ETV Bharat / state

तहसीलदार झोपेत! मयत ग्रामसेवकाला दिले कामावर हजर राहण्याचे आदेश - आयुक्त सुनील केंद्रेकर यांचा हिंगोली दौरा

हिंगोली जिल्ह्यातील लसीकरण कमी झाल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत लसीकरण हे 100 टक्के झाले पाहिजे आशा सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. Commissioner Sunil Kendrakar In Hingoli त्यानंतर प्रशासन गतीने कामाला लागले. मात्र, सेनगाव तालुक्यातील 49 ग्रामपंचायतिच्या ग्रामसेवकांना तहसीलदारांनी कामावर हजर राहण्याचे आदेश दिले. त्यामध्ये सहा महिन्यांपूर्वी कोरोनाने निधन झालेले पिंपरी येथील डी. डी. झिंगरे यांनाही हजर राहण्याचे आदेश काढण्यात आले आहेत. त्यामुळे प्रशासन झोपेत काम करतय की काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

तहसीलदारांनी कामावर हजर राहण्याचे आदेश दिलेल्या अधिकाऱ्यांची यादी

author img

By

Published : Dec 19, 2021, 7:56 AM IST

हिंगोली - आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी जिल्ह्यातील कोरोना लसीकरणाचा आढावा घेतला. Commissioner Sunil Kendrakar In Hingoli त्यावेळी त्यांच्या जिल्ह्यातील लसीकरण कमी झाल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत लसीकरण हे 100 टक्के झालेच पाहिजे आशा कडक सूचना त्यांनी त्यावेळी अधिकाऱ्यांना दिल्या. त्यानंतर प्रशासन गतीने कामाला लागले. (75 percent vaccination in Hingoli District) 75 टक्के लसीकरण कमी झालेल्या सेनगाव तालुक्यातील 49 ग्रामपंचायतिच्या ग्रामसेवकांना तहसीलदारांनी कामावर हजर राहण्याचे आदेश दिले. याममध्ये सहा महिन्यांपूर्वी कोरोनाने निधन झालेले पिंपरी येथील डी. डी. झिंगरे यांनाही हजर राहण्याचे आदेश काढण्यात आले आहेत. त्यामुळे प्रशासन झोपेत काम करतय की काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

अन् १०० टक्के लसीकरण करण्याच्या सूचना दिल्या

कोरोना काळात अहोरात्र परिश्रम घेत या महाभयंकर कोरोनाचा हिंगोली प्रशासनाने सामना केला. मात्र, लसीकरणासाठी याच प्रशासनाच्या अक्षरशः नाकी नऊ आले आहेत. अशातच हिंगोली जिल्हा दौऱ्यावर (Order Given Deceased Gram Sevak Present Work) आलेले आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी कोरोना लसीकरणाचा आढावा घेतला आहे. हिंगोली प्रशासनाच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केली. लसीकरण कमी झाल्याच्या करणातून अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. अन् १०० टक्के लसीकरण करण्याच्या सूचना दिल्या. त्यामुळे प्रशासन गतीने कामाला लागले आहे.

ग्रामस्थरावर ही यंत्रणा लावली कामाला

ग्राम स्थरावर लसीकरण पूर्ण करण्यासाठी आरोग्य सेवक, सरपंच, मुख्याध्यापक, तलाठी, ग्रामसेवक, रास्तभाव दुकानदार, पोलीस पाटील यांचे पथक कार्यान्वित केले आहे. अशातच जिल्ह्यातील 75 टक्के पेक्षा कमी लसीकरण झालेल्या ग्रामपंचायतच्या ग्रामसेवकांना लसीकरण पूर्ण करण्यासाठी कामावर हजर होण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, सहा महिन्यांपूर्वी कोरोनाने निधन झालेले पिंपरी येथील डी. डी. झिंगरे यांना ही हजर राहण्याचे आदेश दिल्याने प्रशासनाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.

जिल्ह्यात चार दिवस राबवणार विशेष मोहीम

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी हिंगोलीचे प्रशासन पूर्णपणे सज्ज झाले आहे. ओमायक्रोन या विषाणूपासून बचाव करण्यासाठी लसीकरण व मास्क अतिशय महत्वाचे असल्याने, अधिकारी कर्मचारी ऍक्शन मोडमध्ये आले आहेत. लसीकरण पूर्ण करण्यासाठी जिल्ह्यात 20 ते 24 डिसेंबर दरम्यान विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे. ही मोहीम यशस्वी करण्यासाठीच ग्रामस्थरावरील सर्वच यंत्रणा कामाला लावली आहे. त्यामध्येच यंत्रणेत मयत ग्रामसेवकांचा देखील समावेश करण्यात आल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

हेही वाचा - Goa Liberation Day : गोवा मुक्तिसंग्रामाचे हिरक महोत्सवी वर्षात पदार्पण; वाचा ईटीव्ही भारतचा विशेष रिपोर्ट...

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.