ETV Bharat / state

Nitin Gadkari in Hingoli : मंत्री नितीन गडकरींनी दिली कोट्यवधी रुपयांच्या निधीस मंजुरी; हिंगोलीतील सभेत पैशांचा पाऊस - Nitin Gadkari inaugurated roads project

केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी हे हिंगोली जिल्हा दौऱ्यावर आले होते. त्यांनी महाराष्ट्रातील अनेक रस्त्यांचे लोकार्पण केले तर कोट्यवधी रुपयांच्या निधीला देखील मंजुरी दिली. तर दुसरीकडे सभेस येणाऱ्यांवर देखील पैशांची उधळण केल्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे.

Union Minister Nitin Gadkari
नितीन गडकरी
author img

By

Published : Feb 25, 2023, 7:00 PM IST

Updated : Feb 25, 2023, 9:36 PM IST

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हिंगोलीतील सभेत बोलताना

हिंगोली: येथील रामलीला मैदानावर केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले. विविध विकासकामांचे भूमिपूजन तसेच लोकार्पण केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. दरम्यान, या सभेसाठी येणाऱ्या कार्यकर्त्यांवर पैशांची उधळण झाल्याच्या व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. या सभेमध्ये जिल्ह्यातील विविध भागातून कार्यकर्ते व नागरिक, महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.

50 हजार कोटी रूपयांची कामे: हिंगोलीत आयोजित कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कोट्यवधी रूपयांच्या निधीला मंजुरी दिली. यावेळी मंत्री गडकरी म्हणाले की, देशात सर्वत्र राष्ट्रीय महामार्गाचे जाळे पसरल्याने आता प्रवास करणे सोयीचे झाले आहे. गेल्या आठ वर्षात 50 हजार कोटी रुपयांची रस्त्याची कामे करण्याची संधी मिळाली. आतापर्यंत एका कंत्राटदाराला घरापर्यंत येऊ देण्याची वेळ आणली नाही, परंतु रस्ता खराब केला तर त्याला अजिबात सोडले नाही, हा जनतेचा पैसा आहे आणि त्यातुन रस्ता चांगला झाला पाहिजे, अशी आपली भूमिका असल्याचे गडकरी यांनी सांगितले.

हळद क्लस्टरसाठी 100 एकर जागा: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हळद संशोधन केंद्राच्या बाबतीत म्हणाले की, रस्त्यालगत सरकारी जागा उपलब्ध करून दिल्यास त्या ठिकाणी लाॅजेस्टीक पार्क उभारला जाईल तसेच 100 एकर जागेवर हळद क्लस्टरसाठी देतो. या ठिकाणी हळदीचे लोणचे, तेल, क्रीम, औषधी तयार करण्याचे उद्योग सुरु करण्याचे त्यांनी सुचवले. त्यातून हिंगोली जिल्हा भारताच्याच नव्हे तर जगाच्या नकाशावर पोहोचवा, अशी अपेक्षाही मंत्री गडकरी यांनी व्यक्त केली.

सभेसाठी येणाऱ्यांवर पैशाची उधळण?: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या सभेसाठी येणाऱ्यांवर देखील मोठा पैसा उधळण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे ज्या वाहनाला पैसे दिले त्या वाहनावर विशिष्ट असे स्टिकर तसेच त्या वाहनाला झेंडा देखील लावण्यात येत होता. हे झेंडे व स्टिकर लावून घेण्यासाठी वाहनांची एकच गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले. पैसे दिल्यानंतर सदरील वाहनावर स्टिकर पुढे रवाना करण्यात येत होते. एका कार्यकर्त्याने कमी पैसे दिले जात असल्याचे व्हिडीओच्या माध्यमातून स्पष्ट केले. याच कार्यकर्त्यांनी कमी पैसे दिले जात असल्याने पैसे जमिनीवर फेकून दिल्याचेही दिसून आले. तेव्हा कुठे या कार्यकर्त्याची समजूत काढून त्याला ठरल्याप्रमाणे पैसे दिले आणि त्याचे वाहन पुढे रवाना केल्याचा सर्व प्रकार सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे.

कार्यक्रमात शेतकऱ्यांचा गोंधळ: मंत्री नितीन गडकरी यांच्या याच कार्यक्रमात काही शेतकऱ्यांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यक्रमात सुरूवातीला दोन जणांनी गोंधळ घालण्यात प्रयत्न केला. मात्र दोघांनाही पोलिसांनी तत्काळ ताब्यात घेतले. हिंगोलीत गडकरींच्या हस्ते दोन महामार्गाचं उद्घाटन कार्यक्रमादरम्यान हा गोंधळ झाला.

हेही वाचा: Maharashtra Budget 2023 : राज्याच्या तिजोरीत खडखडाट; अर्थसंकल्प सादर करताना फडणवीसांचा लागणार कस

Last Updated : Feb 25, 2023, 9:36 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.