ETV Bharat / state

तरुणीचा चोरून काढलेला व्हिडिओ टिक-टॉकवर व्हायरल करणे पडले महागात

कळमनुरी तालुक्यातील जवळा पांचाळ येथील दोन तरुणांना महाविद्यालयीन विद्यार्थीनीचा चोरून व्हिडिओ बनवणे आणि तो व्हिडिओ टिकटॉक, व्हॉट्सअ‌ॅपवर व्हायरल करणे चांगलेच महागात पडले आहे. विद्यार्थिनीने दिलेल्या तक्रारीवरून बाळापूर पोलीस ठाण्यात या दोन्ही तरुणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

balapur police station hingoli
चोरून व्हिडीओ काढल्यामुळे आणि टिकटॉकवर प्रसारित केल्यामुळे हिंगोलीत दोन तरुणांना अटक
author img

By

Published : Jan 20, 2020, 3:18 PM IST

हिंगोली - कळमनुरी तालुक्यातील जवळा पांचाळ येथील दोन तरुणांना महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा चोरून व्हिडिओ बनवणे आणि तो व्हिडिओ टिकटॉक, व्हॉट्सअ‌ॅपवर व्हायरल करणे चांगलेच महागात पडले आहे. विद्यार्थिनीने दिलेल्या तक्रारीवरून बाळापूर पोलीस ठाण्यात या दोन्ही तरुणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.

आरिफ खान करीम खान पठाण, अमेर उर्फ अम्मू अमीर खान अब्दुल गफार खान पठाण अशी या दोन तरुणांची नावे आहे. हे दोघेही जवळा पांचाळ येथील रहिवासी आहेत.

चोरून व्हिडिओ काढल्यामुळे आणि टिकटॉकवर प्रसारित केल्यामुळे हिंगोलीत दोन तरुणांना अटक

हेही वाचा... राज्यात आपलेच सरकार, एनआरसी कायदा लागू होऊ देणार नाही

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हे दोघेही, मागील काही दिवसांपासून गावातील बसस्थानक परिसरात बसून अर्धापूर येथे खासगी शिकवणीला ये-जा करणाऱ्या महाविद्यालयीन विद्यार्थिनीवर पाळत ठेवत होते. एवढेच नव्हे तर तिला छेडण्याचा देखील प्रयत्न केला होता. हे दोघे एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी त्या विद्यार्थिनीसोबत जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. तिने याचा विरोध केला असता, आरोपींनी तिचा चोरून व्हिडिओ बनवला.

हेही वाचा... आमदार संजय शिरसाठ व उपमहापौर जंजाळने शिवसेनेच्या ठेकेदारास बदडले, गुन्हा दाखल

त्यांनी तो व्हिडिओ टिकटॉक आणि व्हॉट्सअ‌ॅपवर प्रसारित केला. हा प्रकार 1 डिसेंबर ते 18 जानेवारी 2020 या कालावधीत घडला. त्यानंतर पीडितेने याबाबत तक्रार दाखल केली. तिच्या फिर्यादीवरून पोलिसांनी त्या तरुणांविरोधात गुन्हा दाखल करत त्यांना जवळा पांचाळ येथून ताब्यात घेतले. या प्रकाराने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून पालक वर्गातून संताप व्यक्त केला जात आहे.

Intro:*

हिंगोली- कळमनुरी तालुक्यातील जवळा पांचाळ येथील दोन तरुणांना महाविद्यालयीन विधार्थिनीचा चोरून व्हिडीओ घेत तो टिक- टॉक, व्हाट्सप ब्र व्हारल करणे चांगलेच अंगलट आले आहे. या प्रकरणी विधार्थिनीच्या फिर्यादीवरून बाळापूर पोलीस ठाण्यात दोघा विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दोन्ही ही आरोपीच्या मुसक्या अवळल्या आहेत.

Body:आरिफ खान करीम खान पठाण, अमेर उर्फ अम्मू अमीर खान अब्दुल गफार खान पठाण दोघे ही रा. जवळा पांचाळ असे आरोपीची नावे आहेत. आरोपी हे मागील काही दिवसांपासून गावातीलच बस्थानक परिसरात बसून, अर्धापुर येथे खाजगी शिकवणीला ये- जा करणाऱ्या त्या महाविद्यालयिन विद्यार्थ्यांनी वर पाळत ठेवत होते. एवढेच नव्हे तर ती दिसली की गाणे व टाऊंट देखील मारत होते. हे दोघे एवढ्यावर थांबले नाहीत, तर त्यांनी त्या विधार्थिनी सोबत वाईट उद्देशाने जवळीकता देखील करण्याचा प्रयत्न केला होता. याला या विधार्थिनीने विरोध केला असता, आरोपीने एका पानटपरित बसून लपून तिचे मोबाईल मधून व्हिडीओ बनविला व टिक- टॉक या सोशल मीडियावर प्रसारित केला. हा प्रकार 1डिसेंबर ते 18 जानेवारी 2020 या कालावधीत घडला. या प्रकाराने मात्र जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून पालक वर्गातून संताप व्यक्त केला जातोय. पीडितेच्या फिर्यादीवरून आरोपी विरुद्ध भारतीय दंड विधानच्या कलम 354(ड), व बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 2012 कलम 12 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होताच पोलिसानी जवळा पांचाळ येथे धाव घेऊन आरोपींना ताब्यात घेतलंय. Conclusion:तपास बाळापूर पोलीस ठाण्याचे पोनि विकास थोरात हे करीत आहेत.सध्या तरुण - तरुणींमध्ये टिक टॉकचे खूप वेड लागले आहे. यातून आपल्या कला व गुणांना वाव देखील मिळत आहे. मात्र काही तरुण या माध्यमांचा दुरुपयोग देखील करीत असल्याचेच या घटनेवरून समोर आलेय.

बाईट- पोनि विकास थोरात
ठाण्याचे व्हिज्युअल
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.