ETV Bharat / state

हिंगोली जिल्ह्यात घोटभर पाण्यासाठी नागरिकांचा जीवाशी खेळ

टँकरने विहिरीत सोडलेले पाणी काही मिनिटात संपत असल्याचे चित्र हिंगोली जिल्ह्यात पाहायला मिळत आहे.

author img

By

Published : May 20, 2019, 2:37 PM IST

पाण्यासाठी गावकऱ्यांची पडलेली गर्दी

हिंगोली - जिल्ह्यात यंदा भीषण पाणीटंचाई निर्माण झालेली असून टँकरची संख्या ५३ वर जाऊन पोहोचली आहे. टँकरच्या प्रतिक्षेत बसलेले नागरिक टँकर गावात येताच विहिरीकडे सुसाट वेगाने हातात भांडे घेऊन धाव घेतात. टँकरने विहिरीत सोडलेले पाणी काही मिनिटात संपत असल्याचे चित्र येथे पाहायला मिळते.

सध्या जिल्ह्यातील बऱ्याच गावाची तहान टँकरच्या पाण्यावर अवलंबून आहे. सध्या ३९ गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो. ३४० गावांमध्ये ४१५ विहीरी व बोअरचे अधिग्रहण करण्यात आलेले आहे. तर ४४ गावांत नळ योजना दुरुस्तीच्या प्रस्तावास तर, 8 गावात तात्पुरत्या नळ दुरुस्तीला मंजुरी मिळाली आहे. १३९ विंधन विहिरीला (बोअर) मंजुरी मिळाली आहे. हिंगोली प्रशासन पाणीटंचाई निवारण करण्यासाठी दक्ष आहे. जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी पाणीटंचाई या बाबतीत कोणत्याच अडी-अडचणी खपवून घेणार नसल्याच्या कडक सूचनाच अधिकारी कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत.

त्यानुसार अधिकारी कर्मचारी टंचाईग्रस्त गावांवर लक्ष ठेवून आहेत. लोकसंख्येच्या तुलनेत मंजूर झालेल्या टँकरच्या फेऱ्यांमध्ये पुन्हा वाढ करण्यात आली आहे. मात्र, सध्या भयंकर परिस्थिती निर्माण झाली आहे. टँकरची संख्या वाढवूनही टँकरचे पाणी विहिरीत टाकले न टाकले की, काही मिनिटांत विहिर तळ गाठते. आपल्या जीवाची जराही पर्वा न करता ग्रामीण भागात विहिरीतून पाणी काढतात. जवळपास एक टँकर दहा ते पंधरा मिनिटात रिकामा होता. अजूनही टँकरची संख्या वाढतच आहे. जिल्ह्यातील पाचही तालुक्यात दोन दिवसांपूर्वी पार पडलेल्या टंचाई प्राधान्य बैठकीत ग्रामसेवक, तलाठी आणि सरपंचांकडून गावातील पाणीटंचाईच्या परिस्थितीचा आढावा घेत, प्रशासनाला माहिती कळविण्याच्या सूचना उपविभागीय अधिकारी, तहसीलदारांनी दिल्या. यावरूनच प्रशासन पाणीटंचाई निवारणासाठी सज्ज असल्याचे दिसून येत आहे.

टँकर चे पाणी भरण्यासाठी नागरिकांची धांदलघाई

विहिरीत टँकर रिचवताच काही मिनिटात होतेय विहीर  कोरडी

हिंगोली- हिंगोली जिल्ह्यात यंदा भीषण पाणीटंचाई निर्माण झालेली आहे. प्रशासन पाणीटंचाई निवारणासाठी सज्ज आहे जिल्ह्यात टँकरची संख्या 53 वर जाऊन पोहोचली. टँकर सुरू झालेल्या गावात एवढी भयंकर परिस्थिती निर्माण झालेली आहे टँकरच्या प्रतीक्षेत बसलेले नागरिक टँकर गावात येतात विहिरीकडे सुसाट वेगाने हातात भांडे घेऊन धाव घेतात टँकरचे पाणी विहिरीत सोडतात क्षणी काही मिनिटात विहीर कोरडी पडते. 

सध्या हिंगोली जिल्ह्यातील बऱ्याच गावातील लहान ही टँकरच्या पाण्यावर अवलंबून आहे आज घडीला 39 गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो तर 340 गावात 415 विहीर व बोअरचे अधिग्रहण करण्यात आलेले आहे तर 44 गावात नळ योजना दुरुस्तीच्या प्रस्तावास तर 8 गावात तात्पुरत्या नळ दुरुस्तीला मंजुरी मिळाली आहे. 139 विंधन विहरीला मंजुरी मिळाली आहे. हिंगोली चे प्रशासन पाणीटंचाई निवारण करण्यासाठी दक्ष आहे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी पाणीटंचाई या बाबतीत कोणत्याच अडी-अडचणी खपवून घेणार नसल्याच्या कडक सूचनाच अधिकारी कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत. त्यानुसार अधिकारी कर्मचारी टंचाईग्रस्त गावां मध्ये लक्ष ठेवून आहेत.  लोकसंख्येच्या तुलनेत मंजूर झालेल्या टँकर च्या फेऱ्या मध्ये पुन्हा वाढ करण्यात आली आहे.  मात्र आज घडीला भयंकर परिस्थिती निर्माण झाली आहे. टँकर चू संख्या वाढवूनही टँकर चे पाणी विहिरीत टाकले न टाकले की, काही मिनिटात विहिर तळ गाठते. आपल्या जीवाची जराही पर्वा न करता  ग्रामीण भागात विहिरीतुन पाणी काढतात. जवळपास एक टँकर दहा ते पंधरा मिनिटात रिकामे होते. अजूनही टँकरची संख्या वाढतच आहे. जिल्ह्यातील पाच ही तालुक्यात दोन दिवसापूर्वी पार पडलेल्या टंचाई प्राधान्य बैठकीत ग्रामसेवक, तलाठी आणि सरपंचांना गावातील पाणीटंचाईच्या परिस्थितीचा आढावा घेत, प्रशासनाला माहिती कळविण्याच्या सुचना उपविभागीय अधिकारी, तहसीलदारानी दिल्या. या वरूनच प्रशासन पाणीटंचाई निवारणासाठी सज्ज असल्याचे दिसून येत आहे. 

व्हिज्युअल ftp केले आहेत

MH_HIN_VIS01_WATER SHORTAGE_7203736

या फाईल नेमणे 

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.