ETV Bharat / state

हिंगोलीत ५३ परीक्षा केंद्रांवरून १७ हजार ४४५ विद्यार्थी देणार दहावीची परीक्षा

हिंगोली जिल्ह्यातील ५३ परीक्षा केंद्रांवरून १७ हजार ४४५ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. परीक्षा केंद्रावर कॉपी व इतर गैरप्रकार थांबविण्यासाठी तीन सदस्यीय बैठ्या पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

परीक्षा
author img

By

Published : Mar 1, 2019, 12:29 PM IST

हिंगोली - आजपासून दहावीच्या परीक्षेला प्रारंभ झाला आहे. हिंगोली जिल्ह्यातील ५३ परीक्षा केंद्रांवरून १७ हजार ४४५ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. परीक्षा केंद्रावर कॉपी व इतर गैरप्रकार थांबविण्यासाठी तीन सदस्यीय बैठ्या पथकांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

दहावीच्या परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा दक्षता समिती अध्यक्षांनी परीक्षा केंद्रांना भेटी देण्यासाठी उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी यांना आदेश दिले आहेत. त्याचबरोबर परीक्षेसाठी ९१६ पर्यवेक्षकांची नियुक्ती केली आहे. परीक्षा सुरळीत व कॉपीमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी शिक्षण विभागाच्या वतीने पाच भरारी पथके नियुक्त केली आहेत. यामध्ये शिक्षणाधिकारी, प्राथमिक शिक्षणाधिकारी, डायटच्या प्राचार्य, महिला विशेष भरारी पथक, उपशिक्षणाधिकारी यांचा या भरारी पथकात समावेश आहे.

जिल्ह्यातील सर्वच परीक्षा केंद्रावर पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. संवेदनशील परीक्षा केंद्रावर वाढीव पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे. विशेष म्हणजे यावर्षी प्रत्येक परीक्षा केंद्रांवर विभागीय मंडळ औरंगाबाद यांचे गोपनीय पथक तळ ठोकून लक्ष ठेवणार आहे.

Intro:आज पासून महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या इयता दहावीच्या परीक्षेस प्रारंभ झाला आहे. हिंगोली जिल्ह्यातील ५३ परीक्षा केंद्रावरून पार पडणाऱ्या परीक्षेस १७ हजार ४४५ विध्यार्थ्याचा समावेश आहे. तर परीक्षा केंद्रावर कॉपी व गैर प्रकार थांबविण्यासाठी तीन सदस्यीय बैठे पथकाची नियुक्ती केली आहे.

Body:दहावीच्या परीक्षातील गैर प्रकार रोखण्यासाठी जिल्हा अधिकारी तथा जिल्हा दक्षता समिती अध्यक्षांनी परीक्षा केंद्रांना भेटी देण्यासाठी उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी यांना आदेशित केले आहे. त्याच बरोबर परीक्षेसाठी ९१६ पर्यवेक्षकांची तालुका अंतर्गत शाळा- कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांची अदलाबदल करून नियुक्ती केली आहे. परीक्षा सुरळीत व कॉपीमुक्त वातावरणात पार पडण्यासाठी शिक्षण विभागाच्या वतीने पाच भरारी पथक नियुक्त केलेले आहेत. यामध्ये मा.शिक्षणाधिकारी, प्रा. शिक्षणाधिकारी, डायटच्या प्राचार्य, महिला विशेष भरारी पथक, उपशिक्षणाधिकारी यांचा या भरारी पथकात समावेश आहे.

Conclusion:तसेच जिल्ह्यातील सर्वच परीक्षा केंद्रावर पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. विषेश म्हणजे संवेदनशील परीक्षा केंद्रावर वाढीव पोलीस बंदीबस्त ठेवण्यात आल्याची माहिती शिक्षण विभागाकडून मिळाली. विशेष म्हणजे या वर्षी प्रत्येक परीक्षा केंद्रावर विभागीय मंडळ औरंगाबाद यांचे गोपनीय पथक तळ ठोकून लक्ष ठेवणार आहे. या बातमीत आपल्या फाईल मधील परीक्षा देणारे विध्यार्थी व्हिज्युअल किंवा फोटो वापरावा
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.