ETV Bharat / state

पुन्हा लॉकडाऊन जाहीर करताय तर प्रत्येकाच्या खात्यात १० हजार टाका, वंचितची मागणी

हिंगोलीमध्ये पुन्हा लॉकडाऊन करण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलाय. यामुळे सर्वसामान्यांचे हाल पुन्हा होऊ शकतात. त्यामुळे निदान लोकांच्या खात्यावर 10- 10 हजार रुपये टाकावेत अन् लॉकडाऊन लावावा, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे.

Van̄cita bahujana āghāḍī
वंचित बहुजन आघाडी
author img

By

Published : Aug 4, 2020, 7:00 PM IST

हिंगोली - अगोदरच कोरोनामुळे जिल्ह्यातील प्रत्येक सर्वसामान्य व्यक्ती हा सैरावैरा झाला आहे. ते दररोज मजुरी करून खाण्यापिण्याची व्यवस्था करीत असतात. मात्र, 3 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी 6 ते 19 या कालावधी लॉकडाऊनची घोषणा केली आहे. त्यामुळे लोकांनी नेमकं कसं खावं अन् जीवन जगावं हा प्रश्न निर्माण होणार आहे. त्यामुळे निदान लोकांच्या खात्यावर 10- 10 हजार रुपये टाकावेत अन् लॉकडाऊन लावावा, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आली. आज हिंगोली येथील गांधी चौक भागातील संविधान कॉर्नर येथे घोषणाबाजी केली. मागण्या पूर्ण न केल्यास लॉकडाऊन तोडण्यासाठी वंचित बहुजन आघाडी आंदोलन करणार असल्याचा इशारा जिल्हाध्यक्ष वशिम देशमुख यांनी दिला आहे.

संपूर्ण जगभरात खळबळ उडविलेल्या कोरोनामुळे हिंगोली जिल्ह्यात गेल्या तीन ते चार महिन्यापासून भयंकर परिस्थिती निर्माण झालेली आहे. याच कालावधीत केलेल्या लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य लोकांजवळील असलेली जमापुंजी पूर्णपणे संपलेली आहे. यामध्ये कामगार, बांधकाम कामगार, रोजगार, व्यापारी, फळ विक्रेते, फुल विक्रेते, हातगाडी, आदी हातावर पोट असणारे हतबल झालेले आहेत. तरीदेखील कोरोनाची साखळी रोखण्यासाठी प्रशासनाच्या वतीने परत 6 ते 19 ऑगस्ट, असा लॉकडाऊन करण्याची घोषणा 3 ऑगस्टला जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी पत्रकार परिषदेमध्ये केली आहे.

नव्याने करण्यात येणाऱ्या लॉकडाऊनमुळे प्रत्येकांना जीवन जगण्याचा प्रश्न निर्माण होणार आहे. त्यामुळे प्रशासनाला जर लॉकडाऊन लावायचाच असेल, तर सर्वप्रथम प्रशासनाच्या वतीने कुटुंब प्रमुखांच्या खात्यावर प्रतिमहिना 10 हजार रुपये जमा करावेत. तसेच रेशन दुकानावरून प्रतिव्यक्ती तांदूळ आणि गहू 15 किलो देण्यात यावे. त्याचबरोबर दुर्बल घटकातील व्यक्तींना बेरोजगार भत्ता कायमस्वरूपी देण्यात यावा. तसेच मुख्य म्हणजे 7 जुलैपासून बँकमधील जी काय प्रक्रिया बंद आहे, ती प्रक्रिया पुन्हा एकदा सुरू करण्यात यावी. त्याचबरोबर बँकमधील सोईसुविधांसाठी विशेष मोहीम राबविण्यात यावी. शासन स्तरावरील लॉकडाऊनमुळे जी अर्थव्यवस्था डगमगली आहे. त्याला तत्काळ पीक कर्ज देण्यात यावे, अशा वेगवेगळ्या मागण्यांसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आंदोलन करण्यात आले आहे.

लॉकडाऊनचे आदेश रद्द न केल्यास वंचित बहुजन आघाडी रस्त्यावर उतरणार आहे आणि लॉकडाऊन रद्द करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. आता जिल्हाधिकारी काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विविध मागण्यांचे निवेदन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी यांना दिले आहे, तर आंबेडकरराईट पार्टीच्याही वतीने लॉकडाऊन कालावधी कमी करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्या मार्फत राष्ट्रपती यांना निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनावर ऍड. रावण धाबे सह आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.