ETV Bharat / state

सायाळा येथे डेंगू सदृश्य तापाचे रुग्ण; नागरिकांत भीतीचे वातावरण - fever

गट ग्रामपंचायत असलेल्या सायाळा येथे गेल्या दोन महिन्यांपासून ७ ते ८ वयोगटातील बालक डेंग्यू सदृश्य तापाने आजारी पडत आहेत.

प्रतिकात्मक फोेटो
author img

By

Published : Mar 10, 2019, 12:04 PM IST

हिंगोली - गट ग्रामपंचायत असलेल्या सायाळा येथे गेल्या दोन महिन्यांपासून ७ ते ८ वयोगटातील बालक डेंग्यू सदृश्य तापाने आजारी पडत आहेत. तर वयोवृद्धांचेही आजारी पडण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा परिस्थिती अद्यापपर्यंत आरोग्य विभागाच्या एकाही कर्मचाऱ्यांने गावाला भेट दिली नाही.

सायाळा गाव

सायाळा गावाची लोकसंख्या जेमतेम ३०० ते ३५० एवढी आहे. नांदुसा आणि राजुरा यांची मिळून सायाळा गट ग्रामपंचायत आहे. गावात अस्वच्छता असल्याने डेंग्यु सदृश्य रुग्ण आढळत आहेत. प्रत्येक घरात एकतरी तापाचा रुग्ण आढळुन येत आहे. आजारी पडणाऱ्यांमध्ये बालकांची संख्या सर्वाधिक आहे. मागील एक ते दीड महिन्यापासून हे आजारी पडण्याचे सत्र सुरू आहे. पंरतु या काळात आरोग्य विभागाच्या कोणत्याही अधिकाऱ्यांनी गावाला भेट दिली नाही.

तीन ते चार वर्षांपासून जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती आहे. आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्याने अनेक पालक व्याजाने पैसे घेऊन बालकांवर उपचार करीत आहेत. आरोग्य विभागाने गावाकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांमधुन होत आहे.

Intro:ग्रुप ग्रामपंचायत असलेल्या सायाळा येथे गेल्या दोन महिन्यापासून सात ते आठ वयोगटातील बालक तापाच्या आजाराने फफणले आहेत. तर वयोवृद्धही मृत्यूशी झुंज देत आहेत. य काही बालकांना डेंग्यू सदृश्य ताप असल्याचे ही उघड झालेय. त्यामुळे सायाळा गावातील पालकामध्ये एकच खळबळ उडालीय, घर परत एक ते दोन मुले अन वयोवृद्ध आजारी असल्याचे पहावयास मिळाले, या सर्व प्रकाराने पालकांची तर मोठी हेळसांड होतेय. एवढी गंभीर परिस्थिती उदभवूनही अद्यापपर्यंत आरोग्यविभागाच्या एकाही कर्मचाऱ्यांने या गावात साधे ढुकूनह पाहिलेले नाही. हे नवलच!

Body:सायाळा या गावाची लोकसंख्या ३०० ते ३५० एवढी आहे. नांदुसा आणि राजुरा सायाळा ग्रुप ग्रामपंचायत आहे. या गावातील उपसरपंच आहे. मात्र जेंव्हा पासून ग्रापंचायत अस्तित्वात आहे. तेव्हा पासून गावाचा विकास तर नाहीच, मात्र अति महत्वाचा असलेला पाणी प्रश्न देखील सुटलेला नाही. त्यातच या गावात अस्वच्छतेचा कळस असल्याने, गावात डेंग्यु सदृश्य रुग्ण आढळलेत, प्रत्येक घरी एकदा तरी तापाचा रुग्ण आढळुन येतोय. यात बालकांची संख्या मात्र सर्वाधिक जास्त आहे. काही - काही घरात तर बालक अन वयोवृद्धही तापाने फणफणत आहेत. हा सर्व प्रकार एक ते दीड महिन्यापासून सुरू आहे. आजही येथील बऱ्याच घरातील बालकांवर खाजगी तर काही वर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. एकंदरीत बऱ्याच घरातील रुग्ण मृत्यूशी झुंज देत असताना देखील, आरोग्य विभागाच्या कोणत्याही अधिकाऱ्यांनी या गावाला भेट दिली नाही. प्रत्येक घरी तापाचे रुग्ण असल्याने येथील ग्रामस्थ अक्षरशः भांबावून गेले आहेत. तीन ते चार वर्षांपासून अल्पपर्जन्यमानामुळे शेतात काहीच उत्पन न झाल्याने तर काही पालक व्याजाने पैसे घेऊन बालकांवर उपचार करीत असल्याचे मोठ्या पोट तिडकीने सांगत होते.,
ही बालक तापाने फणफणत आहेत.
आरती रामराव बेंगाळ, कीर्ती रामराव बेंगाळ, आकाश भगवान बेंगाळ,वैभव न्यानेश्वर होंडे, आरती रामा ठेंगळ
कार्तिक रामेश्वर होंडे, राजनंदनी कांबळे अजूनही अनेक रुग्ण तापाने फणफणत आहे. तर या गावचे उपसरपंच असलेले भागोराव मस्के यांनच्या नातवाला डेंग्यू झाल्याने त्यानी उपचारासाठी नांदेडहुन मुंबई पर्यंत मजल मारली.आता कुठे ताप कमी झाली.

Conclusion:त्यातच गंभीर बाब म्हणजे दर वर्षीच या ठिकाणी पाणी टंचाईचे संकट उदभवूनही ग्रुप ग्रामपंचायत ही पाणी टंचाई दुरकरण्यासाठी काही ही उपाय योजना करत नसल्याचे ग्रामस्थ मोठ्या पोट तिडकीने सांगत आहेत. दर वर्षीच पाण्यासाठी भटकंती करण्याशिवाय येथील ग्रामस्थांना पर्याय नाही. विशेष म्हणजे आमदार डॉ. संतोष टारफे यांच्या आमदार फंडातून पाच लाख रुपयांचे सभागृह दिलेले आहे. मात्र जिव्हाळ्याचा असलेला पाणी प्रश्न सोडवण्यासाठी काहीही हालचाली झाल्या नाहीत. त्यामुळे ग्रामस्थ सोमवारी पंचायत समितीवर घागर मोर्चा नेण्याच्या तयारी करीत आहेत.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.