ETV Bharat / state

वडिलांना शिवीगाळ; जिवलग मित्रानेच केली मित्राची हत्या, हिंगोलीतील घटना - aundha nagnath police station

माधव पोले आणि दिनेश उर्फ दगडू मोळके हे जिवलग मित्र होते. दिनेशचे वडील आणि माधवच्या वडीलांमध्ये दोन दिवसांपूर्वी जोराचे भांडण झाले होते. दरम्यान, माधव ने भानुदास मोळके यांना शिवीगाळ केली होती. त्याचा राग हा दिनेशच्या मनात होता. तो माधव याला एकांतात भेटण्याची प्रतीक्षा करीत होता.

मृत माधव पोले
मृत माधव पोले
author img

By

Published : May 22, 2020, 11:15 AM IST

Updated : May 22, 2020, 11:22 AM IST

हिंगोली - मित्राने वडिलांना शिवीगाळ केल्याच्या रागातुन एका मित्राने दुसऱ्या मित्राची चाकूने भोसकून हत्या केली आहे. ही घटना औंढा नागनाथ तालुक्यातील लाख येथे बुधवारी रात्री साडेदहाच्या सुमारास घडली. माधव पांडुरंग पोले असे (वय - 22) असे मृत युवकाचे नाव आहे. तर दिनेस उर्फ दगडू मोळके असे आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

माधव पोले आणि दिनेश उर्फ दगडू मोळके हे जिवलग मित्र होते. दिनेशचे वडील आणि माधवच्या वडीलांमध्ये दोन दिवसांपूर्वी जोराचे भांडण झाले होते. दरम्यान, माधव ने भानुदास मोळके यांना शिवीगाळ केली होती. त्याचा राग हा दिनेशच्या मनात होता. तो माधव याला एकांतात भेटण्याची प्रतीक्षा करीत होता. मात्र, माधव हा घरातून बाहेर निघण्याचे टाळत होता. शेवटी दिनेश हा माधवच्या घरी गेला. त्याला बाहेर बोलावुन घेतले. त्याच्या सोबत वाद घालू लागला. तोच घराजवळ असलेले तिघेजण हे धावून आले. त्यांनी माधवला पकडले आणि दिनेशने चाकूने छातीवर वार केला. यात मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने माधवचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने गावात एकच खळबळ उडाली.

हेही वाचा - पालघरमध्ये पुन्हा उसळली परप्रांतीयांची गर्दी; सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

घटनास्थळी औंढानागनाथ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे जमादार दिनकर तोंडे, अफसर पठाण, इक्बाल यांनी भेट दिली. याप्रकरणी, पांडुरंग यादव फुले यांच्या फिर्यादीवरून दिनेश उर्फ दगडू भानदास मोळके, गजानन भानुदास मोळके, कल्याण सुरेश मोळके, भानुदास मारोती मोळके सर्व राहणार मेथा या चार जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

Last Updated : May 22, 2020, 11:22 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.