ETV Bharat / state

दीड वर्षाच्या चिमुरडीसमोरच गळफास घेऊन आईची आत्महत्या

हिंगोलीमधील शिवणी खुर्द येथे आईने आपल्या दीड वर्षाच्या चिमुरडीसमोर आत्महत्या केली. चिमुरडीच्या रडण्याने कुटुंबीयांनी घरात धाव घेतली असता तिने आत्महत्या केल्याचे समजले. त्यामुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

प्रतिकात्मक छायाचित्र
प्रतिकात्मक छायाचित्र
author img

By

Published : Jan 29, 2020, 8:04 AM IST

हिंगोली - आईने आपल्या दीड वर्षाच्या चिमुकलीसमोरच घरातील पंख्याला गळफास घेऊन जीवन संपवले. कळमनुरी तालुक्यातील शिवणी खुर्द येथे ही घटना घडली असून रक्षदा अरविंद ढेंगळे (२४), असे मृत महिलेचे नाव आहे. या घटनेनंतर चिमुरडीकडे पाहून गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

दीड वर्षाच्या चिमुरडीसमोरच गळफास घेऊन आईची आत्महत्या

रक्षदा यांचे सासू सासरे नियमितपणे शेतात काम करण्यासाठी गेले होते, तर पती अरविंद हा कामानिमित्त कळमनुरी येथे गेला होता. रक्षदा ही आपल्या दीड वर्षीय चिमुरडीसह घरीच होती. शेतातून दुपारच्यावेळी सासू सासरे घरी परतले. त्यावेळी चिमुरडीचा रडण्याचा आवाज येत होता. त्यामुळे सासू सासऱ्याने घरात धाव घेतली, तर सून पंख्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली. त्यामुळे सासू सासऱ्याने आरडाओरड करताच शेजाऱ्यांनी घटनास्थळी धाळ घेतली.

घटनेची माहिती मिळताच कळमनुरीचे पोलीस उपाधीक्षक अहमद गाणी, पोलीस निरीक्षक रंजित भोईटे, ज्ञानोबा मुलगीर, साहेबराव गायकवाड, श्यामराव गुहाडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी कळमनुरी येथील उपजिल्हारुग्णालयात पाठवण्यात आला. त्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला. मात्र, आत्महत्या करण्यामागचे कारण अजूनही अस्पष्ट आहे. चिमुरडीकडे बघून संपूर्ण गाव हळहळ व्यक्त करीत आहे. याप्रकरणी अद्याप कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही. मात्र, कळमनुरी पोलीस अति बारकाईने तपास करीत आहे. आता पोलिसांच्या तपासात नेमके काय उघड होते? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, एका दिवसात दोन आत्महत्येच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

Intro:

हिंगोली- आपल्या दीड वर्षाच्या चिमुकली समोरच आईने घरातील पंख्याला गळफास घेऊन आपले जीवन संपविल्याची ह्रदय पिळवटून टाकणारी घटना कळमनुरी तालुक्यातील शिवणी खुर्द येथे
घडलीय. या घटनेने गावासह परिसरात एकच खळबळ उडालीय.

Body:रक्षदा अरविंद ढेंगळे (२४) अस मयत महिलेचे नाव आहे. रक्षदा यांचे सासू सासरे नियमितपणे शेतात काम करण्यासाठी निघून गेले तर पती अरविंद हा कामानिमित्त कळमनुरी येथे गेला होता. तर रक्षदा ही आपल्या दीड वर्षीय चिमुरडीसह घरीच होती. शेतातून दुपारच्या वेळी जेव्हा सासू सासरे घरी परतले तेव्हा चिमुरडीचा रडण्याचा आवाज येत होता. त्यामुळे सासूसाऱ्याने गतीने घरात धाव घेतली तर सून पंख्याला गळफास घेतलेल्यावस्थेत आढळून आली. त्यामुळे सासू साऱ्याने एकच आरडा ओरड केली तर गावतील ग्रामस्थांनी बघण्यासाठी एकच गर्दी केली. घटनेची माहिती कळमनुरी पोलीस उपअधीक्षक अ. गाणी, पोनि रंजित भोईटे, ज्ञानोबा मुलगीर, साहेबराव गायकवाड, श्यामराव गुहाडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेचा पंचनामा करून मृतदेह शेवविच्छेदनासाठी कळमनुरी येथील उपजिल्हारुग्णालयात हलविला. शेवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या स्वाधीन केला. Conclusion:मात्र आपल्या चिमुरडी समोर आईने आत्महत्या करण्याचे कारण अजून तरी अस्पष्ट आहे. मात्र चिमुर्डीकडे बघून संपूर्ण गाव हळहळ व्यक्त करीत आहे. या प्रकरणी अजून तरी कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही. मात्र कळमनुरी पोलीस अति बारकाईने तपास करीत आहे. आता पोलिसांच्या तपासात नेमकं काय उघड होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. एकंदरीतच एका दिवसात दोन आत्महत्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.