ETV Bharat / state

हिंगोलीत विजेचा धक्का लागून विद्यार्थ्याचा मृत्यू; नुकतीच दिली होती बारावीची परीक्षा

औंढा नागनाथ तालुक्यातील शिरड शहापूर येथे विजेचा धक्का लागून एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी घडली. जय जाधव (वय 17) असे मृत तरुणाचे नाव आहे. जय अंघोळीला जात असताना त्याला विजेचा धक्का लागला अन् तो जागीच कोसळला.

hingoli
हिंगोलीत विजेचा धक्का लागून तरुणाचा मृत्यू; नुकतीच दिली होती बारावीची परिक्षा
author img

By

Published : Mar 9, 2020, 2:40 PM IST

हिंगोली - औंढा नागनाथ तालुक्यातील शिरड शहापूर येथे विजेचा धक्का लागून एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी घडली. जय जाधव (वय 17) असे मृत तरुणाचे नाव आहे. जय अंघोळीला जात असताना त्याला विजेचा धक्का लागला अन् तो जागीच कोसळला.

हिंगोलीत विजेचा धक्का लागून तरुणाचा मृत्यू; नुकतीच दिली होती बारावीची परीक्षा

विजेचा धक्का लागल्याने तो बेशुद्ध पडला. त्याला उपचारासाठी तात्काळ रूग्णालयात दाखल केले. परंतू डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. काही कळण्याच्या आत घडलेल्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली. बालपणी जय ज्या शाळेत शिकला त्या बालवाडीच्या शाळेत त्याला श्रद्धांजली वाहण्यात आली.

हेही वाचा -हिंगोलीत 'जागतिक महिला दिनी'च दुसऱ्या महिलेने गळफास घेऊन संपविले जीवन

या घटनेची माहिती कुरूंदा पोलिसांना मिळताच पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात पाठवला. या प्रकरणी कोणतीही नोंद झालेली नाही. जयने नुकतीच बारावीची परीक्षा दिली होती. त्यामुळे नातेवाईकांसह मित्र परिवारामध्ये शोककळा पसरली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.