ETV Bharat / state

ज्या समाजाने नाकरलेय त्याच समाजाला कोरोनामध्ये सावरायला सरसावलेत तृतीयपंथी - transgender help news

तृतीयपंथीदेखील पालिकेच्या मदतीसाठी धावून आले आहेत. ज्यांना समाजाने नाकारले तेच आता तुमचा कोरोना पासून बचाव करण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. शहरात विविध ठिकाणी भरणाऱ्या बाजारात गर्दी न होऊ देण्यासाठी हे तृतीयपंथी प्रयत्न करणार आहेत.

transgender
ज्या समाजाने नाकरलेय त्याच समाजाला कोरोनामध्ये सावरायला सरसावलेत तृतीयपंथी
author img

By

Published : May 11, 2020, 3:15 PM IST

हिंगोली- कोरोनामुळे प्रत्येकात माणुसकीचे दर्शन होत आहे. ज्या तृतीयपंथीयांनाा समाजाने नाकरलेय, तेच तृतीयपंथी आता लॉकडाऊनच्या काळात रस्त्यावर उतरून नागरिकांची गर्दीपासून सुटका करीत आहेत. उन्हातान्हात प्रत्येकाला सूचना देण्यासाठी धावून आले आहेत. नगरपालिकेने या तृतीयपंथीयांचे आभार मानून त्यांना स्वतःचा बचाव करण्याचे साधन दिले. तसेच मदत संकलन केंद्रातून दैनंदिन कामकाजाप्रमाणे मजुरी देणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी रामदास पाटील यांनी सांगितले.

ज्या समाजाने नाकरलेय त्याच समाजाला कोरोनामध्ये सावरायला सरसावलेत तृतीयपंथी
संपूर्ण जगाला हादरून सोडणाऱ्या कोरोनाने, सर्व काही संपवून टाकले आहे. मात्र दिवसेंदिवस वाढणाऱ्या बाधितांच्या संख्येने माणुसकीचे दर्शन होत आहे. या अडचणीच्या वेळी लोक गरजूंच्या मदतीला धावून आल्याचे दिसत आहेत. नगरपालिकेच्या पुढाकाराने तर शहरातील अनेक घरातील चूल विझता विझता पेटली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी पाटील यांनी आवाहन करताच मदत घेऊन अनेक दानशुरांची रांग लागल्याचे पहावयास मिळाले.

रुग्ण वाढल्यानंतर अजून परिस्थिती भयंकर होण्याची चिन्हे असतानाच अनेक जण स्वयंस्फूर्तीने मदतीसाठी धावून आले होते. तर औषधे देखील मागेल त्याला पुरवण्यात येत होती. शहरातील गुरे देखील उपाशी न राहू देण्यासाठी प्रयत्न केले गेले. आता सर्वांच्या पाठोपाठ तृतीयपंथीदेखील पालिकेच्या मदतीसाठी धावून आले आहेत. ज्यांना समाजाने नाकारले तेच आता तुमचा कोरोना पासून बचाव करण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. शहरात विविध ठिकाणी भरणाऱ्या बाजारात गर्दी न होऊ देण्यासाठी हे तृतीयपंथी प्रयत्न करणार आहेत. शहरात बाजारात दुचाकीने फिरणाऱ्यांना हे तृतीयपंथी प्रतिबंध करणार आहेत एवढेच नव्हे तर त्यांना मास्क घालण्याच्या ही सूचना देणार आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.