ETV Bharat / state

धक्कादायक! लोहगाव आश्रम शाळेतील विद्यार्थी समस्यांनी त्रस्त, पुरेसे जेवणही मिळत नाही

डॉक्टर श्रीराम पवार माध्यमिक व उच्च माध्यमिक आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. येथील विद्यार्थ्यांना मागील सहा महिन्यांपासून पुरेसे भोजन दिले जात नसल्याचा प्रकार समोर आला.

आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे
आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे
author img

By

Published : Jan 10, 2020, 12:05 PM IST

हिंगोली - लोहगाव येथील डॉक्टर श्रीराम पवार माध्यमिक व उच्च माध्यमिक आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. येथील विद्यार्थ्यांना मागील सहा महिन्यांपासून पुरेसे भोजन दिले जात नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सामाजिक कार्यकर्ते आणि जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर सतीश पाचपुते यांनी ही बाब उघडकीस आणली. याबाबत त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केली.

आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे

या आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा काही प्रमाणात ठीक आहेत. मात्र, इतर अत्यावश्यक सुविधा अपुऱ्या असल्याने हे विद्यार्थी त्रस्त झाले आहेत. या ठिकाणी एकूण 261 विद्यार्थी आहेत. या सर्वांसाठी एकच शौचालय, आंघोळीसाठी एकच स्नानगृह आहे. पुरेसे जेवण मिळत नसल्याने मुले कधी उपाशी तर कधी अर्धपोटी राहतात. तसेच, हे सर्व विद्यार्थी जमिनीवरच झोपतात. यावरून या आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना दैनंदिन जीवन जगण्यासाठीही त्यांना संघर्ष करावा लागत आहे, हे स्पष्ट दिसत आहे.

हेही वाचा - गौरी लंकेश हत्या प्रकरणातील आरोपी ऋषीकेश देवडीकरला झारखंडमधून अटक

शाळेत खेळाचे साहित्य उपलब्ध नसल्याने विद्यार्थी विविध स्पर्धांपासून वंचित राहतात. काही विद्यार्थ्यांनी डॉ. सतीश पाचपुते यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी तत्काळ विद्यार्थ्यांची भेट घेतली. त्यांच्या समोर विद्यार्थ्यांनी समस्यांचा पाढा वाचला. त्यानुसार पाचपुते यांनी पाहणी केली असता अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या.

आदिवासी मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचा शासन प्रयत्न करत आहे असा गवगवा केला जातो. मात्र, विद्यार्थ्यांना अशा भयंकर अडचणीला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे शासनाच्या योजना या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत नसल्याचे या घटनेवरून पुन्हा एकदा समोर आले. शाळेच्या परिसरात वाहत असलेल्या नालीत किडेदेखील आढळून आले. यामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे, असे सतीश पाचपुते यांनी सांगितले.
सध्या संस्था चालकाच्या मुलाकडे या आश्रमशाळेचा कारभार सोपवलेला आहे. मात्र, त्याला फोन लावला असता तो विद्यार्थ्यांनाच धमकावत असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.

लोहगाव शाळेबाबतची कोणतीही तक्रार अद्याप प्राप्त झालेली नाही. काही लोकांकडून तोंडी माहिती मिळाली आहे. त्यानुसार सहायक प्रकल्प अधिकाऱ्याला तिथे पाठवून चौकशी केली जाईल. त्यानंतर शाळेवर योग्य ती कारवाई करणार असल्याचे आदिवासी एकात्मिक प्रकल्प अधिकारी डॉ. विशाल राठोड यांनी सांगितले.

Intro:

हिंगोली- तालुक्यातील लोहगाव येथील डॉ. श्रीराम पवार माध्यमिक व उच्च माध्यमिक आदिवासी आश्रम शाळा गेल्या अनेक वर्षांपासून वेगवेगळ्या मुद्द्याने नेहमीच चर्चेत राहतेय. मुख्य म्हणजे येथील विद्यार्थ्यांना भोजन दिले जात नसल्याचे पुन्हा एकदा समोर आलेय. सहा महिन्यापासून या ठिकाणी उपाशीतापाशी विद्यार्थी विधार्थिनी दिवस ढकलत असल्याचे सामाजिक कार्यकर्ते तथा जिप सदस्य डॉ. सतीश पाचपुते यांनी उघडकीस आणून दिलेय. याबद्दल त्यानी वरिष्ठांकडे तक्रार देखील केलीय. येथील विद्यार्थ्याच्या समस्या ऐकून खरोखरच अंगावर शहारे उभे राहातात.

