ETV Bharat / state

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण; सरपंच संघटनेचे निधीसाठी आंदोलन

मुख्यमंत्री आज हिंगोली दौऱ्यावर आहेत. त्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण होणार आहे. यावेळी सरपंच संघटना शिवाजी महाराज पुतळा परिसरात बेमुदत धरणे आंदोलन करुन मुख्यमंत्र्यांकडे दलित वस्तीचा निधी खर्च करण्याची मागणी करणार आहे.

सरपंच संघटनेचे धरणे
author img

By

Published : Feb 6, 2019, 12:18 PM IST

हिंगोली - मुख्यमंत्री आज जिल्हा दौऱ्यावर आहेत. त्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण होणार आहे. मात्र, पुतळा अनावरणाच्या दिवशीच दलित वस्तीच्या निधीसाठी सरपंच संघटनेच्यावतीने याठिकाणी बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.

जिल्ह्याला सन २०१६-१७ मध्ये दलित वस्ती सुधार योजनेतून प्राप्त झालेल्या २६ कोटी रुपयांच्या निधीतून दलित वस्तीत पुन्हा कामे होत असल्याचे कारण समोर करुन आमदार तान्हाजी मुटकुळे यांनी स्थगिती आणली. चौकशी झाली मात्र, यात काहीही उघड झालेले नसले तरीही स्थगिती काढून घेतली नाही. संघटनेच्यावतीने अनेकदा आमदार मुटकुळे यांची भेट घेऊन, निधी खर्च करू देण्यासाठी मार्ग मोकळा करण्याची मागणी केली. मात्र, काहीही उपयोग झाला नसल्याने सरपंच संघटना शिवाजी महाराज पुतळ्या समोर धरणे करणार आहे, अशी माहिती संघटनेकडून देण्यात आली.

आमदार तानाजी मुटकुळे यांनी वेगवेगळ्या कार्यक्रमात दलित वस्तीच्या निधीचा मार्ग मोकळा करुन देण्याचे आश्वासन सरपंचांना दिले होते. मात्र अजूनही दलित वस्तीचा निधी खर्च करण्यासाठी कोणत्याही हालचाली झालेल्या नसल्यामुळे सरपंच संघटना आक्रमक झाली आहे. एवढेच नव्हे तर सदरील निधी हा मागासवर्गीय लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी केलेली तरतूद आहे. मात्र, प्रशासकीय अधिकारी आणि पदाधिकारी त्याचबरोबर लोकप्रतिनिधी जाणीवपूर्वक या निधीतून कामे मार्गी लावण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप संघटनेच्यावतीने केला आहे.

undefined

संघटनेने आंदोलन करू नये, यासाठी पोलीस प्रशासनाच्यावतीने संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसेच आमदारही संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना भेटण्यासाठी निरोप पाठवत आहेत. मात्र, अजूनही कोणताच तोडगा निघाला नसल्याने सरपंच संघटना सकाळी ९ वाजता छत्रपती शिवाजी महाराज परिसरात बेमुदत धरणे आंदोलन करणार आहेत. यावेळी ही संघटना मुख्यमंत्र्यांना दलित वस्तीचा निधी खर्च करण्यासाठी मार्ग मोकळा करुन देण्याची मागणी करणार आहेत. आता मुख्यमंत्री सरपंच संघटनेला काय आश्वासन देतात याकडे जिल्ह्यातील सरपंचांचे लक्ष लागले आहे.

Intro:जिल्ह्याला सन२०१६-१७ मध्ये दलित वस्ती सुधार योजनेतून प्राप्त झालेल्या २६ कोटी रुपयांचा निधीतुन दलित वस्तीत पुन्हा कामे होत असल्याचे कारण समोर करून आ. तान्हाजी मुटकुळे यांनी स्थगिती आणली. चोकशी झाली मात्र यात काहीही उघड झालेले नसले तरीही स्थगिती काढून घेतली नाही, सरपंच संघटनेच्या वतीने अनेकदा आमदार मुटकुळे यांची भेट घेऊन, दलित निधी खर्च करून देण्यासाठी मार्ग मोकळा करण्याची मागणी केली मात्र, काहीही उपयोग झाला नसल्याने सरपंच संघटना शिवाजी महाराज पुतळ्या समोर धरणे करणार आहे.

Body:बुधवारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वरूढ पुतळ्याचे मोठ्या थाटामाटात अनावरण होणार आहे. त्याची संपुर्ण तयारी ही पूर्णत्वास गेली असून, पुतळा समिती सज्ज झाली आहे. सोबतच आता मुख्यमंत्र्याच्या दौराही निश्चित झाल्याने हिंगोली करांना आता पुतळा अनावरणाच्या लागली आहे. मात्र पुतळा अनावरणाच्या दिवशी दलित वस्तीच्या निधीसाठी सरपंच संघटनेच्यावतीने करण्यात येणारे बेमुदत धरणे आंदोलन चांगलेच चर्चेत येत आहे. वास्तविक पाहता आमदार तानाजी मुटकुळे यांनी दलित वस्तीच्या निधीचा मार्ग मोकळा करून देण्याचे अनेक ठिकाणी झालेल्या वेगवेगळ्या कार्यक्रमात सरपंचांना अश्वासन दिले होते. मात्र अजूनही दलित वस्तीचा निधी खर्च करण्यासाठी कोणत्याही हालचाली झालेल्या नसल्यामुळे सरपंच संघटना आक्रमक झाली आहे. एवढेच नव्हे तर सदरील निधी हा मागासवर्गीय लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी केलेली तरतूद आहे. मात्र प्रशासकीय अधिकारी व पदाधिकारी त्याचबरोबर लोकप्रतिनिधी जाणीवपूर्वक या निधीतून कामे मार्गी लावण्यास टाळाटाळ करीत असल्याचा आरोप संघटनेच्या वतीने केला आहे.

Conclusion:त्यांना धरणे न करु देण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले जात आहेत एवढेच नव्हे तर पोलिस प्रशासनाच्या वतीने ही सरपंच संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला जातोय, तसेच आमदारही संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना भेटण्यासाठी निरोप पाठवीत आहेत. मात्र अजून तरी कोणताच तोडगा निघाला नसल्याने सरपंच संघटना सकाळी ९ वाजता छत्रपती शिवाजी महाराज परिसरात बेमुदत धरणे आंदोनल करून मुख्यमंत्र्यांना दलित वस्तीचा निधी खर्च करण्यासाठी मार्ग मोकळा करून देण्याची मागणी करणार आहेत. आता मुख्यमंत्री सरपंच संघटनेला काय आश्वासन देतात या कडे जिल्ह्यातील सरपंचांचे लक्ष लागले आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.