हिंगोली- तालुक्यातील मालसेलू येथे मागील काही दिवसांपासून चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यातच रात्री साडे दहाच्या सुमारास ग्रामस्थांना दोन जण संशयितरित्या आढळून आले. त्यांना ताब्यात घेऊन त्यांची विचारपूस केली असता, ते उडवाउडवीची उत्तरे देत असल्याने त्या दोघांना रात्री दिडच्या सुमारास हिंगोली येथे आणून ग्रामीण पोलिसांच्या स्वाधिन केले. शिवजी भानुदास वसू, रुपेश भिसाजी राठोड (दोघेही रा.मारवाडी ता.पुसद जि.यवतमाळ) असे त्यांचे नावे आहेत.
हेही वाचा - राज्यातील रुग्ण अर्धशतकाजवळ; 31 मार्चपर्यंतचा कालावधी अत्यंत महत्त्वाचा
संशयित हे मालसेलू गावालागत असलेल्या गजानन देशमुख यांच्या शेतात गुरांच्या दावणीजवळ लपून बसले होते. त्यांची दुचाकी गावापासून काही अंतरावर असलेल्या पुलाजवळ बंद पडलेल्याअस्थेत आढळून आली. ग्रामस्थांनी या दोघांची विचार पूस केली. मात्र, ते बोलण्याच्या मनस्थितीत नव्हते. दोघेही दारुच्या नशेत होते. त्यामुळे ग्रामस्थांनी त्यांना पोलिसांच्या हवाली केले. दरम्यान, या संशयितांमुळे गावात भीतीचे वातावरण पसरले होते.