ETV Bharat / state

हिंगोलीला पावसाचा तडाखा; पर्यायी पूल गेला वाहून

author img

By

Published : Jun 15, 2020, 10:08 AM IST

गेल्या काही दिवसांपासून नरसी नामदेव येथील सेनगाव ते हिंगोली मार्गावरील गोमती नदीवर पुलाचे बांधकाम सुरू आहे. मात्र, अचानक आलेल्या पावसामुळे या नदीला पूर आला आणि वाहनासाठी बनवत आलेला पर्यायी पूल पूर्णपणे वाहून गेला आहे. त्यामुळे सेनगाव मार्गे हिंगोलीकडे जाणाऱ्या वाहनांची मोठी तारांबळ उडाली आहे.

हिंगोली
हिंगोली

हिंगोली - जिल्ह्यातील विविध भागात रविवारी मुसळधार पावसाने हजेरी लावली. यामुळे सेनगाव तालुक्यातील नरसी नामदेव येथील सेनगाव ते हिंगोली रस्त्यावरील पर्यायी पूल वाहून गेला आहे. या ठिकाणी नवीन पुलाचे बांधकाम सुरू असल्याने वाहतुकीसाठी हा पर्यायी पूल निर्माण करण्यात आला होता. मात्र तो पूल वाहून गेल्याने वाहतुकीची समस्या निर्माण झाली आहे.

नरसी नामदेव येथील सेनगाव ते हिंगोली मार्गावरील गोमती नदीवर पुलाचे बांधकाम सुरू आहे. त्यामुळे या ठिकाणी दुसरा पर्यायी पूल बांधण्यात आला होता. मात्र, जिल्ह्यात सतत गेल्या तीन ते चार दिवसापासून पाऊस हजेरी लावत आहे. रविवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत. या पावसामुळे गोमती नदीला पूर आला आणि वाहनासाठी तयार करण्यात आलेला पर्यायी पूल वाहून गेला आहे. त्यामुळे हिंगोलीकडे सेनगाव मार्गे जाणाऱ्या वाहनांची मोठी तारांबळ उडाली आहे. परिणामी हिंगोली-सेनगावकडे वाहतूक खोळंबली आहे.

यावर्षी मृग नक्षत्रांमध्ये पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. जिल्ह्यात पाऊस पडत असल्याने शेत शिवारात मोठ्या प्रमाणात पाणी साचलेले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची पेरणीसाठी मोठी अडचण निर्माण झाली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.