ETV Bharat / state

हिंगोलीत धाडसी चोऱ्यांचे सत्र कायम; शिरड शहापूर येथील एटीएम पळविले

शिरड शहापूर येथे बसस्थानक परिसरात भारतीय स्टेट बँकेचे एटीएम आहे. हे एटीएम राज्यमहामार्गावर असल्याने औरंगाबादकडून आंध्रप्रदेशात वाहने याच रस्त्याने जातात. तसेच, परिसरातील 30 ते 40 गावांचा देखील शिरड शहापूर या गावाशी संपर्क येतोय. त्यामुळे या एटीएमचा सर्वच ग्राहकांना चांगला फायदा होत होता. मात्र, आज पहाटे सहाच्या सुमारास गावापासून काही अंतरावर पाण्यात हे एटीएम फोडलेल्या अवस्थेत आढळून आले.

robbed the ATM at Shirad  Shahapur
शिरड शहापूर येथील एटीएम पळविले
author img

By

Published : Aug 6, 2021, 11:21 AM IST

हिंगोली - जिल्ह्यात काही केल्या चोऱ्यांचे प्रमाण कमी होत नाही असे दिसतेय. गुरुवारी वसमत येथे पिस्तुलचा धाक दाखवून रोख रक्कम पळविल्याची घटना घडल्याच्या दुसऱ्याच दिवशी औंढा नागनाथ तालुक्यातील शिरड शहापूर येथे एटीएम पळविल्याची धक्कादायक घटना आज (शुक्रवारी) पहाटे सहाच्या सुमारास उघडकीस आली. घटना स्थळापासून काही अंतरावर पाण्यात रिकामे एटीएम सापडले आहे. त्यातील संपूर्ण रक्कम चोरट्यांनी पळविली आहे. घटनास्थळी पोलिसांनी भेट देऊन सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे. मात्र वारंवार धाडसी चोऱ्या करून एकाप्रकारे हिंगोली पोलिसांना चोरटे आव्हानच देत आहेत. या संपूर्ण प्रकाराने मात्र जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

robbed the ATM at Shirad  Shahapur
पाण्यात आढळले एटीएम

गावापासून काही अंतरावर पाण्यात आढळले एटीएम -

शिरड शहापूर येथे बसस्थानक परिसरात भारतीय स्टेट बँकेचे एटीएम आहे. हे एटीएम राज्यमहामार्गावर असल्याने औरंगाबादकडून आंध्रप्रदेशात वाहने याच रस्त्याने जातात. तसेच, परिसरातील 30 ते 40 गावांचा देखील शिरड शहापूर या गावाशी संपर्क येतोय. त्यामुळे या एटीएमचा सर्वच ग्राहकांना चांगला फायदा होत होता. मात्र, आज पहाटे सहाच्या सुमारास गावापासून काही अंतरावर पाण्यात हे एटीएम फोडलेल्या अवस्थेत आढळून आले. या घटनेची माहिती तात्काळ पोलिसांना देण्यात आली. पोलीस अधीक्षक राकेश कलासगर, सहाय्यक पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि सुनील गोपीनवार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक शिवसांब घेवारे, किशोर पोटे यांच्या पथकाने धाव घेतली.

robbed the ATM at Shirad  Shahapur
शिरड शहापूर येथील एटीएम पळविले

सीसीटीव्ही फुटेज घेतले ताब्यात -

पथकाने घटनास्थळावरून सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून त्याची तपासणी केली जात आहे. तर घटनास्थळावरून पाच किमी अंतरावर रिकामे एटीएम आढळून आले आहे. चोरट्याने एटीएम फोडून त्यातील रक्कम पूर्णपणे लंपास केली. पंरतु, एटीएममध्ये नेमकी किती रक्कम होती हे अजून तरी स्पष्ट झाले नाही. मात्र, या धाडसी चोऱ्याने जिल्ह्यात चांगलीच खळबळ उडाली आहे.

पोलिसांसमोर चोरट्यांना पकडण्याचे आव्हान -

दिवसेंदिवस जिल्ह्यात घडत असलेल्या चोऱ्यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गुरुवारी वसमत येथे दिवसाढवळ्या गॅस एजन्सीच्या कॅशिअरला पिस्तुलचा धाक दाखवून लुटले, ती घटना विसरते न विसरते तोच आता परत एटीएमच पळवून त्यातील रक्कम काढणे म्हणजे एक प्रकारे पोलिसांना आवाहनच आहे. आता चोरट्यांना पोलीस कधी ताब्यात घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा - राज्यात ६ हजार ६९५ नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ, १२० रुग्णांचा मृत्यू

राज्यपाल दौऱ्यावर येणाऱ्या मार्गावरीलच फोडले एटीएम -

राज्यपाल आज (शुक्रवार) हिंगोली जिल्हाच्या दौऱ्यावर येत असून ते ज्या मार्गाने हिंगोली जिल्ह्यात येत आहेत, त्याच मार्गावरील हे एटीएम फोडण्यात आले आहे. त्यामुळे आता या एटीएमची चर्चा केवळ हिंगोली जिल्ह्यात नव्हे तर संपूर्ण राज्यात होत आहे.

हेही वाचा - रायगडमध्ये 'लंपी' रोगामुळे शेकडो गुरेढोरे क्वारंटाईन

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.