Body:या आश्रमशाळेमध्ये मागील सहा महिन्यापासून विद्यार्थ्यांना अर्ध्या पोटी ठेवण्याचा प्रकार सर्रासपणे सुरू आहे. एवढेच नव्हे तर येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा चांगल्या असल्या तरीही भौतिक सुविधा ने मात्र त्याना चांगलेच भांबावून सोडले आहे. याठिकाणी 261 विद्यार्थी आहेत. मात्र सर्वांसाठी एकच शौचालय, तर आंघोळीसाठी एकच बाथरूम आहे. तसेच विद्यार्थ्यांसाठी असलेल्या निवास्थानामध्ये टेबल किंवा खाट देखील नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना झोपण्यासाठी जमिनीचाच आधार घ्यावा लागतोय. विशेष म्हणजे या खोल्यांमध्ये एकच पंखा तर कोण्यात्या खोलीत पंखा देखील नाही. त्यामुळे या आश्रम शाळेत विद्यार्थ्यांना नरक यातना भोगल्याचा अनुभव येत असल्याची खंत विद्यार्थी व्यक्त करीत होते. तसेच या ठिकाणी खेळाचे साहित्य उपलब्ध नसल्याने विद्यार्थी विविध स्पर्धेत पासून वंचित आहेत. विद्यार्थ्याचा फोन आल्यानंतर ताबडतोब डॉ. सतीश पाचपुते यांनी या आश्रम शाळेत धाव घेतल्यानंतर विद्यार्थ्यांनी त्यांच्या समोर समस्यांचा पाढा वाचला , त्यानुसार पाचपुते यांनी पाहणी केली असता अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या. याठिकाणी 261 विद्यार्थी असल्यानंतरही येथील अन्नधान्याच्या कोठ्या पूर्णपणे रिकाम्या असल्याचे समोर आले. येथे केवळ भोजनाची समस्या नव्हे तर इतरही समस्या मोठ्या प्रमाणात आ वासून आहेत. एकीकडे आदिवासी मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचा शासन प्रयत्न करतंय. तर दुसरीकडे मात्र विद्यार्थ्यांना अशा भयंकर अडचणीला सामोरे जावे लागत आहे त्यामुळे शासनाच्या योजना ह्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत नसल्याचे या घटनेवरून पुन्हा एकदा समोर आले. एवढेच नव्हे तर येथे निवासस्थानी असलेल्या विद्यार्थ्यांना दोन दोन महिन्यापासून तेल आणि साबण मिळत नसल्याचेही विद्यार्थी मोठ्या पोटतिडकीने सांगत होते समस्या मांडण्याचा प्रयत्न केला तर धमकावले देखील जात आहे त्यामुळे मनामध्ये भीती दडवत विद्यार्थी समस्या सांगत नाहीत. यापूर्वी याठिकाणी समस्या उद्भवली होती त्यामुळे वस्तीगृहात राहत असलेल्या संतप्त विद्यार्थ्यांनी संस्थाचालकांची गाडीत करून टाकली होती मात्र समस्यांमध्ये सुधारणा तर झालीच नाही वरून संस्थाचालकांनी त्या विद्यार्थ्यावर गुन्हे दाखल केले होते तेव्हापासून येथील विद्यार्थी दहशतीखाली वागतात आणि पुन्हा आता तीच समस्या उद्भवलीय. तर शाळेच्या परिसरात वाहत असलेल्या नालीत किडे देखील आढळून आले. यामुळे विध्यार्थ्याचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे.Conclusion:संस्थाचालकाच्या मुलाकडे या आश्रमशाळेचा कारभार सोपविला आहे मात्र त्याला फोन लावला तर तो विद्यार्थ्यांने धमकावत असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले तसेच नेमकी संस्था आहे तरी कुठे हेच मला माहीत नसल्याचे सपशेल फोनवर सांगत असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. त्यामुळे या सर्व प्रकारानंतर या आश्रम शाळेचा पुन्हा एकदा कारभार चव्हाट्यावर आलाय. तर अजून लोहगाव शाळेबाबतची कोणतीही तक्रार अजून प्राप्त झालेली नाही. मात्र माहिती मिळाली आहे. त्यानुसार सहायक प्रकल्प अधिकाऱ्याला तिथे पाठवून चौकशी करून आव्हाल मागवत त्या शाळेवर योग्य ती कारवाई करणार असल्याचे प्रकल्प अधिकारी डॉ. विशाल राठोड यांनी सांगितले.

बाईट-
शालेय विद्यार्थी, विधार्थिनी

डॉ. सतीश पाचपुते (जिप सदस्य)
डॉ. विशाल राठोड (प्रकल्प अधिकारी)
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.