हिंगोली - जिल्ह्यात ओंढा - हिंगोली रस्त्यावर १२ ऑगस्टला दोन गटात झालेल्या वाद झाला होता. त्यानंतर झालेल्या हाणामारीत पोलिसांनी फक्त एका गटालाच लक्ष केले, असा आरोप मारहाण झालेल्या गटाने केला आहे. त्यामुळे पोलीस अधीक्षक आणि पोलीस निरीक्षकावर निलंबनाची कारवाई करावी, या मागणीसाठी या गटाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय उपोषण सुरू केले आहे.
हिंगोलीत ओंढा - हिंगोली रस्त्यावर १२ ऑगस्टला दोन गटात वाद झाला. यात 30 च्या वर वाहनांची तोडफोड झाली. वाद एवढा विकोपाला गेला की वादाचे रुपांतर दंगलीत झाले. यात पोलीस प्रशासनाने लाठीचार्ज करत वाहनासह एकाच गटाच्या लोकांवर लाठीचार्ज केला. यातील एका गटाच्या घरावर पोलिसांनी दांडे मारल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. यात पोलिसांच्याच फिर्यादीवरुन एका गटावरच गुन्हे दाखल केले जात आहेत. यात काही तरुणांचा देखील समावेश आहे. पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे हे प्रकरण पेटले. त्यामुळे पोलीस अधीक्षक, पोलीस निरीक्षकावर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी यी गटाने केली आहे. पोलिसांवर गुन्हे दाखल करण्यााच्या मागणीसाठी या गटातील लोक पोलीस प्रशासनाच्या विरोधात उपोषणास बसले आहेत. या वादाला जबाबदार असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांवर प्रशासन काय कारवाई केली जाते याकडे आंदोलनकर्त्यांचे लक्ष लागले आहे. पोलिसावर कारवाई न केल्यास पुन्हा 29 ऑगस्ट रोजी रस्ता रोको केले जाणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.