ETV Bharat / state

Boycott on the Backward Community in Hingoli : गायरान जमिनीत निळा झेंडा लावला म्हणून मागासवर्गीय समाजावर टाकला बहिष्कार - पोलीस निरीक्षक रणजित भोईटे

सेनगाव तालुक्यातील सावरखेडा येथे असलेल्या गायरान जमिनीवर गावातील एका विशिष्ट समाजाने ताबा करीत तेथे स्मशानभूमी व मंगल कार्यालय ( Savarkheda land dispute issue ) उभारले आहे. त्या पाठोपाठ येथील मागासवर्गीय समाजाने उर्वरित गारायन जमिनीवर बौद्ध मंदिर बांधण्याच्या उद्देशाने निळा झेंडा ( Blue flag for Budha Temple construction ) रोवला. याचाच राग मनात धरून येथील विशिष्ट जातीमधील लोकांनी मागासवर्गीय लोकांवर बहिष्कार टाकला आहे.

सावरखेडा
सावरखेडा
author img

By

Published : Feb 7, 2022, 9:09 PM IST

Updated : Feb 7, 2022, 9:24 PM IST

हिंगोली- पुरोगामी अशी ओळख असलेल्या महाराष्ट्रात लाजीरवाणी ( bad incident in progressive Maharashtra ) घटना समोर आली आहे. जिल्ह्यातील सावरखेडा येथे गायरान जमिनीत निळा झेंडा लावल्याने मागासवर्गीय समाजावर गावातील विशिष्ट लोकांनी बहिष्कार टाकल्याची धक्कादायक ( Upper community boycotted the backward community )घटना घडली आहे. दलित समाजातील लोकांना धान्य दळण दळून दिले जात नाही. तसेच दुकानांमध्ये सामान दिले जात नाही. या प्रकरणी वंचित बहुजन आघाडीच्यावतीने पोलीस अधिक्षकाकडे तक्रार ( Vanchit Bahujan Aghadi Police complaint ) दाखल केली आहे.

सेनगाव तालुक्यातील सावरखेडा येथे असलेल्या गायरान जमिनीवर गावातील एका विशिष्ट समाजाने ताबा करीत तेथे स्मशानभूमी व मंगल कार्यालय ( Savarkheda land dispute issue ) उभारले आहे. त्या पाठोपाठ येथील मागासवर्गीय समाजाने उर्वरित गारायन जमिनीवर बौद्ध मंदिर बांधण्याच्या उद्देशाने निळा झेंडा ( Blue flag for Budha Temple construction ) रोवला. याचाच राग मनात धरून येथील विशिष्ट जातीमधील लोकांनी मागासवर्गीय लोकांवर बहिष्कार टाकला आहे.

मागासवर्गीय समाजावर हिष्कार

हेही वाचा-VIDEO : पुण्यातील ब्राम्हण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवेंचा शिवसेनेला रामराम; हिंदू महासंघाच्या माध्यमातून मनपा निवडणूक लढवणार

मागासवर्गीयांना या सेवेपासून ठेवले जात आहे वंचित
सावरखेडा येथील गिरणीवरील दळण मागासवर्गीय समाजासाठी बंद करण्यात आले आहे. तसेच गावात असलेल्या हनुमान मंदिरावर विशिष्ट मंडळींनी बैठक घेऊन
मागासवर्गीय समाजाला दुकानावरील सामान देणे बंद केले. एवढेच नव्हे तर वाहनाने प्रवास देखील नाकारण्यात आला. गावातील विशिष्ट समाजाने एवढ्यावर न थांबता गावात परगावावरून येणाऱ्या दुकानदारालाही मागासवर्गीय समाजाला किराणा सामान न देण्याचे सांगितले. या संपूर्ण प्रकारामुळे मागासवर्गीय लोकांनवर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे.

हेही वाचा-Gas Geyser Accident Nashik : गॅसगिझर गळतीने महिला वैमानिकेचा मृत्यू; नाशिकमधील पंधरा दिवसातील दुसरी घटना

लेकींवर आली पायपीट करण्याची वेळ
सावरखेडा येथील असलेल्या मागासवर्गीय समाजातील महिला ही नेहमीप्रमाणे मुले व नातेवाईकांसह पानकनेरगाव येथे आपल्या गावाकडे जात होती. मात्र, काही लोकांनी तिला आवाज देऊन ऑटोमधून खाली उतरविले. त्यामुळे महिलेला मुलांसह शेवटी पायपीट करण्याची वेळ येऊन ठेपली होती. या संपूर्ण प्रकाराने सावरखेडा येथील मागासवर्गीय समाज गोंधळून गेलेला आहे. या प्रकरणात पोलीस प्रशासनाने लक्ष देऊन वाद मिटवण्याचा प्रयत्न जात आहे.

हेही वाचा-Mumbai Share Market Update :मुंबई शेअर बाजारात दिवसाखेर 1,024 अंशांची पडझड

दोन्ही समाजाची बैठक घेऊन घेतले लिखित
सावरखेडा येथील वाद पेटत गेल्याने संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती. ही माहिती पोलीस प्रशासनाला माहिती मिळताच सेनगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रणजित भोईटे हे अधिकारी व कर्मचाऱ्यासह गावात दाखल झाले. त्यांनी दोन्ही समाज एकत्र बसवून त्यांची समजूत काढत एकमेकांचे म्हणणे ऐकून घेतले. दोन्ही समाजातील गैरसमज दूर केले. दोन्हीही समाजाकडून यापुढे असे वाद करणार नाही, असे लिहून घेतल्याचे पोलीस निरीक्षक रणजीत भोईटे यांनी सांगितले. तसेच विशिष्ट समाजाकडून बहिष्कार टाकणार नसल्याचे लिहून घेतल्याचेही त्यांनी सांगितले.

Last Updated : Feb 7, 2022, 9:24 PM IST

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.