ETV Bharat / state

हिंगोलीत वरिष्ठांच्या भीतीपोटी राज्य राखीव दलाच्या जवानाचा आत्महत्येचा प्रयत्न - विष

हिंगोली येथील राज्य राखीव दलातील कॅम्पमध्ये कर्तव्य बजावत असलेल्या जवानाने विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. दोन दिवसांपूर्वी याच कारणातून एका जवानाने गळफास घेऊन आत्महत्या केली.

गंभीर जवान
author img

By

Published : Apr 26, 2019, 4:58 PM IST

हिंगोली - राज्य राखीव दलाच्या कॅम्पमध्ये कर्तव्य बजावणाऱ्या जवानांचा वरिष्ठांकडून त्रास वाढतच चालला आहे. दोन दिवसांपूर्वी याच कारणातून एका जवानाने गळफास घेऊन आत्महत्या केली, तर आज पुन्हा एका जवानाने विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. विलास भाऊसाहेब गायकवाड असे जवानाचे नाव आहे. या जवानावर हिंगोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

गंभीर जवान

जवान विलास हा मागील अनेक दिवसांपासून विना परवानगी सुट्टीवर होता. तो आज कर्तव्यावर हजर होणार होता. मात्र वरिष्ठ कोणताही निर्णय घेतील, या भीतीपोटी या जवानाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यावरूनच हिंगोली येथील राज्य राखीव दलातील कॅम्पमध्ये कर्तव्य बजावत असलेले जवान, हे किती मानसिक तणावाखाली आहेत. हे दिसून येते. दोन दिवसांपूर्वीच हिंगोली जिल्ह्यातील येळेगाव येथील जवानाने वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा आरोप, त्याच्या नातेवाईकांनी केला. तर आता या जवानानेही आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलेले आहे. या प्रकाराने हिंगोली जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. हिंगोली येथे उपचार घेत असलेल्या जवानाला बघण्यासाठी एसआरपीएफ जवानांनी एकच गर्दी केली.

या घटनेतील खरे कारण समोर आल्यानंतरच जवानांना दिली जात असलेली वागणूक समजणार आहे. हा डिपार्टमेंटला बदनाम करण्याचा तर प्रयत्न नाही ना, असाही प्रश्न उभा राहत आहे. विरिष्ठांकडून चौकशी झाल्यानंतर खरी परिस्थिती समजणार आहे. मात्र एका जवानाने आत्महत्या केली, अन दुसरा पण आत्महत्येचा प्रयत्न करतो. यामुळे हिंगोली येथील एसआरपीएफ कॅम्प महाराष्ट्रात चांगलाच चर्चेला आला आहे.

Intro:*

हिंगोली येथील एस आर पी एफ कॅम्प १२ मध्ये कर्तव्य बजावत असलेल्या जवानांचा दिवसेंदिवस वरिष्ठांकडून त्रास वाढतच चाललाय दोन दिवसांपूर्वी याच कारणातून एका जवानाने गळफास घेऊन आत्महत्या केली तर आज पुन्हा एका जवानाने औषध पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय. जेवणावर हिंगोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Body:विलास भाऊसाहेब गायकवाड असे जवानाचे नाव आहे. जवान विलास हा मागील अनेक दिवसापासून विना परवानगी सुट्टीवर होता. तो आज कर्तव्यावर हजर होणार होता, मात्र वरिष्ठ कोणताही निर्णय घेतील, याच भीतीपोटी या जवानाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय. यावरूनच हिंगोली येथील एस आर पी एफ कॅम्प मध्ये कर्तव्य बजावत असलेले जवान, हे किती मानसिक तणावाखाली आहेत. हे दिसून येतंय. दोन दिवसापूर्वीच हिंगोली जिल्ह्यातील येळेगाव तुकाराम येथील विष्णू मंदाडे या नावाच्या जवानाने वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून गळफास लावून आत्महत्या केल्याचा आरोप. त्याच्या नातेवाईकानी केलाय. तर आता या जवानानेही आत्महत्ये सारखे टोकाचे पाऊल उचलेले आहे. या प्रकाराने मात्र हिंगोली जिल्ह्यात एकच खळबळ उडालीय. नेमके अजुन किती जवान वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळले असावेत? असा प्रश्न सर्वांना पडलाय. हिंगोली येथे उपचार घेत असलेल्या जवानाला बघण्यासाठी एस आर पी एफ जवानानी
एकच गर्दी केलीय. Conclusion:याही घटनेतील खरे कारण समोर आल्यानंतरच जवानांना दिली जात असलेली वागणूक समजणार आहे. का उगीचच डिपार्टमेंटला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे. विरिष्ठांकडून चोकशी झाल्यानंतर मात्र खरी परिस्थिती समजणार आहे. मात्र एका जवानांने आत्महत्या केलीय अन दुसरा पण आत्महत्यच प्रयत्न करतोय. या मुळे हिंगोली येथील एस आर पी एफ कॅम्प 12 महाराष्ट्रात चांगलेच चर्चला आले आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.