ETV Bharat / state

हिंगोलीत एसटी बस फोडली; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल - s.t bus strike by unknown people

सकाळी साडेनऊच्या सुमारास बस क्र.(एम.एच.२०,३३५४) ही औंढाकडून हिंगोलीकडे ४४ प्रवासी घेऊन येत होती. मात्र, अचानक नरसी फाट्याजवळ एका दुचाकीवरून आलेल्या दोघा जणांनी दुचाकी रस्त्याच्या कडेला थांबवून बसच्या काचांवर दगडफेक केली. यामध्ये बसेसच्या दोन्ही काचा फुटल्या असून त्यात १५ ते २० हजार रूपयांचे नुकसान झाले आहे.

s.t bus strike by unknown people
एस.टी बस
author img

By

Published : Jan 29, 2020, 10:53 PM IST

हिंगोली - दुचाकीवरून आलेल्या दोघानी एका बसवर दगडफेक केल्याची घटना घडली आहे. ही घटना शहरापासून काही अंतरावर असलेल्या नरसी फाट्याजवळ घडली असून यात बसच्या काचा फुटून चालक जखमी झाला आहे. या प्रकरणी बस चालकाच्या फिर्यादीवरून हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात आज जिल्ह्यात बहुजन मुक्ती मोर्चाच्या वतीने बंद पाळण्यात आला होता. मात्र याला पाहिजे तसा प्रतिसाद मिळाला नाही. तर, जिल्ह्यातील काही मुस्लिम संघटनांनी बंदमध्ये सहभागी होत आपली दालने बंद ठेवली होती. इतरांनी मात्र आपली दुकाने चालू ठेवल्याचे पहावयास मिळाले. बस सेवा सकाळपर्यंत सुरळीत सुरू होती. मात्र, सकाळी साडेनऊच्या सुमारास बस क्र.(एम.एच.२०,३३५४) ही औंढाकडून हिंगोलीकडे ४४ प्रवासी घेऊन येत होती. मात्र, अचानक नरसी फाट्याजवळ एका दुचाकीवरून आलेल्या दोघा जणांनी दुचाकी रस्त्याच्या कडेला थांबवून बसच्या काचांवर दगडफेक केली. यामध्ये बसेसच्या दोन्ही काचा फुटल्या असून त्यात १५ ते २० हजार रूपयांचे नुकसान झाले आहे. या प्रकरणी बस चालक काशिनाथ डोरले यांच्या फिर्यादीवरून अज्ञात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आता या दोन अज्ञातांचा या बंदशी काही संबंध आहे का? याचा शोध ग्रामीन पोलिसांकडून घेतल्या जात आहे.

हेही वाचा- भारत बंद : मनमाड नांदगावमध्ये कडकडीत बंद; भव्य रॅली करून निषेध

Intro:

हिंगोली- शहरापासून काही अंतरावर नरसी फाट्या जवळ दुचाकीवरून येत दोघानी एका बसवर दगडफेक केलीय. यात बसच्या काचा फुटून चालक जखमी झालाय. या प्रकरणी बस चालकाच्या फिर्यादीवरून हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. तर बस चालकांनी दुपारनंतर बस जाग्यावरून हलविल्या नव्हत्या.

Body:नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात आज जिल्ह्यात बहुजन मुक्ती मोर्चाच्या वतीने बंद पाळण्यात आला होता, याला तेवढा प्रतिसाद मिळाला नाही. तर जिल्ह्यातील काही मुस्लिम घटनांनी बंद मध्ये सहभागी होत, आपली दालने बंद ठेवली होती. इतरांनी मात्र आपली दुकाने पूर्ववत ठेवल्याचे पहावयास मिळाले. बस सेवा सकाळ पर्यंत सुरळीत सुरू होती. मात्र सकाळी साडेनऊच्या सुमारास एम. एच. 20 3354 क्रमांकाची बस औंढा कडून हिंगोलीकडे 44 प्रवासी घेऊन येत होती. मात्र अचानक नरसी फाट्याजवळ एका दुचाकीवरून आलेल्या दोघा जणांनी दुचाकी रस्त्याच्या कडेला थांबवून बसच्या काचावर दगडफेक केली. Conclusion:या मध्ये बसेसच्या दोन्ही काचा फुटल्या असून, या मध्ये 15 ते 20 हजार रूपाचे नुकसान झाले आहे. या प्रकरणी बस चालक काशिनाथ डोरले यांच्या फिर्यादीवरून दोघा विरुद्ध गुन्हा दाखल केलाय. आता या दोन अज्ञाताचा या बंदशी काही संबंध आहे का? याचा शोध घेतला ग्रामीण पोलीस घेत आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.