ETV Bharat / state

वृद्ध महिलेचा खून करून पळवले दागिने; साखरा येथील घटना - Hingoli Mankarnabai Sarole murder

सेनगाव तालुक्यातील साखरा येथे वृद्ध महिलेचा खून करून तिच्या अंगावरील सोन्या-चांदीचे दागिने लंपास केल्याची घटना घडली आहे. ही महिला घरात एकटीच राहात होती. मनकर्णाबाई तुळशीराम सरोळे (वय ७५) असे मृत महिलेचे नाव आहे.

हिंगोली वृद्ध महिलेचा खून करून चोरी
हिंगोली वृद्ध महिलेचा खून करून चोरी
author img

By

Published : Aug 11, 2020, 3:37 PM IST

हिंगोली - सेनगाव तालुक्यातील साखरा येथे वृद्ध महिलेचा खून करून तिच्या अंगावरील सोन्या-चांदीचे दागिने लंपास केल्याची घटना घडली आहे. ही महिला घरात एकटीच राहात होती. मंगळवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. याची माहिती मिळताच सेनगाव पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले.

मनकर्णाबाई तुळशीराम सरोळे (वय ७५) असे मृत महिलेचे नाव आहे. मनकर्णाबाई यांना तीन मुले आहेत. मात्र, ती विभक्त असल्याने मनकर्णाबाई ह्या साखरा येथे एकट्याच राहतात. रविवारी रात्री पाठवला रिसरात मध्यम व हलक्‍या स्वरूपाचा पाऊस सुरू होता. त्यातच वीजपुरवठादेखील खंडित होत होता. याचात फायदा घेऊन चोरट्यांनी मनकर्णाबाई यांच्या घरात घुसून त्यांच्या अंगावरील दागिने काढून घेतले. दागिने काढून घेण्यासाठी मनकर्णाबाई चोरट्यांना विरोध करत होत्या. त्यांच्यामध्ये बरीच झटापट झाली. अशा परिस्थितीत चोरट्यांनी त्यांना मारहाण केली. यात मनकर्णाबाई यांचे दोन दात पडले असून, डोक्याला देखील गंभीर दुखापत झाली. सकाळी दरवाजा उघडा दिसल्याने ही बाब शेजाऱ्यांच्या लक्षात आली. त्यानी मनकर्णाबाई यांच्या मुलाला याविषयी कळवले.

सेनगाव पोलिसांना घटनेची माहिती मिळताच सेनगावच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक दीक्षा लोकडे, उपनिरीक्षक बाबुराव जाधव, जमादार चिंतोरे, महादू शिंदे यांच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली. याशिवाय, श्‍वान पथकाला पाचारण करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. मनकर्णाबाईंच्या अंगावरील 35 तोळ्याचे चांदीचे दागिने आणि एका तोळ्याच्या सोन्याच्या दागिन्यांची चोरी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.