ETV Bharat / state

हिंगोलीत वादळी वाऱ्यासह पाऊस; घरावरील पत्रे उडाली, अनेक जण जखमी - Aundha Nagnath

ओंढा नागनाथ तालुक्यातील पिंपळदरी येथील २५० ते ३०० घरावरील टिनपत्रे उडून गेल्याने अनेक जण जखमी झाले. ही घटना रात्रीच्या सुमारास घडली. दरम्यान विद्युत पुरवठा खंडित झाल्याने, गावात एकच गोंधळ उडाला. मात्र या बेमोसमी पावसामुळे नागरिकांची उकाड्यापासून काही प्रमाणात का होईना सुटका झाला आहे.

हिंगोलीत वादळी वाऱ्यासह पाऊस
author img

By

Published : Jun 6, 2019, 10:51 AM IST

हिंगोली - जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशीही वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. यामुळे वसमत तालुक्यात विविध भागांतील झाडे उन्मळून पडली. ओंढा नागनाथ तालुक्यातील पिंपळदरी येथील २५० ते ३०० घरावरील टिनपत्रे उडून गेल्याने अनेक जण जखमी झाले. ही घटना रात्रीच्या सुमारास घडली. दरम्यान विद्युत पुरवठा खंडित झाल्याने, गावात एकच गोंधळ उडाला.

हिंगोली जिल्ह्यात मागील तीन ते चार दिवसांपासून मान्सुनपूर्व पाऊस होत आहे. यामुळे येथील नागरिकांची तारांबळ उडत आहे. होत असलेल्या पावसामुळे वसमत, औंढा आणि कळमनुरी या भागातील झाडे उन्मळून पडली आहेत.

हिंगोलीत वादळी वाऱ्यासह पाऊस

औंढा नागनाथ तालुक्यातील पिंपळदरी गावातदेखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.येथे टीन पत्रावरील दगड डोक्यात पडल्याने अनेक जण गंभीर जखमी झाले. तर गाईच्या गोठ्यावरील पत्रे उडून गेल्याने बऱ्याच गुरांना जखमा झाल्या आहेत. असे असले तरीही, या बेमोसमी पावसामुळे नागरिकांची उकाड्यापासून काही प्रमाणात का होईना सुटका झाला आहे.

Intro:जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी ही झालेल्या वादळी वाऱ्यामुळे वसमत तालुक्यातील विविध भागात झाडे उन्मळून पडली तर ओंढा ना. तालुक्यातील पिंपळदरी येथे २५० ते ३०० घरावरील टिनपत्रे उडून गेल्याने अनेक जण जखमी झाल्याची घटना रात्रीच्या सुमारास घडली. दरम्यान विद्युत पुरवठा खंडित झाल्याने, गावात एकच गोंधळ उडाला. तर आज सकाळ पासूनच ढगाळ वातावरण निर्माण झालेले आहे.

Body:हिंगोली जिल्ह्यात मागील तीन ते चार दिवसांपासून वातावरणात बदल झालेला आहे. सलग तीन दिवसापासून जिल्ह्यात बेमोसमी पाऊस हजेरी लावत असल्याने नागरिकांची एकच तारांबळ उडत आहे. वसमत औंढा कळमनुरी या भागातील विविध गावात झाडे उन्मळून पडलेली आहेत तर औंढा नागनाथ तालुक्यातील पिंपळदरी या गावात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. टीम पत्रावरील दगड डोक्यात पडल्याने अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत तर गाईच्या गोठ्यात वरील पत्रे उडून गेल्याने ही बऱ्याच गुरांना जखमा झाल्या आहेत.
तर बेमोसमी पावसामुळे उकाड्यापासून नागरिकांचा काही प्रमाणात बचाव झाला आहे. सध्यास्थितीत शेतकरी शेतीच्या मशागती गर्क झाले असून, काही शेतकरी खते बी-बियाणे याचेही नियोजन लावत असल्याचे चित्र बाजारपेठेमध्ये दिसून येत आहे.

Conclusion:तर चोथ्या दिवशीही हिंगोली जिल्ह्यात पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.

व्हिज्युअल ftp केले आहेत
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.