हिंगोली - जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याण सभापतीपदी शिवसेनेच्या रुपालीताई पाटील-गोरेगावकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. जिल्ह्याचे मिनी मंत्रालय म्हणून ओळख असलेल्या जिल्हा परिषदेच्या सभापती पदाची निवड प्रक्रिया पार पडली. शिवसेनेकडे महिला बालकल्याण, समाज कल्याण सभापतीपद तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे विशेष सभापतीपद आले आहे.
हेही वाचा - एसटी बस उलटली; प्रवासी थोडक्यात वाचले
हिंगोली जिल्हा परिषदेच्या सभापती निवडीकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. चार सभापती पदासाठी ही निवड प्रक्रिया मंगळवारी पार पडली. यामध्ये महिला व बालकल्याण सभापती पदी शिवसेनेच्या रुपालीताई पाटील गोरेगावकर यांची बिनविरोध निवड झाली. तर इतर तीन सभापतीपदासाठी हात उंचावून निवड प्रक्रिया पार पडली.
हेही वाचा - 'आज के शिवाजी - नरेंद्र मोदी' पुस्तकाचा वाद, हिंगोलीत राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून निषेध
समाजकल्याण सभापतीपदी शिवसेनेचे फकिरा मुंडे हे 35 मतांनी विजय झाल्याने त्यांची सभापतीपदी निवड झाली, तर राष्ट्रवादीच्या रत्नमाला चव्हाण यांची आणि काँग्रेसचे बाबाराव जुमडे यांचीही विशेष सभापतीपदी निवड झाली आहे. सभापतीपदाची निवड प्रक्रिया पार पडताच विजयी उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषद परिसरात एकच जल्लोष केला.