामुळे या मागणीची सर्वत्र एकच चर्चा रंगली आहे. कैलास पतंगे असे या तरूण शेतकऱ्याचे नाव आहे. हा शेतकरी सेनगाव तालुक्यातील ताकतोडा येथील ( Taktoda helicopter farmer ) रहिवासी आहे. आपल्याकडे असलेल्या शेतीतून हेलिकॉप्टर खरेदी करता येत नाही. त्यामुळे बँकेने आपल्याला कर्ज द्यावे, अशी मागणी त्यांनी आपल्या अर्जात केली आहे. हेलिकॉप्टरला ताशी 65 हजार रुपये मिळत असल्याने यातून मोठा नफा मिळण्याची शक्यता आहे. शेती करून कोणताच व्यवसाय परवडेनासा झाला आहे. त्यामुळे हेलिकॉप्टर खरेदी करून त्यातून सर्वाधिक जास्त नफा मिळेल, अशी आशाही त्यांनी आपल्या अर्जात व्यक्त केली आहे.

नेहमीच करतात आगळे वेगळे प्रयोग : ताकतोडा येथील तरुण शेतकरी हे नेहमीच अशा प्रकारे आगळेवेगळे प्रयोग करून सर्वांचेच आकर्षण ठरत आहेत. एवढेच नव्हे तर मागील काही दिवसांपूर्वी याच गावातील तरुण शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना देखील पत्र देऊन दिवाळी साजरी न करता आल्याचे सांगितले होते. पुन्हा पेरणीच्या तोंडावर हेलिकॉप्टर खरेदी करण्याची मागणी केल्याने पुन्हा हे गाव चर्चेला आले आहे.

हेही वाचा - Sadabhau Khot : शरद पवारांकडून आपल्याला धोका; सदाभाऊ खोतांचा आरोप

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.