हिंगोली - पोलिसांची करडी नजर चुकवून वाळू माफियाने शक्कल लावून एकाच रॉयल्टीच्या आधारे दिवसभर वाळूची वाहतूक करीत असल्याचा धक्कादायक प्रकार स्थानिक गुन्हे शाखेच्या छाप्यात उघडकीस आली आहे. यामध्ये वाळू चोरट्यासह एक टिप्पर ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला आहे. केवळ शासकीय कामासाठी वाळू वापरण्याची परवानगी दिलेली असताना, हा वाळू माफिया शासकीय काम सोडुन भलतीकडेच वाळू टाकायचा. हा फंडा त्याच्या चांगलाच अंगलट आला आहे. याप्रकरणी वाळू माफियाविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला असून, हे मोठ रॅकेट असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
हिंगोली जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी शासकीय कामकाजासाठी वाळू साठ्याचा लिलाव झालेला आहे. त्यामुळे केवळ शासकीय कामांसाठीच वाळूचा वापर करण्याची अट असल्याने, मर्यादित प्रमाणात पावत्या महसूल प्रशासनाने वसमत तालुक्यातील हट्टा पोलीस ठाणे हद्दीतील सावंगी परिसरात उपलब्ध करून दिल्या होत्या. मात्र वाळू माफियाने शक्कल लढवत शासनाच्या डोळ्यात धूळ फेक करत दोन ब्रास पावत्या ऐवजी टिप्पर मध्ये तीन ब्रास वाळू भरून पावत्याचे ईनव्हाईस सकाळी सात वाजता मारत, त्याच पावतीचा दिवसभर उपयोग करत दिवसभर अनेक ट्रीपा टिप्परने वाळू वाहतूक करून दिवसभर दोन ब्रास वाळू वाहतुकीच्या पावत्यावर परभणी येथील टिप्पर 14 ते 16 ब्रास वाळू भरून भलतीकडेच टाकत असल्याचे स्थानिक गुन्हे शाखेच्या छाप्यात उघड झाले.
खाडाखोड केलेल्या वापरल्या जात होत्या पावत्या
एकाच पावतीवर अनेक वाळूच्या ट्रिपाची वाहतूक होत असल्याची माहिती हिंगोलीच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गोपनीय माहिती मिळताच पथकाने 17 डिसेंबर रोजी सकाळी साडेसात च्या सुमारास वाळू वाहतूक करणाऱ्या एका टिप्पर ला थांबून चालकाकडून माहिती घेतली. अन पावत्याची मागणी करताच खाडाखोड केलेल्या पावत्या दाखवल्या, त्यामुळे चालक तुकाराम महादू मुंडे ला विश्वासात घेऊन विचारणा केली तर त्याने व एकाच पावतीवरून वाळूची कशी वाहतूक केली जातेय याचा संपूर्ण आढावाच सांगितला. त्यामुळे पोलीसांनी टिप्पर ताब्यात घेत शासनाची दिशाभूल करणाऱ्या चालक तुकाराम महादू मुंढे, मालक संतोष गुजर या दोघा विरुद्ध पोलीस उपनिरीक्षक शिवसाब घेवारे यांच्या फिर्यादीवरून चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.
शासनाची मोठ्याप्रमाणात केली जात होती फसवणूक
मागील आठ दिवसापासून या वाळूमाफिया चा हा गोरखधंदा सुरू असावा याचा पोलीस आता कसून शोध घेत आहेत. अजूनही अनेक टिप्पर चालक हीच युक्ती वापरत आहेत की काय? याचा पोलीस कसून शोध घेत वाळू माफियाविरुद्ध कारवाई करणार असल्याचे पोलीस अधीक्षक एम. राकेश कालासागर यांनी सांगितले.