ETV Bharat / state

रावण दहन करायला जिल्हाधिकाऱ्याने उचलले धनुष्य; आचारसंहिता भंगाची तक्रार दाखल - Maharashtra Assembly Elections 2019

हिंगोलीत रावण दहन सुरू असताना जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी धनुष्यबाण हातात घेऊन, रावणाकडे निशाण साधला. धनुष्यबाण हे शिवसेना या राज्य मान्यताप्राप्त पक्षाचे चिन्ह आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्यावर आचारसंहिताभंग व निलंबनाची कारवाई करावी, अशी ऑनलाईन तक्रार प्रहार जनशक्ती पक्षाच्या उमेदवाराने निवडणूक आयोगाकडे केली आहे.

हिंगोलीचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी
author img

By

Published : Oct 11, 2019, 3:14 AM IST

Updated : Oct 11, 2019, 11:05 AM IST

हिंगोली - जिल्ह्यातील सार्वजनिक दसरा महोत्सवात रावण दहनाच्या दिवशी जिल्हाधिकाऱ्यांनी हातात धनुष्यबाण घेऊन रावण दहन केले. धनुष्यबाण हे शिवसेना या राज्य मान्यताप्राप्त पक्षाचे चिन्ह आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्यावर आचारसंहिताभंग व निलंबनाची कारवाई करावी, अशी ऑनलाईन तक्रार प्रहार जनशक्ती पक्षाच्या उमेदवाराने निवडणूक आयोगाकडे केली आहे.

जिल्हाधिकाऱ्यांवर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करून निलंबनाची मागणी

हिंगोली येथे दसरा महोत्सवाची 165 वर्षाची परंपरा आहे. महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात हिंगोलीतील सार्वजनिक दसरा महोत्सव हा दुसऱ्या क्रमांकावर आहे. या वर्षी पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक आणि दसरा महोत्सव सोबत आल्यामुळे महोत्सवाची संपूर्ण जबाबदारी खाकी बाबा मठाकडे सोपवण्यात आली होती.

हेही वाचा - दहावीत नापास झाल्याने युवतीची आत्महत्या, हिंगोलीतील घटना

परंपरेनुसार रावण दहन सुरू असताना जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी धनुष्यबाण हातात घेऊन, रावणाकडे निशाण साधला. याचा व्हिडीओ विविध माध्यमावर प्रसारित झाला तर वर्तमान पत्रात फोटो प्रकाशित झाले. त्यामुळे प्रहार जनशक्ती पक्षाचे उमेदवार अॅड. विजय राऊत यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे जिल्हाधिकाऱ्यांची ऑनलाईन तक्रार केली. यावर कोणतीही कारवाई न केल्यास पक्षाच्यावतीने तीव्र आंदोलनाचा इशाराही राऊत यांनी दिला आहे.

हेही वाचा - गेल्या पाच वर्षात भाजपने केवळ विविध धर्मांत तेढ निर्माण केली - अशोक चव्हाण

या तक्रारीमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. धनुष्यबाण घेऊन रावण दहन करणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांवर निवडणूक विभाग काय कारवाई करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Intro:विधानसभा निवडणुकीच्या प्रचारास नुकतीच सुरुवात झालीय. गावोगावी होत असलेल्या प्रचार सभेने निवडणुकीला रंगत आलीय. आचारसंहिताचे उल्लंघन होणार नाही. यासाठी प्रशासन अति बारकाईने लक्ष ठेऊन आहे. मात्र हिंगोली येथे सार्वजनिक दसरा महोत्सवात रावण दहनाच्या दिवशी जिल्हाधिकाऱ्यांनी हातात धनुष्यबाण घेऊन रावण दहन केले. धनुष्यबाण हे शिवसेना या राज्यमान्यताप्राप्त पक्षाचे चिन्ह असल्याने जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्यावर आचारसंहिताभंग व निलंबनाची कारवाईची मागणी ऑनलाइन निवडणूक आयोगाकडे एका उमेदवाराने केलीय. त्यामुळे प्रशासनामध्ये एकच खळबळ उडाली आहे.

Body:हिंगोली येथे दसरा महोत्सवाची 165 वर्षाची परंपरा आहे. महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात हिंगोली येथील सार्वजनिक दसरा महोत्सव हा दुसऱ्या क्रमांकावर आहे. दर वर्षीच हा महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय. मात्र या वर्षी पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक अन दसरा महोत्सव सोबतच आल्यामुळे महोत्सवाची संपूर्ण जबाबदारीच खाकी बाबा मठाकडे सोपविण्यात आली होती. या महोत्सवात मुख्य आकर्षण असते ते रावण दहनचे. या सोहळ्याला जिल्ह्यासह पर जिल्ह्यातुन मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थित असते. परंपरे नुसार रावण दहन सूरु असताना जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी धनुष्यबाण हातात घेऊन, रावणाकडे निशाण साधला. याचा व्हिडीओ विविध माध्यमावर प्रसारित झाले तर वर्तमान पत्रात फोटो प्रकाशित झाले. त्यामुळे प्रहार जनशक्ती पक्षाचे उमेदवार ऍड. विजय राऊत यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे जिल्हाधिकाऱ्यांची ऑनलाईन तक्रार केली आहे. एवढेच नव्हे तर यावर कोणतीही कारवाई न केल्यास पक्षाच्या वतीने तिव्र आंदोलनाचा इशारा ही दिला आहे.

Conclusion:ऑनलाईन केलेल्या या तक्रारारीने जिल्ह्यात खळबळ उडाली असली तरी या आता धनुष्यबाण घेऊन दहन करणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यावर निवडणूक विभाग काय कारवाई करणार ? या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Last Updated : Oct 11, 2019, 11:05 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.