ETV Bharat / state

कौतुकास्पद.! वया पेक्षा रक्तदानाचाच आकडा जास्त; तब्बल ५४ वेळा रक्तदान करणारा डॉक्टर

शहरातील एका प्रसिद्ध डॉक्टरने जागतिक रक्तदातादिनी जीवनामध्ये रक्तदानाचे महत्त्व दाखवून दिले आहे. डॉक्टराचे वय ५२ वर्षे असून त्यांनी आतापर्यंत ५४ वेळा रक्तदान केले आहे. डॉक्टर श्रीनिवास कंदी असे या रक्तदाता डॉक्टरांचे नाव आहे.

कौतुकास्पद.! वया पेक्षा रक्तदानाचाच आकडा जास्त; तब्बल ५४ वेळा रक्तदान करणारा डॉक्टर
author img

By

Published : Jun 14, 2019, 7:33 PM IST

Updated : Jun 14, 2019, 7:39 PM IST

हिंगोली - शहरातील एका प्रसिद्ध डॉक्टरने जागतिक रक्तदातादिनी जीवनामध्ये रक्तदानाचे महत्त्व दाखवून दिले आहे. डॉक्टराचे वय ५२ वर्षे असून त्यांनी आतापर्यंत ५४ वेळा रक्तदान केले आहे. डॉक्टर श्रीनिवास कंदी असे या रक्तदाता डॉक्टरांचे नाव आहे.

जागतिक रक्तदाता दिनानिमित्त चौधरी पेट्रोल पंप परिसरात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरात अनेक नेत्यांनी ही रक्तदान केले आहे. मात्र वयापेक्षा जास्त वेळा रक्तदान करणाऱ्या डॉक्टरची जिल्हाभर चर्चा होत आहे.

कौतुकास्पद.! वया पेक्षा रक्तदानाचाच आकडा जास्त; तब्बल ५४ वेळा रक्तदान करणारा डॉक्टर

डॉक्टर श्रीनिवास कंदी हे वयाच्या १९ व्या वर्षापासून रक्तदान करत आहेत. डॉक्टर श्रीनिवास हे वर्षातून तीनदा रक्तदान करतात. 'रक्तदान केल्याने माझ्या आरोग्यावर काहीही दुष्पपरिणाम होत नाही. रक्तदान हे जीवनामध्ये अतिशय महत्त्वाचे आहे. आणि सर्वांनी केलेच पाहिजे. आपण केलेल्या रक्तदानामुळे एखाद्याला जीवदान मिळते' असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.

शहरातील जिल्हा सामान्य रुग्णालयातील रक्तपेढीत रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. मात्र जागतिक रक्तदाता दिनी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरामुळे शासकीय रक्तपेढीमध्ये मुबलक प्रमाणात रक्तपिशव्या उपलब्ध होण्यास मदत झाली आहे.

Intro:जीवनामध्ये रक्तदानाचे महत्त्व किती आहे हे दाखवून दिलेय हिंगोलीत एका प्रसिद्ध डॉक्टर ने जागतिक रक्तदाता दिनी. डॉक्टर श्रीनिवास कंदी या रक्तदाता डॉक्टरांचे नाव आहे. त्यांचे वय सध्या 52 वर्षे आहे. तर त्यांनी आतापर्यंत तब्बल 54 वेळा रक्तदान केले. तरीही डॉक्टर म्हणतात की, रक्तदान केल्याने माझ्या आरोग्यावर काहीही दुष्पपरिणाम होत नाही. रक्तदान हे जीवनामध्ये अतिशय महत्त्वाचे आहे. आणि सर्वांनी केलेच पाहिजे आपण केलेल्या रक्तदाना मुळे खरोखरच कोणालातरी जीवदान मिळते. त्यामुळे वयाच्या आकड्यांचा विचार न करता

Body:हिंगोली येथे जागतिक रक्तदाता दिनानिमित्त चौधरी पेट्रोल पंप परिसरात. रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिरामध्ये मागून तर रक्तदात्यांनी रक्तदान केले तर यापेक्षा जास्त रक्तदान केलेल्या डॉक्टर कंदी यांचे या ठिकाणी सर्वच स्तरातून कौतुक केले जात होते. रक्त हा एक असा घटक आहे तो बनविला जात नाही. त्यामुळे रक्तदान केल्याशिवाय पर्यायच नाही. आज हिंगोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील रक्तपेढीत रक्ताचा तुटवडा जाणवतं आहे. मात्र जागतिक रक्तदाता दिनी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरामुळे काही प्रमाणात का होईना? शासकीय रक्तपेढीमध्ये मुबलक प्रमाणात रक्तपिशव्या उपलब्ध होण्यास मदत झाली आहे.

Conclusion:या रक्तदान शिबिरात अनेक नेत्यांनी ही रक्तदान केलेले आहे. मात्र वयापेक्षा जास्त वेळा रक्तदान करणाऱ्या डॉक्टरचीच जिल्हाभर चर्चा होत आहे. असेच अनेकानी रक्तदान करण्यासाठी अनेकांनी समोर येण्याची गरज असल्याचे ही डॉ. कंदी यांनी सांगितले.
Last Updated : Jun 14, 2019, 7:39 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.