ETV Bharat / state

औंढा नागनाथ येथे तीन दिवसीय दिवाळी महोत्सव; अलंकार पूजा पाहून व्हाल थक्क.. - औंढा नागनाथ अलंकार पूजा

आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या नागनाथाची दिवाळीच्या मुहूर्तावर वेगवेगळे अलंकार घालून लक्ष्मी पुजनानिमित्त पूजा करण्यात येते. यावर्षीही दीवाळीनिमित्त नागनाथाची मूर्ती पूर्णपणे आलंकाराने सजवण्यात आली आहे. यामध्ये सोन्याचा गोफ, लक्ष्मीहार, पुतळ्याची माळ, कानातले, सेवनपिस, सोन्याची पिपळपान, मोत्याचा हार असे वेगवेगळे सोन्याचे अलंकार नागनाथाच्या मूर्तीला घालण्यात आले.

औंढा नागनाथ
author img

By

Published : Oct 28, 2019, 10:08 AM IST

हिंगोली - जिल्ह्यातील औंढा नागनाथ येथील बारा ज्योतिर्लिंगापैकी आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या नागनाथाची दिवाळीच्या मुहूर्तावर वेगवेगळे अलंकार घालून लक्ष्मी पूजनानिमित्त पूजा करण्यात आली. ही परंपरा येथे गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असून वर्षातून दोन वेळा अशी अलंकार घालून पूजा केली जाते.

औंढा नागनाथ

बारा ज्योतिर्लिंगापैकी आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या श्री नागनाथाची संपुर्ण महाराष्ट्रभर ओळख आहे. नागनाथाच्या दर्शनासाठी परराज्यातून भाविक हजेरी लावतात. येथील मंदिरावर करण्यात आलेले कोरीव काम हे भाविकांच्या नजरा खिळून घेते. त्यामुळे याठिकाणी एकदा दर्शनासाठी आलेला भाविक दुऱ्यांदा आवर्जून हजेरी लावल्याशिवाय राहत नाही. त्यातच नागनाथाची नागपंचमीला अन् दिवाळीला अलंकार घालून करण्यात आलेली पुजा म्हणजे भाविकांसाठी पर्वणीच असते. यावर्षीही दीपावली सणानिमित्त नागनाथाची मूर्ती पूर्णपणे आलंकाराने सजवण्यात आली आहे. यामध्ये सोन्याचा गोफ, लक्ष्मीहार, पुतळ्याची माळ, कानातले, सेवनपिस, सोन्याची पिपळपान, मोत्याचा हार असे वेगवेगळे सोन्याचे अलंकार नागनाथाच्या मूर्तीला घालण्यात आले.

हेही वाचा - हिंगोलीत परतीच्या पावसाचा धुमाकुळ, कपाशीला मोठा फटका

'श्री' ची ही आकर्षक सजवलेली मूर्ती सर्वांचेच आकर्षक ठरत आहे. रविवारी दिवाळीनिमित्त घरोघरी लक्ष्मीपूजन केले जाते. मात्र, औंढा नागनाथ परिसरातील भाविक 'श्री' च्या सजवलेल्या मुर्तीचे दर्शन घेऊनच आपल्या घरामध्ये लक्ष्मीपूजन करतात. ही परंपरा अनेक वर्षांपासून चालत आलेली आहे. या महत्त्वाच्या दिवसाची भाविक मोठ्या आतुरतेने प्रतीक्षा करीत असतात. अलंकारांनी सजवलेल्या नागनाथाचे दर्शन म्हणचे एक प्रकारचे भाग्यच. या दर्शनामुळे वर्षभर आनंद अन् भरभराटी राहते. त्यामुळे, शक्यतोवर कोणताही भाविक हा क्षण अजिबात वाया न घालता मोठ्या भक्तीभावाने नागनाथाचे दर्शन घेतोच.

हेही वाचा - दिवाळी दिवशी चोरी करणे बेतले जीवावर; चोरी करताना चोरट्याचा मृत्यू

Intro:

*औंढा नागनाथ येथे तीन दिवस केला जातो दिपावली महोत्सव साजरा*

हिंगोली- जिल्ह्यातील
औंढा नागनाथ येथील बारा ज्योतिर्लिंगापैकी आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या नागनाथाची दिवाळीच्या मुहूर्तावर वेगवेगळे अलंकार घालून लक्ष्मी पुजना निमित्त पूजा करण्यात आलीय.ही परंपरा गेल्या अनेक वर्षांपासून आहे. वर्षातून दोन वेळा अशी अलंकार घालून पूजा केली जाते. या महत्त्वाच्या दिवसाची भाविक मोठ्या आतुरतेने प्रतीक्षा करीत असतात. अलंकारांनी सजवलेल्या नागनाथाचे दर्शन म्हणचे एक प्रकारचे भाग्यच. या दर्शना मुळे वर्षभर आनंद अन भरभराटी राहते. त्यामुळे हा क्षण शक्यतोवर कोणताही भाविक अजिबात वाया न घालता मोठ्या भक्ती भावाने नागनाथाचे दर्शन घेतोच.

Body:बारा ज्योतिर्लिंगापैकी आठवे ज्योतिर्लिंग असलेले श्री नागनाथाची संपुर्ण महाराष्ट्र भर ओळख आहे. नागनाथाच्या दर्शनासाठी पर राज्यातून भाविक हजेरी लावतात. Conclusion:येथील मंदिरावर करण्यात आलेला कोरीव काम हे भाविकांच्या नजरा खिळून घेतंय. त्यामुळे या ठिकाणी एकदा दर्शनासाठी आलेला भाविक दुऱ्यांदा आवर्जून हजेरी लावल्या शिवाय राहणार नाही. त्यातच नागनाथाची नागपंचमीला अन दिवाळीला अलंकार घालून करण्यात आलेली पुजा म्हणजे भाविकांसाठी पर्वणीच. आज दीपावली सणानिमित्त नागनाथाची मूर्ती पूर्णपणे आलंकाराने सजवलीय.
यामध्ये सोन्याचा गोफ, लक्ष्मी हार, पुतळ्याची माळ, कानातले,.सेवनपिस, सोन्याची पिपळपान, मोत्याचा हार असे वेगवेगळे सोन्याचे अलंकार नागनाथाच्या मूर्तीला घालण्यात आले होते. 'श्री' ची ही आकर्षक सजवलेली मूर्ती सर्वांचेच आकर्षक ठरत आहे. आज दिवाळीनिमित्त घरोघरी लक्ष्मीपूजन केले जाते मात्र औंढा नागनाथ परिसरातील भाविक ''श्री'' ची सजवलेली मुर्ती तिचे दर्शन घेऊनच आपल्या घरामध्ये लक्ष्मीपूजन करतात ही परंपरा अनेक वर्षांपासून चालत आलेली आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.