ETV Bharat / state

Bike Fire Hingoli : धक्कादायक : चालत्या दुचाकीने घेतला पेट; ऑटोचालकांमुळे टळला पुढील अनर्थ - हिंगोलीत चालत्या दुचाकीला आग

हिंगोली येथे चालत्या दुचाकीने पेट घेतल्याची धक्कादायक घटना वसमत शहरातील बसस्थानक परिसरात मंगळवारी सायंकाळी पावणे सहाच्या सुमारास ( two wheeler caught fire vasmat Hingoli ) घडली. प्रवाशांची प्रतीक्षा करत उभे असलेल्या ऑटोचालकांनी व परिसरातील काही नागरिकांनी प्रसंगासावध राखत गाडी विझवण्यासाठी धाव घेतल्याने पुढील अनर्थ टाळण्यासाठी मदत झाली आहे.

two wheeler caught fire vasmat Hingoli
चालत्या दुचाकीने घेतला पेट
author img

By

Published : Feb 2, 2022, 4:07 PM IST

Updated : Feb 2, 2022, 4:17 PM IST

हिंगोली - येथे रस्त्यावर चालत्या दुचाकीने पेट घेतल्याची धक्कादायक घटना वसमत शहरातील बसस्थानक परिसरात ( two wheeler caught fire vasmat Hingoli ) मंगळवारी सायंकाळी पावणे सहाच्या सुमारास ( Bike Fire Hingoli ) घडली. प्रवाशांची प्रतीक्षा करत उभे असलेल्या ऑटोचालकांनी व परिसरातील काही नागरिकांनी प्रसंगासावध राखत गाडी विझवण्यासाठी धाव घेतल्याने पुढील अनर्थ टाळण्यासाठी मदत झाली आहे. मात्र गाडीने अचानक पेट का घेतला याचे कारण अजून तरी समजले नाही. वसमत शहर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

चालत्या दुचाकीने घेतला पेट

जळत्या दुचाकीत अडकला पाय -

राजू केशव दिल्लीकर(37) अस गाडी मालकाचे नाव आहे. दिल्लीकर हे आपल्या एम एच 38 झेड 8291 याक्रमांकाच्या दुचाकीने वसमत शहरात भाजीपाला आणण्यासाठी जात होते. दरम्यान बस स्थानक परिसरात असलेल्या दुभाजक का जवळ अचानक दुचाकीने पेट घेतला. घाबरलेल्या अवस्थेमध्ये दिल्लीकर यांनी गाडी सोडून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र, त्यांचा एक पाय गाडीमध्ये अडकला गेला. परिसरात प्रवाशांची प्रतीक्षा करत बसलेल्या आटो चालकांनी लागलीच पेटल्या दुचाकीकडे धाव घेतली अन दिल्लीकर यांचा पाय काढून त्यांना बाजूला ठेवले, व आजूबाजूला असलेल्या हॉटेलमधून पाणी आणले तर कोणी माती फेकून दुचाकी विझविण्याचा प्रयत्न केला.

आगीचे नेमके नाही कळले कारण -

अचानक आग लागल्याचे लक्षात येताच दिल्लीकर यांनी स्वतःचा जीव वाचण्यासाठी गाडी सोडून जाण्याचा प्रयन्त केला मात्र त्यांचा पाय गाडीत अटकला होता, तोच ते जमिनीवर आदळले, पेटती दुचाकी विझविण्यासाठी प्रयत्न केले. प्रयत्नला यश ही आले. मात्र आग नेमकी कशाने लागली हे कळू शकले नाही. पोलिसात नोंद केली असून, पोलीस शोध घेत आहेत.

हेही वाचा - Vava Suresh Snakebite : 50 हजार सापांना जीवदान देणाऱ्या सर्पमित्राला कोब्राचा दंश, मृत्यूशी लढतोय वावा सुरेश

Last Updated : Feb 2, 2022, 4:17 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.