ETV Bharat / state

इंधन दरवाढ व वाढीव वीज बिलाविरोधात संभाजी ब्रिगेडचे हिंगोलीत धरणे आंदोलन - Sambhaji Brigade agitation news

केंद्रातले सरकार व महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार दोघे मिळून सर्वसामान्य जनतेची कुचंबना करत आहेत, असे म्हणत हिंगोलीत संभाजी बिग्रेडच्या कार्यकर्त्यांनी केंद्र शासनाविरोधात घोषणाबाजी केली.

Sambhaji Brigade agitation
संभाजी ब्रिगेडचे हिंगोलीत धरणे आंदोलन
author img

By

Published : Feb 9, 2021, 6:42 PM IST

हिंगोली - येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज ९ फेब्रुवारी रोजी संभाजी ब्रिगेडच्यावतीने इंधन दरवाढ व वाढीव वीज बिलाच्या विरोधात राज्यव्यापी धरणे आंदोलन करण्यात आले.

केंद्रातले सरकार व महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार दोघे मिळून सर्वसामान्य जनतेची कुचंबना करत आहेत, असे म्हणत हिंगोलीत संभाजी बिग्रेडच्या कार्यकर्त्यांनी केंद्र शासनाविरोधात घोषणाबाजी करून इंधन दरवाढीचा निषेध केला.

केंद्र सरकारने प्रचंड मोठी इंधन दरवाढ केली आहे. तर राज्य सरकार वाढीव वीजबिल आकारणी करून सामान्य जनतेला वेठीस धरत असल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे यांनी आंदोलन दरम्यान केला. वीज बिलाच्या विरोधात भाजपचे आंदोलन व इंधन दरवाढीच्या विरोधात शिवसेना महाविकास आघाडीचे आंदोलन म्हणजे 'राजकीय जॉइंट व्हेचर' आंदोलन आहे. जनतेसाठी खर लढा द्यायचा असेल तर इंधन दरवाढीच्या विरोधात भाजपने रस्त्यावर उतरावे, तर शिवसेनेने वाढीव वीज बिलाच्या विरोधात रस्त्यावर उतरावे, असे आंदोलकांनी सांगितले.

पंतप्रधान व मुख्यमंत्री जनतेची करतायेत दिशाभूल

पंतप्रधान व मुख्यमंत्री यांनी जनतेची दिशाभूल केली आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनता या महागाईने चांगलीच होरपळून निघत आहे. इंधन दरवाढ व वाढीव वीज बिल मागे घेऊन सर्वसामान्य जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणी आंदोलनादरम्यान संभाजी ब्रिगेडच्यावतीने करण्यात आली आहे. असे न झाल्यास यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.