हिंगोली - शिवसेना नेहमीच शेतकरी आणि शेतमजुरांच्या बाजूने राहिलेली आहे आणि शेतकऱ्यांना जास्तीत जास्त कशी मदत होईल हाच आमचा उद्देश आहे, असे प्रतिपादन शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी येथे केले. तसेच दुष्काळाच्या खाईत सापडलेल्या शेतकऱ्यांचे कर्ज माप होण्यासाठी शिवसेना देखील धडपडत आहे. मात्र, काही दुष्ट लोग शिवसेनेला बदनाम करायला निघाले आहेत. आदिवासी समाजाच बांधवांची देखील काही जण दिशाभूल करीत आहेत, असा आरोपही त्यांनी केला. मात्र, आदिवासी समाजावर अजिबात गदा येऊ देणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. कळमनुरी विधानसभा मतदार संघाचे उमेदवार संतोष बांगर यांच्या प्रचारार्थ ते येथे आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
हेही वाचा - वास्तव लपवून मोदींनी देश बरबाद केला - राहुल गांधी
पुढे बोलताना ते म्हणाले, काँग्रेसने कधीही शेतकऱ्यांचा विचार केला नाही. त्यामुळे या भ्रष्ट काँग्रेस-राष्ट्रवादीच्या लोकांना अजिबात साथ देऊ नका. तसेच शासन करत असलेल्या कर्जमाफीवर मी अजिबात समाधानी नाही. मला अर्धवट नव्हे तर संपूर्ण कर्जमाफी करायची आहे. त्यासाठी तुमची साथ मला पाहिजे, अशी साद त्यांना जनतेला घातली. तसेच मी सरकारशी नव्हे तर जनतेशी बांधील आहे. त्यामुळे जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी मी सरकारला धारेवर धरण्यासाठी अजिबात मागे पुढे पाहणार नाही. तर आज घडीला विधानसभा निवडणुकीत मित्र पक्ष असलेल्या भाजप सरकारने 5 वर्षात केलेल्या कामाचा लेखाजोखा सगळीकडे मांडला आहे. मात्र, ही कामे करताना शिवसेनेचाही त्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाटा आहे. त्यामुळे ते विसरून अजिबात चालणार नसल्याचा टोला मित्र पक्षाला लगावला.
हेही वाचा - 'हिंमत असेल तर जाहीरनाम्यात कलम 370 परत लागू करण्याचा उल्लेख करा'
शरद पवार हे ज्येष्ठ आहेत. मात्र, त्यांनी योग्य दिशेने कामेच केली नाही. त्यामुळे त्यांच्यावर उतारवयात ही भयानक वेळ आली असल्याचे ते म्हणाले. तसेच ज्या पक्षाकडे नेता नाही, कार्यकर्ता नाही, अशा पक्षाला आपले मत देऊन वाया घालवू नका, असे आवाहन करत उद्धव यांनी काँग्रेसवर टीकास्र सोडले. या वेळी सभेला जिल्हाभरातून मोठ्या संख्येने शिवसैनिक व कार्यकर्ते उपस्थित होते.
हेही वाचा - 'कलम 370 निवडणुकीचा मुद्दा का असू शकत नाही?'
....म्हणून ढाळत आहेत अजित पवार अश्रू -
काँग्रेस-राष्ट्रवादीने एवढा भ्रष्टाचार केला आहे, की आरशात जरी स्वतःचा चेहरा पाहिला तर त्यांना चेहरा कमी आणि भ्रष्टाचार जास्त दिसतो. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार सत्येत असताना त्यांनी जनतेची कामे केली असती तर आता त्यांच्यावर अश्रू ढाळण्याची अजिबात वेळ आली नसती. तरी देखील अजित पवारांचे अश्रू हे मगरीचे अश्रू आहेत. सत्येत असलेल्या पवारांना शेतकऱ्यांचे अश्रू कधीच पुसता आले नाहीत. मग हे अश्रू केवळ तुम्हाला फसवण्याकरताच असल्याचा आरोपही उद्धव यांनी पवार यांच्यावर केला.
हेही वाचा - काँग्रेसची कधी रेड्डी काँग्रेस, तर कधी चड्डी काँग्रेस झाली, नितीन गडकरींचा टोला
तुमची साथ मिळाली तर अवश्य संतोष बांगरचा आवाज विधानसभेत घुमणार -
विधानसभा उमेदवार संतोष बांगर हा सच्चा शिवसैनिक आहे. तो शिवसेनेसाठी जीवाचे रान करतो. एवढेच का तर तो कठीण प्रसंगी उभाही राहतो. या पहाडी शिवसैनिकाचा आवाज माईक न लावता देखील विधानसभेत घुमेल. त्यासाठी तुमची साथ गरजेची आहे, असे आवाहन उद्धव यांनी केले.
हेही वाचा - 'पुन्हा आणूया आपले सरकार'.. भाजपचा टी शर्ट घालून बुलडाण्यात शेतकऱ्याची आत्महत्या
शिवाजी माने पुन्हा शिवबंधनात -
माजी खासदार तथा भाजप नेते शिवाजी माने हे चारही धाम फिरून त्यांनी पुन्हा उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करत शिवबंधन बांधून घेतले आहे. माने यांनी शिवसेतून बाहेर पडत काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजपचा देखील फेरा मारत पुन्हा सेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे माने यांच्या प्रवेशाची जोरदार चर्चा रंगत आहे. तसेच गजानन घुगे जरी तिकडे असले तरी देखील ते आमचेच आहेत. कारण बाळासाहेब ठाकरे यांनी जे काही शिवसैनिकावर संस्कार टाकले आहेत, ते कुठे ही गेले तर भगवे संस्कार अजिबात विसरू शकत नसल्याचे ते म्हणाले.