ETV Bharat / state

पुरातन विहिरीत आढळला महिलेचा मृतदेह; घात पात असण्याची शक्यता - hingoli women dead body in well

खटकाळी बायपास भागात असलेल्या पुरातन मंदिर परिसरात एक जुनी विहीर आहे. या विहिरीत महिलेचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळला. घटनेची माहिती कळताच ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बळीराम बंदखडके यांच्यासह पथकांनी घटनास्थळी धाव घेतली.

पुरातन विहिरीत आढळला महिलेचा मृतदेह
पुरातन विहिरीत आढळला महिलेचा मृतदेह
author img

By

Published : Feb 15, 2021, 3:37 PM IST

हिंगोली - शहरापासून काही अंतरावर असलेल्या खटकाळी प्राचीन मंदिराजवळ पुरातन विहिरीत एका महिलेचा मृतदेह आढळला आहे. मृतदेह बाहेर काढल्यानंतर महिलेच्या हाताची नस कापल्याचे दिसून आले. त्यामुळे ही आत्महत्या की खून हे अजून स्पष्ट झालेले नाही, घटनेने एकच खळबळ उडालेली आहे.

पुरातन विहिरीत आढळला महिलेचा मृतदेह; घात पात असण्याची शक्यता

घटना काय घडली?
ऐश्वर्या श्रीरामे असे मृत महिलेचे नाव आहे. खटकाळी बायपास भागात असलेल्या पुरातन मंदिर परिसरात एक जुनी विहीर आहे. या विहिरीत महिलेचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळला. घटनेची माहिती कळताच ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बळीराम बंदखडके यांच्यासह पथकांनी घटनास्थळी धाव घेतली. नागरिकांच्या मदतीने महिलेचा मृतदेह पाण्याबाहेर काढला. तर महिलेच्या उजव्या हाताची नस कापल्याचे आढळून आले आहे. तसेच त्या विहिरीच्या काठाला देखील रक्ताचे डाग लागलेले दिसलेले आहेत. त्यामुळे ही आत्महत्या की खून हे अजून कळू शकले नाही. घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आला आहे. या प्रकरणाचा बारकाईने तपास करण्यात येत आहे.

हेही वाचा - जळगावमध्ये ट्रक उलटून 15 मजूर ठार; किनगावजवळ घडला भीषण अपघात

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.