हिंगोली - रस्त्याने प्रवास करीत असताना सहा जणांनी रस्ता आडवुन एका पोलिस कर्मचाऱ्यास जबर मारहाण केल्याचा धक्कादायक घटना वसमत तालुक्यातील राजोना येथे सकाळी साडे नऊ वाजता घडलीय. या मध्ये पोलिसांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून, अंगावरील वर्दी देखील फाडली आहे. या प्रकरणी अजून तरी कोणताही गुन्हा दाखल झालेला नसला तरी पोलीस प्रशासन मात्र चांगलेच हादरले आहे.
मारहाण करणाऱ्यांनी काढला पळ - रमाकांत सदावर्ते अस जखमी पोलिसांचं नाव आहे. सदावर्ते हे कळमनुरी येथील पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत, ते समन्स घेऊन दुचाकीने परभणी मार्गे जात होते, दरम्यान, वसमत तालुक्यातील राजोना फाट्याजवळ सहा जणांनी चालत्या गाडीवर दांडूका फेकुन मारत खाली पडले, यामध्ये पाच ते सहा जण अचानक तुटून पडले. चाकूने देखील मारहाण करणार तोच रस्त्यावरुन जाणाऱ्यानी घटनास्थळी धाव घेतल्या मुळे मारहाण करणाऱ्यानी पळ काढला.
नांदेड येथील रुग्णालयात उपचार सुरू - जखमी पोलीस कर्मचारी सदावर्ते यांच्यावर नांदेड येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सदावर्ते यांची वर्दी फाटली असून, डोक्याला देखील गांभीर दुखापत झाली आहे. या धक्कादायक प्रकाराने जनतेचे सुरक्षा रक्षकच आता असुरक्षित झाले आहेत. या प्रकरणी हट्टा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती हट्टा पोलीस ठाण्याचे सपोनि गजेंद्र सरोदे यांनी दिली.
रस्ता आडवुन पोलीस कर्मचाऱ्यास मारहाण - हिंगोली रस्ता आडवुन पोलीस कर्मचाऱ्यास मारहाण
जखमी पोलीस कर्मचारी सदावर्ते यांच्यावर नांदेड येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सदावर्ते यांची वर्दी फाटली असून, डोक्याला देखील गांभीर दुखापत झाली आहे. या धक्कादायक प्रकाराने जनतेचे सुरक्षा रक्षकच आता असुरक्षित झाले आहेत. या प्रकरणी हट्टा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती हट्टा पोलीस ठाण्याचे सपोनि गजेंद्र सरोदे यांनी दिली.