ETV Bharat / state

हिंगोली: हुंड्यासाठी गर्भवती विवाहितेला मारल्याचा आरोप; आई-वडिलांसह ग्रामस्थांचे उपोषण - हिंगोलीत विवाहितेचा छळ

गायत्री माधव खंदारे या विवाहितेस हुंड्यासाठी मारहाण करून सासरच्या मंडळींनी उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करून पसार झाले. दरम्यान उपचार सुरू असताना अतिरक्तस्त्राव झाल्याने तिचा मृत्यू झाल्यावर सासरच्या मंडळीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी आई-वडिलांसह ग्रामस्थांनी पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे.

हुंड्यासाठी गरोदर विवाहितेचा बळी
author img

By

Published : Aug 26, 2019, 9:53 PM IST

हिंगोली- हुंड्यासाठी मारहाण करून पिंपळखुटा येथील विवाहितेला सासरच्या मंडळीने उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करून ते पसार झाले. ही बाब विवाहितेच्या आई-वडिलांना समजल्यावर त्यांनी रुग्णालयात धाव घेऊन मुलीवर उपचार करवून घेतले. मात्र गंभीर मार लागल्याने अतिरक्तस्त्राव होऊन मुलीचा मृत्यू झाल्यावर सासरच्या मंडळीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी आई-वडिलांसह ग्रामस्थांनी पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे.

हुंड्यासाठी गरोदर विवाहितेचा बळी

गायत्री माधव खंदारे असे मयत महिलेचे नाव असून तिचा पिंपळखुंटा येथील तरुणाशी 2017 मध्ये विवाह झाला होता. सुरुवातीचे एक दोन वर्षे संसार सुखात सुरू होता. गायत्रीने एका कन्यारत्नास जन्म दिला दिला आणि ती दुसऱ्यांदा गरोदर होती. मात्र मागील काही दिवसांपासून गायत्रीला सासरची मंडळी हुंड्याचे पाच लाख आणि कार घेण्यासाठी माहेरहून पैसे आणण्यास सांगून त्रास देत होते. गायत्रीच्या आई-वडिलांची परिस्थिती हलाखीची असल्याने सासरच्या मंडळींचा ती निमुटपणे त्रास सहन करत होती. पोटात मार लागल्याने अतिरक्तस्त्राव झाल्यावर गंभीर अवस्थेत तिला उपचारासाठी दाखल केले. मात्र त्या ठिकाणावरून सासरकडील मंडळीने पळ काढला.

उपचारादरम्यान गायत्रीचा मृत्यू झाला. सेनगाव पोलीस ठाण्यात गायत्रीचे आई-वडील गुन्हा दाखल करण्यासाठी गेले होते. मात्र शवविच्छेदनाच्या अहवालानंतर गुन्हा दाखल केला जाईल असे सेनगाव पोलीसांनी सांगितले. महिना उलटूनही अजून अहवाल आला नाही. गुन्हा दाखल करण्यासाठी टाळाटाळ होत असल्याने आज जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर गायत्रीच्या आई-वडिलांसह ग्रामस्थ उपोषणास बसले आहेत. पोलीस प्रशासन आता काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Intro:हिंगोली तालुक्यातील पिंपळखुटा येथील येथील विवाहितेला हुंड्याच्या मागणीसाठी मारहाण करून तिला सासरच्या मंडळीने एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले, अन पळून गेले. सदरील बाब ही विवाहितेच्या आईवडीलाला समजल्यानंतर त्यांनी रुग्णालयात धाव घेऊन मुलीवर उपचार करून घेतले मात्र गंभीर मार लागल्याने मुलीचा अतिरक्स्त्राव होऊन मृत्यू झाला. त्यामुळे मुलीच्या सासरच्या मंडळीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी आईवडीलासह ग्रामस्थांनी पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे.

Body:गायत्री माधव खंदारे अस मयत महिलेचे नाव असून, गायत्रीचा दोन पिंपळ खुंटा येथील तरुणाशी 2017 मध्ये विवाह झाला होता. सुरुवातीचे एक दोन वर्षे संसार सुखात सुरू होता. गायत्रीने एका कन्यारत्नास जन्म दिला होता अन दुसऱ्यांदा गरोदर होती. मात्र मागील काही दिवसापासून गायत्रीला सासरची मंडळी हुंड्याचे पाच लाख अन कार घेण्यासाठी माहेरहून पैसे आणण्यासाठी नेहमी त्रास देण्यास सुरूवात केली. गायत्रीच्या आई वडिलांकडील गरीब परिस्थिती असल्याने सासरच्या मंडळींचा गायत्री निमुटपणे त्रास सहन करत होती. मात्र पोटात मारल्याने महिलेला अति रक्तस्त्राव झाला. अन गंभीर अवस्थेत तिला उपचारासाठी दाखल केले मात्र त्या ठिकणावरून सासरकडील मंडळीने पळ काढला.

Conclusion:उपचारादरम्यान गायत्रीचा मृत्यू झाला. सेनगाव पोलीस ठाण्यात गायत्रीचे आई वडील गुन्हा दाखल करण्यासाठी गेले होते मात्र शेवविच्छेदनाच्या अहवालानंतर गुन्हा दाखल केला जाईल असे सेनगाव पोलीस सांगत होते. महिना उलटूनही अजून अहवाल ही आला नाही, त्यामुळे गुन्हा दाखल करण्यासाठी टाळाटाळ होत आहे. त्यामुळे आज जिल्हापोलिस अधीक्षक कार्यालयासमोर गायत्रीच्या आई वडीलासह ग्रामस्थ उपोषणास बसले आहेत. पोलीस प्रशासन आता काय कारवाई करणार या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.,
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.