हिंगोली : कन्याकुमारीपासून काँग्रेस नेते राहुल गांधी Congress leader Rahul Gandhi यांची भारत जोडो Bharat Jodo Yatra यात्रा हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी येथे दाखल झाली असून, तेथे मुक्कामी आहेत. कळमनुरी येथील जिल्हा परिषदेच्या मैदानावर झालेल्या बैठकीत राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा काढण्यामागचे सत्य सांगितले.
हे आहे ते सत्य कारण : सर्वसामान्य जनता ही रस्त्यावर आली आहे. आशा परिस्थितीत केंद्र सरकारने जनतेचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे आमच्याकडे केवळ एकच रस्ता उरला आहे तो म्हणजे, ज्या रस्त्यावर ही जनता चालत आहे, त्या रस्त्यावर चालून जनतेचे प्रश्न ऐकणे, कन्याकुमारीपासून काश्मीर पर्यंत चालणे या दरम्यान, जनतेचा आवाज ऐकणे आणि आपण जनतेला सांगणे, हाच एक मेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून जनतेचा विचार करून आम्ही ही भारत जोडो यात्रा सुरू केली असल्याचे राहुल गांधी यांनी सांगितले.
एका ही यात्रेकरूला थकवा जाणवत नाही : जेव्हा पासून यात्रा सुरू झाली, एवढे लोक यात्रेमध्ये चालतात, परंतु एका ही यात्रेकरूला थकवा जाणवत नाही, हे मलाच नव्हे तर यात्रेत सहभागी झालेल्या कोणत्याही काँगेस नेत्यांना विचारा एवढेच नव्हे तर यात्रेकरूंना देखील विचारा. यात्रेत चालत असताना असे वाटत आहे की, नुकतीच चालण्याला सुरुवात झाली आहे की काय ? दुसरे तिसरे काहीही नाही. आम्ही फक्त तुमच्याच ताक्तीचा वापर करीत आहोत आणि हेच आमच्यासाठी खूप मोठे योगदान असल्याचे राहुल गांधी यांनी सांगितले.
नोट बंदी आणि जीएस टी ने केले हैराण : देशात जी नोटबंदी आणली त्या नोटबंदीने सर्वसामान्यांचे अक्षरशा कंबरडे मोडले आहे. त्यात भर म्हणून जीएसटीने खात्री असून जीएसटी मुळे व्यवसायिकांचे चांगलीच अडचण निर्माण झाली आहे. मात्र याचा फायदा झाला तो धनदांडग्या व्यवसायिकांना व सरकारांना हे सर्व उपयोगाचे आहे. ते सरकारच्या असा आरोपही राहुल गांधी यांनी यावेळी केला. तसेच पीक विम्यामध्ये नेमकं किती शेतकऱ्यांना फायदा झाला याचा हिशोबही सरकारने द्यावा अशी मागणी केली आहे.