ETV Bharat / state

नागरिकांनो आता घरपोहच मिळेल औषधं, भाजीपाला अन् किराणा; हिंगोली नगरपालिकेने केली व्यवस्था - हिंगोली लॉकडाऊन

नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी प्रशासन अतोनात प्रयत्न करत आहे. हिंगोली येथे नागरिकांनी घराबाहेर पडू नये यासाठी प्रशासन विविध उपायोयजना करत आहे. शहरातील नागरिकांना भाजीपाला, किराणा आणि औषधे पुरवण्याची व्यवस्था प्रशासनाने केली आहे.

Vegetables
भाजीपाला
author img

By

Published : Apr 9, 2020, 11:10 AM IST

हिंगोली - संपूर्ण राज्यात कोरोनामुळे आणीबाणी सारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. अशाही स्थितीत नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी प्रशासन अतोनात प्रयत्न करत आहे. हिंगोली येथे नागरिकांनी घराबाहेर पडू नये यासाठी प्रशासन विविध उपायोयजना करत आहे. आता भाजीपाला, किराणा, औषधी घरपोहच देण्याची व्यवस्था हिंगोली नगरपालिकेने केली आहे.

शहरातील नागरिकांना भाजीपाला, किराणा आणि औषधे पुरवण्याची व्यवस्था प्रशासनाने केली आहे. त्यानुसार नागरिकांना आता अजिबात घराच्या बाहेर पडण्याची गरज नाही. शहरात वाहनावरही बंदी घातलेली असल्याने नगर पालिकेची ही मदत खरोखरच नागरिकांच्या गरजा भागवणारी आहे. सफाई कामगारही न थकता शहर स्वच्छ ठेवण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करत आहेत.

कोरोना लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी रामदास पाटील यांनी नागरिकांच्या मदतीसाठी अनेक सामाजिक संस्था, नागरिकांना मदतीचे आवाहन केले. यामुळे अनेकांनी आपला मदतीचा हात पुढे केला. नागरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी गल्लोगल्ली फिरून गरजवतांची यादी तयार केली. लॉकडाऊन संपेपर्यंत भाजप आमदार तान्हाजी मुटकुळे यांनी या नागरिकांना भोजन पुरवण्याची जबाबदारी स्वीकारली. तसेच अनेक मुस्लिम संघटना देखील भोजन पुरवण्यासाठी पुढे सरसावल्या आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.