ETV Bharat / state

हिंगोली: कत्तलखाना उभारणीचे काम बंद करण्यासाठी महिलांचा नगरपालिकेवर मोर्चा - Slaughterhouse

अण्णाभाऊ साठे नगरातील कत्तलखान्यामुळे त्रस्त असल्याला नागरिकांनी नगरपालिकेवर मार्चा काढला होता. दरम्यान, मागण्या मान्य न झाल्यास 27 सप्टेंबर पासून उपोषनाला बसणार असल्याचा इशारा देखील या महिलांनी दिला आहे.

नगर पालिकेवरील महिलांचा मोर्चा
author img

By

Published : Sep 25, 2019, 2:34 AM IST

हिंगोली - शहरातील अण्णा भाऊ साठे नगरात 25 वर्षापूर्वी बंद पडलेल्या कत्तलखान्याच्या उभारणीसाठी सुरुवात झाली आहे. मात्र, या कारखान्यातून उत्सर्जित होणारे सांडपाणी आणि टाकाऊ मासाची योग्य विल्हेवाट न केल्याने या नगरातील महिलांनी नगरपालिकेवर मोर्चा काढला. त्यांनी या कत्तलखान्याचे काम थांबवण्याची मागणी केली. या मागणीसाठी आक्रमक झालेल्या महिलांमुळे पालिकेत गोंधळ उडाला होता.

नगर पालिकेवरील महिलांचा मोर्चा

शहरातील अण्णा भाऊ साठे नगरामध्ये विविध जाती धर्माचे 400 वर नागरिक वास्तव्यास आहेत. हा कत्तलखाना 25 वर्षांपासून बंद आहे. दरम्यान, हा कत्तलखाना सुरू होता तेव्हा या भागातून रक्ताचे लोट आणि टाकाऊ मांसामुळे दुर्गंधी पसरत होती. त्यामुळे या भागातील अनेक नागरिकांनी हा भाग सोडून दुसरीकडे आपले बस्तान मांडले आहे. मात्र, ज्यांना शक्य नाही असे नागरिक याच ठिकाणी वास्तव्यास आहेत. दरम्यान, हा कत्तलखाना बंद असूनही परिसरात दुर्गंधी पसरते. यामुळे कत्तलखाना सुरू झाल्यास किती त्रास होईल, याची कल्पना या महिलांनी पालिका कर्मचाऱ्यांना दिली. हा कत्तलखाना परत सुरू करू नये, या मागणीसाठी नागरिकांनी पालिकेत 'तांडव' मांडला. यामुळे नगरपालिकेत काही काळा साठी गोंधळ उडाला होता.

हेही वाचा - अशोक चव्हाण यांनी निवडणूक लढवू नये, तावडेंचा अजब सल्ला

नगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांना या महिलांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, या महिला ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हत्या. आता महिलांच्या या मोर्चामुळे पालिका काय निर्णय घेईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, या संदर्भात ठोस कारवाई न केल्यास 27 सप्टेंबरला नगरपालिका कार्यालयासमोर उपोषणास बसण्याचा इशारा या महिलांनी निवेदनाद्वारे दिला.

हेही वाचा - दादासाहेब फाळके पुरस्काराने अमिताभ यांचा होणार गौरव

Intro:

हिंगोली- शहरातील अण्णा भाऊ साठे नगरात 25 वर्षापूर्वी बंद पडलेल्या कत्तलखान्याच्या उभारणीसाठी प्रारंभ झाला आहे. मात्र या मधून जे काही सांडपाणी, टाकाऊ मांस याची कोणतीही योग्य विल्हेवाट लावण्याचे नोयोजन न केल्याने य नगरातील महिलांनी नगरपालिकेवर मोर्चा काढत, कत्तलखान्याचे काम थांबवण्याची मागणी केली.महिला एवढ्या आक्रमक झाल्या होत्या, त्या कुणाचे ही काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हत्या. त्यामुळे काही काळ पालिका कर्मचारीही गोंधळून गेले होते.

Body:हिंगोली येथील अण्णा भाऊ साठे नगर मध्ये विविध जातीय धर्माचे 400 च्यावर नागरिक वास्तव्यास आहेत. या भागात गेल्या अनेक वर्षांपासून कत्तलखाना आहे. मात्र हा कत्तल खाना 25 वर्षांपासून बंद आहे. कत्तलखाना सुरू होता तेव्हा या भागातून रक्ताचे लोट अन टाकसू मांस मुळे एवढी दुर्गंधी सुटत होती. त्यामुळे या भागातील बऱ्याच नागरिकांनी हा भाग सोडून दुसरीकडे आपले बस्तान मांडले आहे. मात्र ज्यांना शक्य नाही असे अजूनही याच ठिकाणी वास्तव्यास आहेत. जरी हा कत्तलखाना बंद असला तरीही, आतापासूनच दुर्गंधी सुरू आहे. तर कत्तलखाना उभारल्यानंतर किती त्रास होईल, तसेच या दुर्गंधी ला कंटाळून या भागात सोयरे धायरे देखील येत नसल्याचे महिला व पुरुष मोठया पोट तिडकीने सांगत होते. त्यामुळेच हा कत्तखाना बंद करावा यासाठी महिलांनी आज नगरपालिकेत आकांडतांडव केले. महिलांचे हे रूप पाहून नगरपालिकेचे कर्मचारी ही काही काळ गोंधळून गेले होते. Conclusion:कर्मचारी महिलांची समजूत घालण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र अजिबात महिला ऐकून घेण्याच्या मनस्तीत नव्हत्या. आता महिलांच्या या मोर्चा मुळे पालिका काय निर्णय घेतेय याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. एवढे करूही जर प्रशासन यावर कोणती कारवाई करत नसेल तर 27 सप्टेंबर रोजी नप कार्यालयासमोर उपोषणास बसण्याचा इशारा महिलांनी निवेदनाद्वारे दिलाय.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.