ETV Bharat / state

चालत्या ट्रकमधून फेकून दिल्याने अज्ञात व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू - died during treatment

रक औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात आणत असताना चालकाने शिरड शहापूर येथे रस्त्याच्या कडेला गाडी लावून पळ काढला. यामुळे पोलिसांनी तो ट्रक पोलीस ठाण्यात आणला. मालवाहतूक गाडीच्या मालकाचा आणि चालकाचा शोध पोलीस घेत असतनाच, या अज्ञात जखमीचा मृत्यू झाला आहे.

मृत अज्ञात इसम
author img

By

Published : Jul 28, 2019, 2:05 PM IST

हिंगोली - औंढा नागनाथ तालुक्यातील शिरड शहापूर पासून काही अंतरावर एका ट्रकमधून अज्ञात व्यक्तीला फेकून दिल्याची घटना शनिवारी पहाटेच्या सुमारास घडली. ही बाब काही नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी जखमी व्यक्तीला औंढा नागनाथ येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तेथे प्राथमिक उपचार करून त्याला पुढील उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, आज त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

मनमाडहून नांदेडकडे जाणाऱ्या, धावत्या ट्रकमधून त्याला फेकण्यात आले होते. मात्र, त्यावेळी ही घटना पाहणाऱ्या काही सजग युवकांनी या जथमीला उपचारासाठी दाखल करत ट्रकचा पाठलाग केला. पुढे तो ट्रक अडवून चालकाला पोलिसांच्या हवाली केले. त्यानंतर तो ट्रक औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात आणत असताना चालकाने शिरड शहापूर येथे रस्त्याच्या कडेला गाडी लावून पळ काढला. यामुळे पोलिसांनी तो ट्रक पोलीस ठाण्यात आणला. मालवाहतूक गाडीच्या मालकाचा आणि चालकाचा शोध पोलीस घेत असतनाच, या अज्ञात जखमीचा मृत्यू झाला आहे.

hingoli
औंढा नागनाथ पोलिसांनी ताब्यात घेतलेली मालवाहू ट्रक

याप्रकरणी अजून कोणताही गुन्हा दाखल झालेला नसून औंढा नागनाथ पोलीस मृत व्यक्तीच्या नातेवाईकांचा शोध घेत आहेत. तसेच हा इसम फेकून दिल्यापासून बेशुद्ध अवस्थेत असल्याने, घटने मागील सत्य अजुनही गुलदस्त्यात आहे. मात्र चक्क धावत्या ट्रेलर मधून एका अज्ञात इसमाला फेकल्यामुळे जिल्ह्यात चांगलीच खळबळ उडाली आहे

Intro:औंढा नागनाथ तालुक्यातील शिरड शहापूर पासून काही अंतरावरच एका चालत्या ट्रेलर मधून अनोळखी इसमाला फेकून दिल्याची घटना शनिवारी पहाटेच्या सुमारास घडली होती. ही बाब काही नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी जखमी इसमाला औंढा नागनाथ येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले तेथे प्राथमिक उपचार करून सदरील इसमाला पुढील उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात रेफर केले होते. हिंगोली येथे उपचारादरम्यान आज इसमाचा मृत्यू झालाय.Body:मनमाड हुन नांदेड कडे जाणाऱ्या धावत्या ट्रेलर मधून अज्ञात इसम आला फेकून दिल्याच्या घटनेने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती काही सजग युवकांनी सदरील इसमाला उपचारासाठी दाखल करत त्या ट्रेलरचा पाठलाग करून त्याला पोलिसांच्या हवाली केले. ट्रेलर औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात आणत असताना चालकाने शिरड शहापूर येथे रस्त्याच्या कडेला ट्रेलर लावून धूम ठोकली त्यामुळे ट्रेलर पोलिस कर्मचाऱ्याने चालवत आणत औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात लावलाय. ट्रक मालकाचा आणि चालकाचा शोध पोलीस घेत असताना या अज्ञात इसमाचा मृत्यू झालाय.Conclusion:औंढानागनाथ पोलीस मयत झालेल्या अनोळखी इसमाचा नातेवाइकांचा शोध घेत आहेत याप्रकरणी अजून तरी कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही. तसेच इसम हा फेकून दिल्यापासून बेशुद्ध अवस्थेत असल्याने घटनेचे खरे कारणही अद्याप समजू शकलेले नाही. मात्र चक्क धावत्या ट्रेलर मधून एका अनोळखी इसमाला फेकल्यामुळे जिल्ह्यात चांगलीच खळबळ उडाली.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.