ETV Bharat / state

हिंगोलीत आदिवासी वसतिगृहातून विद्यार्थिनी बेपत्ता

वसतिगृहातील आदिवासी विद्यार्थिनी ही रविवारी वसतिगृहातून बाहेर पडत असताना नोंदवहीत तिने 'मी रूमवर जातेय' अशी नोंद केली होती. मात्र, रात्री सात वाजले तरी ती परत आली नाही. त्यामुळे गृहपाल नाखले आणि कर्मचाऱ्यांनी बराच वेळ त्या विधार्थिनीचा शोध घेतला. मात्र, ती सापडली नाही.

hingoli
हिंगोलीत आदिवासी विद्यार्थ्यांच्या वस्तीगृहातून विद्यार्थीनी बेपत्ता
author img

By

Published : Dec 16, 2019, 12:44 PM IST

Updated : Dec 16, 2019, 3:58 PM IST

हिंगोली - शहरातील पावर हाऊस परिसरातील आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थिनी बेपत्ता झाली आहे. ही विद्यार्थिनी रूमवर जाते म्हणून गेली, परंतू ती पून्हा परतलीच नाही. बराच वेळ तिचा शोध घेतल्यानंतर शहर पोलीस ठाण्यात गृहपाल दिक्षा नाखले यांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा - हिंगोलीत भाजपचे राहुल गांधींविरोधात आंदोलन

शहरातील पावर हाऊस जवळ शासकीय आदिवासी विद्यार्थिनींचे वसतिगृह आहे. याच वसतिगृहातील आदिवासी विद्यार्थिनी ही रविवारी वसतिगृहातून बाहेर पडत असताना नोंदवहीत तिने 'मी रूमवर जातेय' अशी नोंद केली होती. मात्र, रात्री सात वाजले तरी ती परत आली नाही. त्यामुळे गृहपाल नाखले आणि कर्मचाऱ्यांनी बराच वेळ त्या विधार्थिनीचा शोध घेतला. मात्र, ती सापडली नाही. विद्यार्थिनी गावी गेली असण्याची शक्यता असल्याने तिच्या कुटुंबाशी संपर्क साधण्यात आला. मात्र, ती विद्यार्थिनी गावी देखील पोहोचली नसल्याचे समजले. वस्तीगृहातील इतर विद्यार्थिनींकडेही तीची चौकशी करण्यात आली. मात्र, तिच्याबद्दल काहीही माहिती मिळू शकली नाही.

हेही वाचा - अंधश्रद्धेचा आणखी एक बळी; भानामती करण्याच्या संशयातून एकाची हत्या

दरम्यान, गृहपाल नखाले यांनी हिंगोली शहर पोलीस ठाण्यात विद्यार्थिनीचे अपहरण झाल्याची तक्रार दाखल केली. त्यावरून अपहरणाचा गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकाराने मात्र हिंगोली शहरात एकच खळबळ उडाली आहे. शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उप निरिक्षक केनेकर हे याप्रकरणाचा तपास करत आहेत.

Intro:
हिंगोली- शहरातील पावर हाऊस जवळ असलेल्या आदिवासी वस्तीगृहात असलेली एक विद्यार्थिनी रूमवर जाते म्हणून गेली की ती परतलीच नाही. बराच वेळ शोध घेतल्यानंतर तिचे अपहरण झाल्याचा शहर पोलीस ठाण्यात रविवारी रात्री उशिराने गृहपाल दीक्षा नाखले यांच्या फिर्यादीवरून अपहरण झाल्याचा गुन्हा दाखल झालाय.

Body:रेणुका दिलीप गारुळे (16) अस अपहरण झालेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. शहरातील पावर हाऊस जवळ शासकीय आदिवासी चे वसतिगृह आहे. तर या वसतिगृहात असलेली रेणुका ही रविवारी वसतीगृहातून बाहेर पडत असतांना नोंदवहीत तिने 'मी रूमवर जातेय' अशी नोंद केली होती. मात्र रात्री सात वाजले तरी ही ती परत आली नाही. त्यामुळे गृहपाल नाखले व तिच्या कर्मचाऱ्यांनलने बराच वेळ त्या विधार्थिनीचा शोध घेतला मात्र कुठे ही मिळून आली नाही. त्यामुळे विधार्थिनी गावी गेली असण्याची शक्यता असल्याने, आवडानागनात तालुक्यातील दुरचूना येथील तिच्या कुटुंबाशी संपर्क साधण्यात आला मात्र ती विद्यार्थिनी गावी देखील पोहोचली नसल्याचे स्पष्ट झाले त्यामुळे त्या विद्यार्थिनीची अजून वस्तीगृहातील विद्यार्थिनीकडे चौकशी करण्यात आली. Conclusion:मात्र तिच्याबद्दल काहीही माहिती मिळू शकली नाही. त्यामुळे गृहपाल नखाले यांनी हिंगोली शहर पोलिस ठाण्यात विद्यार्थिनीचे अपहरण झाल्याची तक्रार दाखल केली. त्यावरून अपहरणाचा गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकाराने मात्र हिंगोली शहरात एकच खळबळ उडाली आहे. शहर पोलीस ठाण्याचे पोउपनी केनेकर हे अपहरण झालेल्या विद्यार्थिनीचा शोध घेत आहेत.
Last Updated : Dec 16, 2019, 3:58 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.