ETV Bharat / state

हिंगोली : विद्युत तारा अंगावर पडून बाप-लेकाचा जागीच मृत्यू

गेल्या अनेक वर्षापासून सोनटक्के कुटूंब हे या वीटभट्टीवर काम करून आपल्या कुटुंबाचा गाडा हाकत आहे. सध्या उन्हाचा पारा वाढत असल्याने सकाळी सकाळी हे कुटुंब वीटभट्टीच्या कामाला लागले होते. यामध्ये रामदास किसन सोनटक्के आणि त्यांचा मुलगा पांडुरंग, पत्नी राणी आणि आणखी एक मुलगा काम करत होते.

son father died due to electric wire in hingoli
विजेच्या तारा अंगावर पडून बाप लेकांचा जागीच मृत्यू
author img

By

Published : Mar 6, 2021, 4:51 PM IST

हिंगोली - वीटभट्टी कारखान्यावर काम करत असलेल्या बाप-लेकाचा विद्युत तारा तुटून मृत्यू झाल्याची घटना घडली. ही घटना वसमत शहरापासून काही अंतरावर असलेल्या वीज कोठा रस्त्यावरील वीटभट्टी कारखान्यावर शुक्रवारी सकाळी साडेसातच्या सुमारास घडली. रामदास सोनटक्के, पांडुरंग सोनटक्के (रा. बेटसावांगी, जि. नांदेड) अशी मृत बाप लोकांची नावे आहेत. दोघांचे मृत्यूदेह उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला गेला.

गेल्या अनेक वर्षापासून सोनटक्के कुटूंब हे या वीटभट्टीवर काम करून आपल्या कुटुंबाचा गाडा हाकत आहे. सध्या उन्हाचा पारा वाढत असल्याने सकाळी सकाळी हे कुटुंब वीटभट्टीच्या कामाला लागले होते. यामध्ये रामदास किसन सोनटक्के आणि त्यांचा मुलगा पांडुरंग, पत्नी राणी आणि आणखी एक मुलगा काम करत होते. दरम्यान, काम करत असताना पत्नी व त्यांचा एक मुलगा हा चहा पिण्यास बाजूला गेले. तोच विट्टी पाडण्यासाठी बनविलेला चिखल हात गाड्याने नेत असताना, विट भट्टीवरून गेलेल्या वीज तारामध्ये पार्किंग झाली आणि विद्युत प्रवाह सुरू झाला. यानंतर तारा खाली कोसळल्या. या तारांचा दोन्ही बाप आणि लेक यांच्या हाताला स्पर्श झाला. यात दोघांचा जागीच मृत्यू झाला.

हेही वाचा - बीडमध्ये वाढले तापमान; जागोजागी थाटली थंड पेयाची दुकाने

चहा पिण्यासाठी दोघे गेल्याने वाचला त्यांचा जीव -

दिवसेंदिवस उन्हाचा पारा वाढत असल्याने, सकाळी-सकाळी हे सर्व कुटुंब कामाला लागले होते. तर नेहमीप्रमाणे काम करून पत्नी या चहा बनवण्यासाठी गेल्या होत्या. त्यांच्यासोबत त्यांचा मुलगाही गेला.

वीट भट्टीवर काम करणाऱ्यांनी कळविले विद्युत वितरण कंपनीला -

घटना घडताच तत्काळ वीटभट्टीवर काम करत असलेल्या इतर कामगारांनी घटनेची माहिती विद्युत वितरण कंपनीला कळविली तोच विद्युत पुरवठा बंद करण्यात आला. यानंतर पोलीस निरीक्षक शिवाजी गुरुमे, सहायक पोलीस निरीक्षक श्रीदेवी पाटील, पोलीस उपनिरीक्षक खार्डे, जमादार भगीरथ सवंडकर, चाटे यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेचा पंचनामा करून दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी वसमत उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहेत. तर घटनास्थळी बघ्यांनी एकच गर्दी केली होती. दरम्यान, बापलेकांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.